मुखपृष्ठ
शापित वास्तू

माझे शेल्फ

शापित वास्तू

इंग्रजी शीर्षक
Shapit Vaastu
सारांश

मेहता प्रकाशनातर्फे प्रकाशित नॅथनिल हॉथॉर्न यांच्या ‘द हाऊस ऑफ द सेव्हन गेबल्स’ या जगप्रसिद्ध कादंबरीचा शंकर पाटील यांनी केलेला ‘शापित वास्तू’ हा अनुवाद लक्षवेधी आहे. ‘पिंचेन प्रसाद’ ही न्यू इंग्लंडमधल्या एका गावातील वास्तू या इमारतीला वेगळा इतिहास आहे. हा इतिहास या इमारतीत राहणाऱ्या माणसांचे जीवन आहे. यातील पात्रांच्या व्यक्तिमत्त्वाला असणारे विविध कंगोरे इमारतीच्या ओळखीत मिसळले आहेत. ही इमारत अनेक स्थित्यंतरातून जाते. त्यामुळे तिच्या सभोवती निर्माण होणारे वलय गूढ गंभीर आहे. मात्र या गूढ गांभीर्याला तडा जातो. दगडाची मने आणि दगडी मने असणाऱ्या या इमारतीमधील व्यक्तींमध्ये प्रेमाचा झरा वाहू लागतो. शंकर पाटील यांच्या अनुवादामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहेच पण वाचकालाही खिळवून ठेवते. हॉर्थार्न यांच्या लेखनातून ‘सत असत’ यांच्यातील झगडा सातत्याने पुढे येतो. या झगड्यातून हॉथॉर्न वाचकाला नैतिकतेचा संदेश देतात. तसेच मानवी मनाची गुंतागुंत समर्थपणे मांडतात. कादंबरी वाचताना कथा खुलवण्याचे लेखकाचे कौशल्य जाणवत राहते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद