माझे शेल्फ
सेकंड लेडी
सेकंड लेडी,,एक उत्कंठावर्धक कादंबरी केजीबी ही रशियन गुप्तहेर संघटना चक्क अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या पत्नीची हुबेहूब दुसरी तोतया पत्नी म्हणून व्होरा नावाच्या नटीला जबाबदारी देतात,,आणि ती ही बिली या फस्ट लेडीची भूमिका बिनचूकपणे निभावते,, क्षणाक्षाला उत्कंठा व थरार वाढवणारी खूप विलक्षण कादंबरी आहे,,,अमेरिकन डावपेच, रशियन राजकीय खेळी,,,,,राझिन, बिली व व्होरा यांचा प्रेमाचा त्रिकोण,,,तसेच कथानकातील बारीकसारीक गोष्टींचे लेखकाने केलेलं वर्णन(अगदी राष्ट्राध्यक्ष आणि व्होराचा व राझिन आणि बिलीचा प्रणय सुद्धा) वाचकाला मंत्रमुग्ध करून सोडतं,,, पुढे काय घडेल याचा जराही थांगपत्ता लेखक वाचकाला लागू देत तर नाहीच पण कथानक जसजसे पुढे सरकते तसतशी उत्कंठाही वाढतंच जाते,,अमेरिकेत घडलेल्या सत्यघटनेवर आधारित अशी कादंबरी आहे व या कादंबरीवर आधारित एक चित्रपटही प्रकाशित झालेला आहे,, प्रत्येक वाचकाने वाचावीच अशी ही कादंबरी आहे,,लेखक आयरविंग वलेस असून त्याचा मराठी अनुवाद रविंद्र गुर्जर यांनी केला आहे आपण जीच्याबरोबर संसार करतो , ती आपली पत्नी प्रत्यक्षात कुणी दुसरीच आहे असं समजलं तर आपणांस केवढा जबर धक्का बसेल? पण इथं खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा त्या वस्तुस्थितीवर विश्वास बसत नाही,त्यांचं कामजीवनही नेहमीच्याच परिचित क्रीडाप्रमाणे यत्किंचितही संशय न घेता सुरळीतपणे चालू राहतं,,,,, अशी ही नाजूक,पण मनाची गुंतागुंत व मती गुंग करणारी कादंबरी.