माझे शेल्फ
सीझर
कूक लिखित कादंबरी मराठीमध्ये अनुवादित केली आहे डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी. डॉ. रॉबिन कूक यांचा हेतू मनोरंजनाचा असला तरी त्यांच्या प्रत्येक कादंबरीत काही ना काही सामाजिक मुद्दा असतो. अर्थपूर्ण, ओघवती आणि वेधक भाषा, शब्दांची अचूक निवड, वैद्यकीय क्षेत्रातील फेरबदल आणि त्यांचा समाजावर होणारा परिणाम याचे अत्यंत वास्तवदर्शी चित्रण डॉ. रॉबिन कूक करतात. या कादंबरीचे कथानक २० फेब्रुवारी २००२ ते २५ मार्च २००२ या पस्तीस दिवसात घडते. वॉशिंग्टन डीसी, न्यूयॉर्क, बोस्टन, इटलीतील ट्युरीन श्राउड (येशूचे कफन, त्या कफनावरच्या एका वस्त्रावर येशूच्या रक्ताचे डाग असल्याची लोकांची श्रद्धा आहे), पॅरिस, नसाऊ बेटावरील वंध्यात्वावर उपचार करण्याबाबत नावाजलेले क्लिनिक अशा वेगवेगळ्या ठिकाणी या कादंबरीतील घटना घडतात. हॉर्वर्ड विद्यापीठातील डॉ. डॅनिएल लोवेल हा जीवरेणूशास्त्र मूलपेशीचे क्लोनिंग करून पार्किन्सन विकारावर उपचार करण्याबाबत संशोधन करत असतो. आता या संशोधनाचे व्यपारी तत्वावर उत्पादन करण्यासाठी क्युअर ही कंपनी त्याने काढली आहे. त्याची मदतनीस म्हणून डॉ. स्टेफनी डी, अॅगोस्टिनो ही काम करीत असते. डॉ. डॅनिएल लोवेलने आपल्या शोधाच्या वैद्यकीय प्रयोगासाठी स्वत: क्युअर नावाची एक कंपनी काढलेली असते. डॉ. लोवेल क्वोनिंग रेणूचे प्रयोग उंदरावर करीत असतो. या कंपनीला त्याची सहकारी डॉ. स्टेफनी डी अॅगोस्टिनो हिच्या भावाने दोन लाख डॉलर्स भांडवल पुरवलेले असते. या भावाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असते. त्याच्यावर अफरातफरीचा आरोप असतो असाही गौप्यस्फोट सिनेटर अॅशले बटलर करतो तेव्हा या एकूणच प्रकरणाला आणखी एक परिमाण लाभते... बिल क्र. ११०३ मांडून सिनेटर लोवेलची क्युअर ही कंपनी बंद करू शकतो हेही या समितीच्या सुनावणीवरून लक्षात येते. पण याच वेळी या कथानकाला वेगळे वळण लागते. सुनावणीच्यानंतर काही वेळाने सिनेटर अॅशले बटलर याला स्वत:लाच पार्किन्सन विकार असल्याचे निदान त्यांचे डॉक्टर करतात. या विकारावर कोणतेही औषध नाही हेही स्पष्ट करतात. तेव्हा सिनेटरना एकदम डॉ. डॅनिएल लोवेलच्या या नव्या संशोधनाने आपला पार्किन्सन विकार बरा होऊ शकेल अशी आशा वाटते. त्या प्रयोगावर बंदी घालणारे विधेयक सिनेटमध्ये मांडण्याचा विचार रद्द करून डॉ. डॅनिएलला ते भेटायला बोलवतात. एका कारमध्ये ही भेट होते. त्या भेटीत सिनेटर डॉ. डॅनिएलला आधी तो डॉ. डॅनिएलला ऑफर देतो, मी हे विधायक आणण्याचा निर्णय रद्द करतो. मात्र तू माझ्या पार्किन्सनला जबाबदार असणाऱ्या दूषित पेशींच्या जागी तुझ्या तंत्राने नव्या निरोगी पेशी स्थापित कर. हे काम अत्यंत गुप्तपणे व्हायला हवे. त्यासाठी कितीही खर्च आला तरी चालेल. ही उपाययोजना करायला अमेरिकेत कायद्याने बंदी आहे. तेव्हा ती आपण बहामा देशातील नसाऊ येथील एका अत्यंत अद्ययावत क्लिनिकमध्ये करू. डॉ. डॅनिएलला सिनेटरच्या या सगळ्या उतावीळ योजनेबद्दल साशंकता वाटते. तो त्याला म्हणतो, ‘हे सर्व हास्यास्पद आहे. एकतर प्रत्यक्ष प्राण्यांवर आमचे प्रयोग अजून चालू आहेत.‘पण मी स्वत: गिनीपिक व्हायला तयार आहे. तुमची एचटीएसआर पद्धत वापरून मला गुप्तपणे बरं केलंत तर मी माझं एस ११०३ हे बिल उपसमितीकडून पुढं सरकणार नाही अशी व्यवस्था करीन. पुढे अॅशले बटलर आणखी एक सूचना करतो, ‘माझे वडील बॅप्टिस्ट धर्मगुरू होते. आई आयरिश कॅथलिक... तिची येशू खिस्तावर भयंकर श्रद्धा होती... ट्युरीनच्या चर्चमधील कफनाबद्दलची आख्यायिका ती मला नेहमी सांगायची. हे जे कफन आहे ते प्रत्यक्ष येशूच्या शरीराभोवती गुंडाळलेले होते... रेडिओकार्बन कालमापन पद्धतीनसुार ते कफन तेराव्या शतकातलं असल्याचं संशोधन झालेलं असलं तरी माझ्या आईच्या हृदयात त्या कफनाला मोठं स्थान होतं. तिनं मला लहानपणी ते कफन दाखवायला मुद्दाम नेलं होतं. त्या कफनाच्या कापडावर रक्ताचे डाग आहेत. ते रक्त प्रत्यक्ष येशूचे आहे अशी तिचीही श्रद्धा होती. माझ्या उपचारासाठी वापरात जाणारा डीएनएचा रेणू त्या कफनावरच्या रक्तातून घ्यावा अशी माझी इच्छा आहे.’ सिनेटर बटलरला आपल्या पार्किन्सन विकारावर डॉ. डॅनिएलने एसटीएसआर तंत्राने गुप्तपणे उपचार करावा असे वाटते. त्यासाठी तो त्याला प्रस्तावित विधेयक जाणार नाही असे आमिष दाखवतो. हॉस्पिटलची व खर्चाची व्यवस्था करायची तयारी दाखवतो. आवश्यक ते डीएनएरेणू मात्र येशू खिस्ताच्या कफनावरील रक्ताच्या डागातून घ्यावेत, अशी भावनात्मक इच्छा व्यक्त करतो.डॉ. डॅनिएलची सहकारी डॉ. स्टेफनी डी अगोस्टिनो हिच्या भावाने दोन लाख डॉलर्स डॉ. डॅनिएलच्या क्युअर या औषधनिर्मिती संस्थेत गुंतवलेले असतात. ते पैसे लवकर परत मिळावे म्हणून त्यांचा तगादा असतो. डॉ. स्टेफनी म्हणते, ‘डॉ. लोवेलने शोधलेल्या पद्धतीबद्दल आणि उपचारसाठी क्लोनिंग करणे याबद्दल मला विश्वास वाटू लागलाय... या वेळी काहीतरी तांत्रिक गडबड झाली. पण त्याचा पार्किन्सन विकार बरा झाला हेही खरं आहे.