माझे शेल्फ
शॅडो मॅन
कोडी मॅकफॅदियेन हा लेखक मूळचा वेबसाईट डिझायनर म्हणून पोटापाण्याचा व्यवसाय करीत होता. १९८६ मध्ये टेक्सासला हा जन्मला. ‘शॅडोमॅन’ ही त्याची पहिलीच कादंबरी. तुफान गाजली अन् अफाट खपली. नंतर आली ‘फेस ऑफ डेथ’ तीही बेस्टसेलर ठरली. प्रस्तुत कादंबरीत स्मोकी बेट नामक एक सुंदरी असून ती असते एफबीआय या गुप्तहेर संघटनेची स्पेशल एजंट. एकामागून एक खून होतात. या भयानक मालिकेची खुनी कोण आहे याचा शोध घेते. ती अत्यंत निष्णात गुप्तहेर असूनही एक खुनी माणूस मात्र तिला आपल्या जाळ्यात असा काही गुंतवतो की, तिचा संसार विस्कटून जातो. एवढे नाही तर तिच्या पतीला तो खुनी इसम ठार मारतो. हे कमी वाटते म्हणून की काय, तिच्या मुलीचाही मुडदा पाडतो. तिला भयानक मानसिक धक्का बसतो. ज्यासाठी आणि ज्याच्यासाठी जीवन जगायचे तेच नाहीसे झाल्यावर करायचे काय? हाच एक प्रश्न तिला सतत सतावतो. आत्महत्या करावी की बदला घ्यावा. याचा निर्णय तिला घेणे कठीण होऊन बसते. सतत ‘खुनी साया’ तिच्यावर हुकूमत गाजवतो. तो छायापुरुष हुशार असतो, परंतु विकृत मनोवृत्त्तीमुळे वाया गेलेला असल्याने ती प्रतिबिंबाद्वारे बिंबाचा शोध घेते का ? याचे उत्त्तर मिळविण्यासाठी वाचायला हवी.