मुखपृष्ठ
शिस्तीचा बळी

माझे शेल्फ

शिस्तीचा बळी

इंग्रजी शीर्षक
Shisticha Bali
सारांश

समुद्रसफरीतील रोमहर्षक कादंबरी... ‘टैंपी’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आणि तनामनाने दर्यावर्दी असलेले हर्मन मेलव्हिल यांनी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात लिहिलेल्या आणि मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या ‘बिली बड’ या कादंबरीचा मराठी अनुवाद ‘शिस्तीचा बळी’ ा नावाने प्रसिद्ध झाला आहे. इन्डॉमिटेबल’ युद्धनौकेवरील खलाशी बिली बडला त्याचे सहकारी अडचणीत आणत असतात. जॉन क्लॅगार्ट हा निशाण खात्याचा प्रमुख या सगळ्या प्रकारामागे आहे, असं या युद्ध नौकेवरचा अनुभवी पण वयस्कर खलाशी लास्कर, बिलीला वारंवार सांगतो; एके दिवशी अगदी सहजपणे जॉनचं खरं रूप बिलीच्या समोर येतं. काय होतं तेव्हा?त्यातून बिली खवळून उठतो आणि युद्धनौकेवर खळबळ माजते. बिलीवरचा आरोप नौदलाची शिस्त आणि मानवी मनाची जडणघडण यात हे रोमहर्षक कथानक पुढे सरकत राहते.साहित्याचा घेतलेला हा शोध... एकूणच लेखकांना घाऊकरीत्या विसरले जाण्याच्या या आरंभ काळात मेहता पब्लिशिंग हाऊसने वेगवेगळ्या कारणांनी गतस्मृत झालेल्या भानू शिरधनकर यांच्या दोन अनुवादित पुस्तकांच्या केलेल्या जीर्णोद्धाराची घटना ही आजच्या वाचकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. एकोणीसशे चाळीस ते सत्तर या काळात अफाट लेखनप्रपंच करून या लेखकाने मराठी साहित्याला अत्यंत नवख्या असलेल्या विषयांची भर घातली होती. वाचनवेड, प्राणी-पक्षी, सागरी साहस, गुन्हेगारी विश्व, समुद्रामार्गे होणारी सोन्याची तस्करी, क्रीडा अशा सर्वच विषयांवर भाषिक सामर्थ्याने त्यांनी लेखणी चालवली. चाळीसच्या दशकापासून शिरधनकर यांनी ‘किर्लोस्कर’मध्ये सागरी जीवनावरच्या आपल्या आणि इतरांकडून ऐकलेल्या अनुभवांना शब्दबद्ध करण्यास सुरुवात केली. ‘उधानवारा’, ‘सागर संग्राम’, ‘शिमाळ आलं, शिमाळ आलं!!’ ही रिपोर्ताजरूपी लेखांची सागरी जीवनावरील इत्थंभूत माहिती देणारी मराठीतील पहिली-वहिली पुस्तके शिरधनकर यांच्या नावावर आहेत. त्यामुळे जगप्रसिद्ध अमेरिकी लेखक हर्मन मेलविल यांच्या एकोणिसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘बिली बड’ आणि ‘टायपी’ या सागरी जीवनावरच्या कादंबऱ्या त्यांच्याजवळ अनुवादासाठी आल्या असाव्यात. १९६६ साली दोन्ही कादंबऱ्या ‘पाचूचे बेट’ आणि ‘शिस्तीचा बळी’ या नावाने एकाच पुस्तकाद्वारे प्रकाशित झाल्या होत्या.

आता फेलनचे वारसदार व रॅचेलचे वकील यांच्यात जबरदस्त कायदेशीर लढाई सुरू होते. फेलनच्या वारसदारांना सत्याची चाड नसतेच. त्याकरता खोटे साक्षीदार उभे करून ते मृत्युपत्राच्या वैधतेला आव्हान देतात. नेट हा अत्यंत हुशार वकील असल्याने तो त्या साक्षीदारांच्या साक्षीच्या चिंधड्या उडवतो व साक्षीदारांना उघडे पाडतो. अद्याप रॅचेलच्या सह्या मिळालेल्या नसतातच. नेटला तिच्या मन:स्थितीची जाणीव असल्याने ते तडजोडीचा प्रस्ताव मांडतात, ज्याद्वारे प्रत्येक वारसदाराला ५० मिलीयन डॉलर मिळतात, उरलेली संपत्ती रॅचेलला मिळण्याची तडजोड होते. अर्थात वारसदारांना हे घबाड आयतेच मिळते, वकिलांना कमिशन मिळते. रॅचेलला पटवून देऊन ह्या रकमेचा ‘रॅचेल ट्रस्ट’ स्थापन करून काही योग्य अटी ठरवून हा पैसा वापरावा असे ठरते. त्याकरता रॅचेलची संमती आवश्यक असते. अर्थात ते काम करण्याकरता नेटचीच नियुक्ती होते. आता पूर्वीपेक्षा जास्त माहिती व पैसा उपलब्ध असल्याने नेट कोरुंबाहून पेंटॅनलला आपले ब्राझीलमधील जुने सहकारी व एक अद्ययावत विमान घेऊन जातो. तेथे गेल्यावर गावकरी, गावचा मुखिया यांच्याद्वारे त्यांचे अत्यंत थंडपणाने स्वागत होते किंवा जवळजवळ येथे का आलात? अशीच त्यांची प्रतिक्रिया असते. नेट भांबावतो. पण चौकशीअंती रॅचेल काही काळापूर्वी मृत्यू पावल्याचे त्याला समजते. मुखिया तिच्या झोपडीजवळ नेटला नेतो. तेथे नेटला काही कागद मिळतात. त्यापैकी एक रॅचेलचे कायदेशीर मृत्युपत्र असते. मृत्युपत्राद्वारे ती मिळणारी संपत्ती नाकारत नाही. तर त्याचा एक ट्रस्ट बनवून मिळणारे उत्पन्न जगात आदिवासी कल्याण संघाचे काम चालू ठेवणे, खिस्ताच्या शिकवणुकीचा जगभर प्रसार करणे, आदिवासींच्या अधिकारांची जपणूक, भुकेलेल्यांना अन्न, रुग्णांना औषधे, लहान मुलांचे योग्य पोषण यासाठी वापरावी, ट्रस्टचा प्रमुख म्हणून नेट ओ रॉयले यांना नेमावे अशी इच्छा व्यक्त करते. अनुवाद फार सुरेख जमला आहे. भाषा प्रवाही व सोपी आहे. पण आशयाला कोठेही धक्का लागलेला नाही. जरूर वाचावी अशी कादंबरी.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद