मुखपृष्ठ
सिक्स मशीन

माझे शेल्फ

सिक्स मशीन

इंग्रजी शीर्षक
Six Machine
सारांश

क्रिकेटमधला मस्त कलंदर!... काही व्यक्तिमत्त्वेच अशी असतात, की त्यांनी केलेल्या काही गोष्टी या फक्त त्यांनाच शोभून दिसतात. अशा व्यक्ती आयुष्यभर वादग्रस्त ठरतात, किंबहुना वादांशी त्यांचे अतूट नाते असते. त्यात त्यांना विशेष वावगे वाटत देखील नाही. मी आह हा असा आहे, पटत असेल तर समजून घ्या, नाही तर मी माझ्या शैलीत जगू देणाऱ्या दुसऱ्या जगात जायला मोकळा, अशी ‘स्वच्छंद’ जीवनशैली जगलेल्या आणि जगणाऱ्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांमध्ये जगातला सर्वाधिक खतरनाक सलामीचा फलंदाज म्हणून जगविख्यात झालेल्या खिस गेलच समावेश होतो. जे करायचे ते मनापासून आणि भरभरून. मग ते क्रिकेटवरचे प्रेम असो, तडाखेबंद खेळी अन फटक्यांवर जडलेला जीव असो की फटाकड्या मुलींचा संग असो. दोन्ही खेळच आहेत आणि ते तितक्याच मनमोकळ्या पद्धतीने खेळायचे, त्यात लपवाछपव कशाला? असा त्याच्या लेखी सरळ-साधा जीवनमार्ग असलेल्या खिसच्या जीवनाचे बालपणापासूनचे रंग ‘खिस गेल सिक्स मशीन’ या पुस्तकातून वाचकांसमोर येतात. जमैकातील किगस्टनमधला त्याचा जन्म आणि त्याच्या बालपणाचे अनेकानेक किस्से या पुस्तकात आहेत. सात सावत्र भावंडांमध्ये खिस सहावा. या सहा क्रमांकाशी खिसचे नाते जन्मापासूनच जे चिकटले ते अजतागायत कायम आहे. जगभरातील बहुतांश मैदानावर षटकारांचा पाऊस पाडलेल्या गेलला त्यामुळेच ‘सिक्सर्सचा बादशहा’ ही उपाधी मिळाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा एकमेवाद्वितीय पराक्रमदेखील केवळ त्याच्याच नावावर आहे. तसेच कसोटीत दोन त्रिशतके झळकवलेल्या जगातील केवळ चार फलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ब्रायन लारापेक्षा जास्त शतके आहेत. हे सारं काही असलं तरी त्याचा जन्म जणू ट्वेन्टी-२०च्या युगासाठीच झाला असावा, अशीच त्याची शैली आहे. या प्रकारात सर्वाधिक धावा, धावांची सर्वाधिक सरासरी, सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आणि कुणाही एका खेळाडूने मारलेल्या षटकारांच्या दुपटीहून अधिक षटकार गेलच्या नावावर जमा आहेत. या प्रकारातील पहिले शतकदेखील गेलच्याच नावावर आहे. जगातील पाचही खंडांतील सोळा संघांकडून तो खेळत आलाय आणि अजूनही खेळतो. प्रत्येक महिन्यात जगातल्या कुठल्या लीगमध्ये खेळायचे, त्याचे वेळापत्रकदेखील ठरून गेले आहे. अनेक संघांमधून खेळत असल्याने त्याला अनेकदा संघसहकाऱ्यांची नावेदेखील माहिती नसतात. मग त्यावर त्याने शोधून काढलेला उपाय म्हणजे ‘काय ब्रो कसा आहेस?’ असे म्हणत संवाद साधणे. तसेच त्या खेळाडूने त्याच्या नावाचा शर्ट अंगात घातल्यावर त्याच्या पाठीवरील नाव वाचून त्याला नावाने हाक मारण्याचे फंडे त्याने मोठ्या गमतीशीर शैलीत सांगितले आहेत. अनेक संघांकडून खेळण्यामुळे कुणी त्याला ‘भाडोत्री सैनिक’ म्हणून डिवचण्याचा प्रयास केला तरी तो चिडत नाही.तुम्ही मला काहीही म्हणा. मी जिथे जाईन तिथे खेळाचा आनंद लुटतो. तसाच तेथील खान-पान आणि नाइट लाइफचादेखील, असे त्याचे त्यावरचे उत्तर असते. रात्री उशिरापर्यंत, किंबहुना सकाळपर्यंत पार्टी करायची, मनसोक्त नाचत नाइट क्लबमध्ये धमाल करायची. दुसऱ्या दिवशी उशिरा म्हणजे जवळपास दुपारीच उठून मग दिवसाला प्रारंभ करायचा, अशी जीवनशैली जीवनाच्या यशस्वितेच्या टप्प्यात उपभोगत असलेल्या गेलचा भूतकाळ मात्र खूप विपरीत आणि विपन्नावस्थेतील होता, किंबहुना या यशापूर्वीच्या काळात क्रिकेटच्या ध्यासापोटी गेलने किती अतोनात कष्ट घेतले, त्याचेदेखील वर्णन पुस्तकात सविस्तर आले आहे. किगस्टन मैदानाच्या भिंतीलगतच असलेले त्याचे ते पत्र्याचे छोटे घर, घरात भावंडांच्या दाटीवाटीत झोपायलादेखील न पुरणारी जागा, अपुरे अन्न, कधी तरी खिसमससारख्या सणासुदीला मिळणारी मांसाच्या तुकड्यांची मेजवानी असे दारिद्र्यातील बालपण सांगतानादेखील कुठेही सहानुभूती मिळवण्याचा किंवा त्यातून कुणाच्याही मनात कणव निर्माण करण्याचा उद्देश जाणवत नाही. जे आहे, जसे होते तसे केवळ सांगण्याचा प्रामाणिकपणातूनच ते सारे उल्लेख आल्याचे दिसून येतात. स्वत:ची गोड छबी रंगवून दाखवण्यात त्याला अजिबात रस नाही. त्यामुळे दुसऱ्याच प्रकरणात त्याचे वर्णन करताना मी एक विचित्र आणि विक्षिप्त माणूस असल्याचे सांगून तो मोकळा होतो. तुम्ही मला ओळखता, असे तुम्हाला वाटत असेल, मात्र ते काही खरे नाही. तुम्ही मला ओळखूच शकत नाही. तुम्ही मला जाणून घेण्याचा प्रयासदेखील करू नका. माझं व्यक्तिमत्त्व खूप गुंतागुंतीचं आहे, हे तोच त्याच्याकडून सांगून मोकळा होतो. मी कधी गमतीजमती करतो, कधी शांतपणे बसून राहतो, कधी बुजरा बनतो, कधी बिनधास्त असतो, कधी माझ्या मिठास वाणीने सगळ्यांना खूश करायला पाहतो, तर कधी मनाची सर्व कवाडं बंद करून एकांतात राहतो. अशी आपलीच सर्व रूपं सांगून तो सगळ्यांना बुचकळ्यात पाडतो.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद