माझे शेल्फ

सेलिब्रेशन

इंग्रजी शीर्षक
Celebration
सारांश

स्वाती चांदोरकर या तरुण, कल्पक, मानवी मनाच्या इंद्रधनुषी भावोत्कटतेप्रमाणे हळव्या, दुखऱ्या सलांना अलगद स्पर्श करणारी उत्तम कथनकार लेखिका, ख्यातनाम साहित्यिक कै. व. पु. काळे यांच्या या कन्यकेच्या कथा आणि मांडणी, शब्दांचा व कथनशैलीचा ढंग एकदम व. पु. ढंगाचा जणू व. पु. आहेत आणि अजूनही स्वातीच्या लेखणीतून बोलत आहेत- निरखत आहेत- टिपण्या करीत हसवत तर कधी हळवे करून सोडत आहेत असंच जाणवत राहावे अशा या बारा कथांचा सेलिब्रेशन हा स्वातीचा दुसरा कथासंग्रह. तिचा गोल गोल राणी या पहिल्या कथासंग्रहाचे पाऊल ठरणारा. लेखक, वाचक, वृत्ती प्रवृत्ती, अंगाई, जिंदाबाद, रंगभूमी, बी हॅपी, जोशी, कुरकुरे, लालसा, स्मॉल स्केल बिझिनेस फ्रॉम रेसिडन्स, पाऊसपाणी, सेलिब्रेशन, भातुकलीचा खेळ अशा स्वाती चांदोरकरने लिहिलेल्या या कथासंग्रहातील बाराही कथा संवाद प्रधान आणि नाट्यपूर्ण आहेत. मानवी वृत्ती आणि प्रवृत्ती जाणवत ठेवणाऱ्या या कथा रंगभूमीवर किंवा रजतपटावर शोभाव्यात अशा भावोत्कट प्रसंगाबरोबरच जीवनातील नैराश्याची गडदता आणि आनंदोत्साहाच्या सेलिब्रेशनची आनंदमयी कोवळीक जाणवत सुखावणाऱ्या आहेत. खुदकन् हसवणारी गंमत, कौटुंबिक जिव्हाळा, आत्मगौरव - स्वाभिमान - तडजोड - समंजसपणाच्या जोडीने दुखावलेल्या अहंकार - हटवाद - या सगळ्या ओळखीच्या स्वभाव वैशिष्ट्याच्या तटस्थ तरीही आत्मीयता लपून राहत नाही अशा समरसतेने नेमक्या शब्दात केलेले व्यक्तिमत्त्व रेखाटन स्वातीच्या मनोज्ञ कल्पना चातुर्याइतकेच कुशल लेखनप्रभुतेची साक्ष पटवणारे आहे. वाजवी किंमत, उत्तम छपाई, बोलके मुखपृष्ठ ‘सेलिब्रेशन’ पाहताच उचलून घ्यावे असेच वाटायला लावणारी आणखी एक जमेची बाजू!

आता पैसे कुठून आणायचे? त्याने गॅस भरताना पेट्रोल पंपावर टायर सेट १६० डॉलर्सना बदलून मिळेल असा बोर्ड वाचला. तेथील अटेंडंटला तो म्हणाला, ‘मला टायर बदलायचे आहेत.’ अटेंडंट म्हणाला, ‘पण तुझे टायर तर चांगले आहेत.’ फ्रँक म्हणाला, ‘खरं आहे. टायर्स घेतल्याची कार्डवर नोंद कर. टायर्स तूच ठेव. मला १०० डॉलर्स दे. तू ते १६० ला कुणाला तरी विकत दे. तुला साठ डॉलर्सचा फायदाही होईल. तो अटेंडंट या गोष्टीला राजी होतो. ते तंत्र मग फ्रँक सहजपणे राबवतो. पुढच्या महिन्यात टायर्सच्या १४ जोड्या बदलून, गॅसकार्डचे बिल ३४०० डॉलर्सचे येते. वडील ते बिल भरतात. बँकेचे अधिकारी वडिलांचे मित्र. वडील फ्रँकला विचारतात, ‘‘तू हे काय केलेस ते खरे खरे सांग. मी तुला क्षमा करीन.’’ ‘‘डॅड, हे सगळं मुलींमुळे घडले. त्या मुलींना पटवण्यासाठी चमत्कारिक गोष्टी कराव्या लागतात. मला त्या स्पष्ट करता येणार नाहीत.’’ वडील क्षमा करतात. आई मात्र रागावते. ती फ्रँकला वडिलांच्या घरातून स्वत:च्या घरात राहण्यास भाग पाडते. त्याला पुढे शाळा-कम-सुधारगृहात टाकते. वर्षभर फ्रँक त्या सुधारगृहात राहतो. त्याच वेळी वडिलांची आर्थिक स्थिती ढासळते. ते आपली आलिशान कार विकून साधी सेकंड हँड कार घेतात. ‘मी कोण आहे हे मला ठाऊक आहे. माझ्याकडे कुठली कार आहे हे महत्त्वाचे नाही. मोठी कार असण्यापेक्षा मी प्रामाणिक आहे ह्या गोष्टीचे महत्त्व जास्त आहे.’ वडिलांची ही वाक्ये फ्रँकला पुढच्या आयुष्यात प्रेरक ठरतात. फ्रँकला सोळाव्या वर्षी स्वत:चा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो. १९६४ साली. त्यावेळी त्याच्या बँकेतल्या खात्यावर २०० डॉलर्स शिल्लक असतात. एका आठवड्यात वेगवेगळी कामे करून थोडेफार पैसे मिळवतो. पण त्यात जगणे अशक्य आहे हे त्याच्या ध्यानात येते. तो वयापेक्षा थोराड असला तरी ड्रायव्हर्स लायसन्सवर वय १६ च असल्याने पगार निम्मा मिळतो. तेव्हा त्या लायसन्सवरचे जन्मवर्ष १९४८ ऐवजी तो १९३८ तो बदलतो. एका रात्रीत १६ ऐवजी २६ वर्षांचा होतो. त्यावेळी चेक वटवण्याचे एक तंत्र फ्रँक शोधून काढतो.त्याच्या बँकेतील खात्यावर २०० डॉलर्स शिल्लक होते. या शिल्लक रकमेला हात लावायचा नाही हे ठरवलेले. १० किंवा २० डॉलर्सचा चेक लिहायचा. तो हॉटेल किंवा डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये जाऊन वटवायचा. पैशाची जरूर असले तेव्हा चेक वटवायचे. मौजमजा करायची. पगाराला पूरक म्हणून रोज २/३ चेक खोटे लिहून द्यायचे. चेक न वटवण्यासाठी पैसे कमी पडले तर वडील भरपाई करतील, असे तो म्हणे चेकचा खरेपणा पडताळून न पाहता लोक चेक स्वीकारण्याएवढे मूर्ख असतील तर त्यांची फसवणूक समर्थनीय आहे असा फ्रँकचा युक्तिवाद होता. कुमारवयामुळे आपण पकडले गेलो तरी कडक शिक्षा होणार नाही असाही दिलासा तो स्वत:ला द्यायचा. खोटे चेक वटविण्याचा प्रकार न्यूयॉर्कमध्ये २ महिने केल्यावर न्यूयॉर्क सोडण्याचा विचार फ्रँकने केला. खोटे चेक वटविण्यात आपण प्रवीण असलो तरी केवळ यावर दीर्घकाळ निभाव लागणार नाही हेही त्याला मनोमन पटले होते. आपण वैमानिक असलो तर देशोदेशी, गावोगावी भटकू शकू, खोटे चेक वटवू शकू, पकडले जाणार नाही असे त्याला वाटले. वैमानिकाचे प्रशिक्षण घेऊन वैमानिक व्हायचे हा मार्ग दीर्घ पल्ल्याचा आणि प्रचंड खर्चाचा तो फ्रँकला जमण्यासारखा नव्हता. वैमानिकाचा पोशाख मिळवणे, बॅच मिळवणे, तोतया वैमानिक बनून विमानातून प्रवास करणे हे कितपत शक्य आहे याचा त्याने मागोवा घेतला. पॅन अॅम वर्ल्ड एअरवेज या अमेरिकन विमान कंपनीत जाऊन ‘आपण सहवैमानिक आहोत, आपला गणवेश हरवला आहे, तातडीने गणवेश मिळाला नाही तर मला विमान घेऊन लॉस एंजेलिसला जाता येणार नाही’ असा कांगावा करून फ्रँक गणवेश मिळवतो. वैमानिकाला उपलब्ध असणारे फुकट प्रवास करण्याचे दोन मार्ग त्याला कळतात. एक तर, फक्त तिकीटावरचा टॅक्स भरून पास मिळवणे. दुसरा डेड-हेडिंग, पिंक स्लीप भरून पास मिळवणे, ‘आपण न्यूयॉर्कमध्ये आहोत. उद्या लॉस एंजेलिसवरून दुसऱ्या देशाला उड्डाण करण्याचा आदेश बॉसने दिला आहे. तर न्यूयॉर्कहून कुठल्याही कंपनीच्या विमानाने लॉस एंजेलिसला आपण जाऊ शकतो.’ विमानात जागा नसली तरी कॉकपिटमधील जम्प सीटवर बसून प्रवास करता येतो. त्यासाठी पिंक स्लिप तेवढी भरावी लागते. फ्रँक या डेड हेडिंगचा वापर पुढच्या पाच वर्षात अनेकदा करतो. त्याचे सहवैमानिक हे पद खोटे आहे, तो फसवणूक करीत आहे हे लक्षात यायला विमान कंपन्यांना दीर्घकाळ लागतो. वैमानिकाच्या नाटकानेही खोटे चेक वटवणे फ्रँकला सोपे जाते. पाच वर्षाच्या अवधीत फ्रँक २६ देशात मिळून २५ लाख डॉलर्सची माया जमवतो. एकविसाव्या वर्षी त्याला फ्रेंच पोलीस पकडतात. शिक्षा होते. परंतु पाच वर्षांनी त्याला सरकारला मदत करण्याच्या काही अटींवर अमेरिकन गुप्तहेर खात्याच्या मार्फत सोडवण्यात येते. त्याचबरोबर नॅशनल सायबर सिक्युरिटी अलयान्स वगैरे संस्थांसाठी फ्रँक काम करतो."कल्पितापेक्षा अद्भूत असलेली सत्यकथा"! असलेले पुस्तक. नक्की वाचा.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
180
भाषा
मराठी
किंमत
130.00