माझे शेल्फ

साधू आणि साधूपुत्र शंभू

सारांश

'साधू'

शिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती. याच रहस्यांवरचा पडदा बाजूला करून राजांचा तेजस्वी प्रवास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजेच साधू ही कादंबरी.

'साधूपुत्र शंभू'

हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात....

प्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते.

दुर्दैव फक्त एवढंच की शंभूराजांच्या वाटेवर काट्यांची रांगोळी काढण्यासाठी औरंगजेबही सज्ज होता. कारण शंभूराजांच्या मृत्यूवर औरंगजेबाला अजिबात विश्वास नव्हता. मुघली सैनिक, दरोडेखोर, गुप्तहेर, धन-दौलत, प्रतिष्ठा सारं काही त्यानं शंभूच्या शोधासाठी पणाला लावलं. उसाचा फड पेटवावा तसा सारा मुघली प्रांत पेटवून दिला. पण, साऱ्या मुघलांची धूळधाण उडवत शंभूराजे राजगडी पोहचले....

कसे?

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी