मुखपृष्ठ
सियालकोट गाथा

माझे शेल्फ

सियालकोट गाथा

इंग्रजी शीर्षक
Sialkot Gatha
सारांश

स्वातंत्र्योत्तर भारतात घडणारी सियालकोट गाथा ही कथा आहे दोन व्यासायिकांच्या शत्रुत्वाची. अरबाझ आणि अरविंद.. फाळणीच्या वेळी सियालकोट वरून भारतात येण्यासाठी निघालेल्या शेवटच्या ट्रेनमध्ये ही गोष्ट सुरु होते. त्यानंतर कथा कलकत्ता आणि मुंबईमध्ये घडते. जवाहरलाल नेहरू ते मनमोहनसिंग असे सर्व पंतप्रधान पाहिलेली दोन मुलं आपल्या आपल्या आयुष्यात मोठी मोठी होत जातात. ते दोघे भारतातील महत्वाच्या व्यक्तींच्या यादीत येतात. मंत्रिपदापासून समित्यांच्या अध्यक्ष पदापर्यंतची निरनिराळी पदं भूषवतात. त्यांच्या वैयक्तिक वाढीसोबत त्यांच्यामधले शत्रुत्व वाढत जाते. त्यांच्या शत्रुत्वाच्या कथेसोबत येते समकालीन भारताची कथा. सत्तांतरे, गरिबी हटाव पासून रथयात्रेपर्यंतच्या मोठ्या घटना, लातूर-भुजच्या भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती, साखळी बॉम्ब पासून २६/११ पर्यंतचे दहशतवादी हल्ले.. असा भारताचा सर्व महत्वाचा समकालीन इतिहास कथेमध्ये अगदी सहज येतो आणि वाचणाऱ्या प्रत्येक भारतीयाला कथानकाशी जोडून घेतो. या समकालीन इतिहासाला लेखकाने जोडले आहे महाराजा अशोकाच्या काळातील एका कथानकाशी. तेव्हापासून जतन केलेले गुपित पुढच्या पुढच्या पिढीकडे कसे सोपवले जाते आणि आपल्या समृद्ध आणि सुवर्ण इतिहासासमोर आजचे शत्रुत्व कसे फिके पडते हे सांगणारे सियालकोट सागा हे पुस्तक. लाखो प्रतींची विक्रमी विक्री झालेले आणि एका बैठकीत वाचून पूर्ण करावे असे. कारुण्य, उत्कंठा, शत्रुत्व, प्रेम, योगायोग यांचा अपूर्व संगम असणारे सियालकोट गाथा.

तू ज्याचा शोध घेत होतीस ते तुला शोधतं आलं शेवटी.`` आपल्यावर प्रेम करणारा पुरुष लाभला -एवढचं तिला हिराच्या सुखाचं कारण वाटत नाही. तर निसर्ग, एकान्त अज्ञातवास हाही माणसाला अंतर्मुख करतो; आपल्याला काय हवं नको याचं भानं त्यामुळं येतं. स्नेह हाही आश्वासक असतो -असे अंजनीला वाटते. अनमोल हिराला नेने हे अचूक कोदण ठरेल असे ती मानते. माधवी देसाई यांची जीवनाकडे, स्त्री-पुरुष सहवासाकडे, नातेसंबंधांकडे, जगाकडे पाहण्याची दृष्टी आदर्शवादी आहे तशीच समंजसपणाची आहे. नियती या जीवनात खूप घोळ घालते, वादळे उठवते. पण मानवी मनाचा चांगुलपणा, भलेपणा त्या नियतीच्या भल्याबुऱ्या आघातांनीही पूर्णतया निष्प्रभ कधी होत नाही; तो टिकूनच राहतो. आपल्या आणि इतरांच्या दु:खवेदनांवर तो फुंकर घालतो. काळ हा देखील ही फुंकर घालण्यात पटाईत असतो. तरीही नियतीचे काही हिशेब असतातच. एकेकाचे भवितव्य घडवताना नियती त्या हिशेबाप्रमाणे खूप काही घडवून जमा-खर्चाच्या बाजूंची तोंड मिळवणी साधन असते. समानधर्म्याना जवळ आणत असते; आयुष्यात नवा आशय व अर्थ भरत असते. वेगवेगळे प्रश्न -कथावस्तूच्या पार्श्वभूमीसाठी निवडण्यातही माधवी देसाई यांची विविधतेची हौस जाणवते. भरपूर तपशील असणाऱ्या मेलोड्रॅमॅटिक परंपरेतल्या नाट्यपूर्ण घटनाप्रचुर कथांचा बाज त्यांना प्रिय आहे. बहुसंख्य वाचकांनाही त्यामुळे माधवी देसाई यांच्या कथा आकृष्ट करतात. अल्पावधीत निघालेले सहा संग्रह हे त्याचीच तर साक्ष पटवतात.

जातोय कुठे दिलावर? दिवसभर भटकलेला राही रात्री घरी येतोच ना? तसं दिलावरला यावं लागेल. तुझे सूर त्याला खेचून आणतील.`` लग्नाला वर्ष होऊनही सगुणाला तिचा नवरा विश्वास देशमुख अस्पर्शितच ठेवतो हे कळल्यावर सगुणाची मैत्रीण आसमा अस्वस्थ होते. सगुणा हे कोणालाही कळू देत नाही; कारण आपल्या नवऱ्याचे दु:ख तिला ठाऊक असते. त्याची एकेकाळची प्रेयसी स्वप्ना हिच्यावर गुंड बलात्कार करतात; पुराव्याअभावी गुंड निर्दोषी म्हणुन सुटतात, स्वप्नाचे लग्न मोडते. ...या कथेला लेखिका नंतर वेगळीच कलाटणी देतात. एकदा स्वप्ना कर्तव्यभावनेने रक्तदान करायला येते तेव्हा डॉक्टर तिच्या रक्ताची तपासणी करतात आणि तुमचं रक्त चालणार नाही म्हणतात. कारण रक्तात एच.आय.व्ही. पॉझिटिव्हची लक्षणे दिसतात. जगावर सूड उगवायचा म्हणून ती विश्वासला जवळ करते. त्याच्याबरोबर फार्महाऊसवर दोन महिने राहते... आणि विश्वासची तब्येत झपाट्याने बिघडत जाते. तपासणीत कळते की तोही एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह आहे. सगुणा त्याची सेवाशुश्रुषा करते... पण दुसरीकडे देवाला धन्यवाद देते. कारण विश्वासने तिला स्पर्शही केलेला नसतो. आसमा म्हणते,``विश्वास दुबळा होता; आणि स्वप्ना नियतीची शिकार. तसं तर तूही नियतीचाच बळी. तू धीरानं वाटचाल केलीस... दया, क्षमा, शांती, धैर्याची पुतळी... या जगात तुझ्यासारखी माणसं आहेत म्हणून तर हे जग सुंदर आहे.`` आसमा तिला नंतर म्हणते,``या घराशी तुझा असलेला ऋणानुबंध संपला. तू आता माझ्याकडे राहा. शिक्षण पूर्ण कर... विश्वासानं जग. खचू नकोस. जे घडेल ते चांगलेच असणार यावर विश्वास ठेव.`` सगुणाची ही कथा नियतीच्या वादळवाऱ्यातही आसमाच्या दमदार मैत्रीच्या रूपात तिच्यातील आशावाद अभंग ठेवते. खानदानी कुळातील राजाक्का ही सुरजित हा वयस्क नवरा आपल्या नशिबी आला म्हणून नाराज असते. याच्यापासून आपल्याला मूल होता कामा नये असे ठरवते. तिला आवडलेला कुलदीप या तरुणाचे लग्न दुसऱ्याच कोणा मुलीशी झालेलं होतं. त्याचा राग तिच्या मनात होता. तरीही वीस वर्षं सुरजितचा संसार ती सजवते. सुरजितचे अचानक देहावसान होते; तेव्हा गुणाक्काचा विशीतला मुलगा चंद्रहास तिला माहेरी न्यायला येतो. गुणाक्का त्याला जन्म देताच मेलेली असते, त्याचे वडीलही जातात. आजीने त्याला वाढविलेले असते. चंद्राहासला बघितल्यावर राजाक्काला आपल्या जगण्याचे प्रयोजन सापडते. ती माहेरी येते. माहेरचा ताबा घेते. घरातले मासाहेबांचे साम्राज्य आपल्या हाती घेते. सारेजण तिला अघोरी म्हणतात. राजाक्काच्या अशा वागण्याने मासाहेबांचा मृत्यू होतो. चंद्रहासचे एका मुलीवर प्रेम जडते. तो तिची आपल्या मावशीशी ओळख करून देतो. आता चंद्रहास आपल्याला दुरावणार या भावनेनं राजाक्काचं मन, शरीर अतिशय अस्वस्थ होते. त्या धक्क्यानंच तिला मृत्यू येतो. आपल्या मावशीच्या अस्थिविसर्जनासाठी चंद्रहास नाशिकला जातो. बोटीतून प्रवाहाच्या मध्यभागी जाऊन अस्थींचा कलश सोडण्यासाठी वाकतो; आणि नदीत पडतो. गटांगळ्या खाऊ लागतो. शेवटी अघोरीनं डाव साधला असे रघुभटजी म्हणतो... अशा अघोरीसारख्या कथेतही लेखिका अनेक कथासूत्रांची गुंफण करून कथेतली गुंतागुंत वाढवत जातात. अपघात योगायोग यांची रेलचेल त्यांच्या कथानकांची गाडी त्यांना अनपेक्षित त्या दिशेने वळवणे सुलभ करते. राजाक्काची आयुष्यभराची अतृप्ती. तिला अंतच नाही. त्याच्या उतारवयात त्यांना तृप्तीचे केवळ क्षणिक दर्शन होते. पण ती केवळ हुलकावणी ठरते. ``या शरीराच्या आत एक मनं असतं. त्या मनाला बरंच काही हवं असतं. चांगलं आणि वाईटही.`` हे नेल्सीचे शब्द गोव्याहून परतताना इन्स्पेक्टर चंद्रहासच्या जीवनाला झोके देत राहतात. साठीतली नेल्सी डान्टस् पन्नाशीतल्या चंद्रहासला आपल्या थॉमसबरोबरच्या सुखी सहजीवनाची कहाणी सांगते आणि त्याला म्हणते, ``चंद्रासाब, मला सोबतीची, मैत्रीची खूप गरज आहे. आता या साठ वर्षांच्या शरीराला काहीच नको आहे. पण शरीराच्या आत जे मन असतं ना त्याला खूप काही हवं असतं... त्यासाठी एक चांगली मैत्री हवी. चांगला सहवास हवा. द्याल तुम्ही तशी मैत्री! सर, बंगलीत याल राहायला?`` अरुंधतीच्या रूपात स्त्री जीवनाची कलंकित बाजू बघितलेल्या चंद्रहासला ही लखलखीत चांदणी जीवनाचे एक नवेच दर्शन घडवते; पण त्यामुळेच या कॅथॉलिक श्रीमंत भाटकरणीच्या त्या विनवणीला प्रतिसाद देणे जड वाटते. उंच गेलेला झोका कधीच उंचीवर टिकत नाही... उंचीवर गेल्यावर क्षणभर दिसलेलं दृश्य मनात साठवून खाली जमिनीवर उतरायचं असतं असा विचार त्याच्या मनात घोळत राहतो. अनमोल हिरा ही कथा अंजनी, सुरंगा, हिरा या तीन मैत्रिणींच्या जीवनकथांची गुंफण करणारी कहाणी . वयस्कर हिराला नेनेसारखा निस्सीम प्रेम करणारा माणूस लाभला, तर अज्ञातवासात एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी राहण्यातही सुख लाभू नये असे म्हणून अंजनी सुरंगाची समजूत काढते आणि हिराला निरोप देताना सांगते.``जा हिरा विश्वासानं जा.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद