मुखपृष्ठ
सेक्रेड लीफ

माझे शेल्फ

सेक्रेड लीफ

इंग्रजी शीर्षक
Sacred Leaf
सारांश

कोकेन तयार करण्याकरता कच्चा माल म्हणून वापरला जाणाऱ्या कोकच्या पानांचा वापर बोलिवियन लोक सौम्य उत्तेजक म्हणून करतात. ते त्याचा चहा पितात. ती पाने चघळतातही. त्यामुळे भुकेचा व त्यामुळे येणाऱ्या मरगळीसारख्या गोष्टींचा परिणाम कमी होतो. कोकची शेती करणारे रीब शेतकरी व त्यांच्या समस्या या सूत्राभोवती रचलेल्या एलिसच्या पुस्तकमालिकेमधल्या याही पुस्तकात बारा वर्षांचा दिएगो हा चिमुरडा आहे. यात ड्रग रॅकेट आणि त्याभोवती असलेला संघर्ष आहे. ‘आय एम अ टॅक्सी’ या पुस्तकाच्या शेवटी दिएगोला कोक पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात – रिकार्डो कुटुंबात आश्रय मिळतो. पण लगेचच बोलिवियन सैनिक येतात आणि त्यांच्या पिकांची नासधूस करतात. त्यांचे आयुष्य अस्ताव्यस्त करून टाकतात. त्यामुळे रिकार्डो कुटुंबीय कोक पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होतात. आजूबाजूच्या गावातलेही लहानथोर उत्साहाने या आंदोलनात सहभागी झालेले असतात आणि ते मुख्य रस्त्याची नाकाबंदी करतात. त्यामुळे तणाव अधिकच वाढतो. पण बलाढ्य सैन्यापुढे त्यांना माघार घ्यावी लागते. शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि आंदोलनात सक्रिय सहभाग घेणाऱ्या दिएगोला तुरुंगातल्या आपल्या कुटुंबाची ओढ लागते.... या कथेतून उपदेश न करता, महत्त्वाच्या विषयांना वाचा फोडली आहे. आपली नोकरी व कर्तव्य आणि आपला समाज यांमध्ये ओढाताण होत असलेला सैन्याचा कॅप्टन, अतिउत्साहाच्या भरात अविचार करणारे तरुण अशी दोन्ही बाजूंची पात्र तपशीलवार रेखाटली आहेत. ही कथा वाचताना वाचक एका वेगळ्या बालपणाला सामोरा जातो.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
140.00
समुदायाने जोडले
बंद