मुखपृष्ठ
स्लमडॉग मिलेनिअर

माझे शेल्फ

स्लमडॉग मिलेनिअर

इंग्रजी शीर्षक
Slumdog Millionaire
सारांश

प्रवाही अनुवाद... ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटानं इतिहास घडवला, तो जाणकारांना ज्ञात आहेत. हा चित्रपट ज्या ‘क्यू अॅण्ड ए’ या कादंबरीवर आधारित आहे त्या कादंबरीचा अनुवाद वंदना अत्रे यांनी ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या नावानं केला आहे. मूळ लेखक विकास स्वरूप. ुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसनं त्याचं प्रकाशन केलंय. एका साध्या हॉटेलातील वेअर ‘हू विल विन अ बिलिअन’ या क्विझ शोमध्ये अवघड प्रश्नांची अचूक उत्तरं देत शंभर कोटी जिंकतो. हे सारं स्वप्नवत. ज्या मुलानं शाळेचं तोंड पाहिलेलं नाही, ज्याचा शिक्षणाशी काडीमात्र संबंध आलेला नाही, जो आजवरचं जीवन बेवारसपणे जगलाय, रोज उगवणाऱ्या दिवसाचं ‘आव्हान’ घेत जो जीवनाशी भांडलाय, ध्येयहीन जीवन जगणारा एक अतिसामान्य मुलगा क्विझ शोमधील सारे प्रश्न सोडवतो; ही एक अविश्वसनीय, विलक्षण घटना. हा विजेता म्हणजे लावारिस राम मोहम्मद थॉमस अशा विचित्र नावाचा! या राम मोहम्मद थॉमसची ही जीवनकहाणी. पण ही काही सामान्य माणसाच्या असामान्य कर्तृत्वाची प्रातिनिधिक कथा होत नाही. पण ती होते सत-असत्, दृष्ट-सुष्ट, संस्कार-संस्कारहीन, तत्त्वशील-तत्त्वशून्य, पाप-पुण्याच्या संघर्षाची. त्यातून अधोरेखित होणारा संदेश फार मोलाचा. सुदैव, नशीब यावर हवाला ठेवण्यापेक्षा स्वकर्तृत्वावर विश्वास असायला हवा. विकास स्वरूप नायकाच्या तोंडून आपला संदेश देताना म्हणतात, ‘नशीब आपल्यामधूनच आकार घेतं...’ ज्याचं त्याचं नशीब हे ज्यानं त्यानं स्वत:च घडवायला हवं. ही कहाणी फ्लॅशबॅक पद्धतीनं सांगितली आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराशी त्याच्या आयुष्यातील घटनांचा संबंध येतो. म्हणूनच तो आत्मविश्वासपूर्वक साऱ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. झोपडपट्टीचं विदारक जिणं, शिवाय त्यांच्याकडे पाहण्याचा साऱ्या यंत्रणेचा, व्यवस्थेचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन यातून प्रकर्षानं जाणवतो. नायकाच्या नावाचं रहस्य. त्याच्या तिन्ही धर्मियांनी दाखवलेला अधिकार हा मानवी जीवनावरचं धर्माचं असणारं प्राबल्य स्पष्ट करतो. रामच्या आयुष्यातील एकेक घटना त्याला ‘जीवन’ म्हणजे काय हे शिकवणारी. त्यातून त्याला मिळणारे धडे, ज्ञान हे शाळा-विद्यालयातील अभ्यासक्रमापेक्षा भिन्न आणि अनमोलही! तो म्हणतो, ‘तुमच्या स्वप्नांची ताकद फक्त तुमच्या मनापुरती असते. या स्वप्नांना पैशाचं पाठबळ असेल तर इतरांच्या मनावर पण तुम्ही प्रभाव टाकू शकता.’ सभोवतालचं वास्तव सांगताना तो म्हणतो, ‘कळकट-तुटक्या, गळक्या झोपड्यांतून राहणाऱ्या लोकांसाठी आयुष्य हा शाप असतो... गर्दीनं गजबजलेल्या चाळीत राहणारी माणसं आयुष्य फक्त ढकलत असतात.’ पण हे तत्त्वज्ञान सांगताना नायक कुठंही आव आणत नाही की मुखवटे पांघरून दांभिकपणा करत नाही. त्याचं निवेदन थेट कुठचीही भीडमुर्वत न ठेवता केलेलं आणि स्वच्छ, प्रामाणिक, पारदर्शी आहे. त्यातील शेवटचा ट्विस्टही बोलका, मार्मिक आहे. उदा. ‘युद्ध ही फार गंभीर गोष्ट आहे. ती प्राण घेते.’ तर प्रेमासारख्या नाजूक अनुभवाविषयी तो म्हणतो, ‘प्रेम असे एका क्षणात होत नसते, ते अलगद तुमच्या आयुष्यात प्रवेश करते आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण तजेलदार, रंगीत बनवते आणि तुमच्या स्वप्नांना व्यापून उरते.’ कालौघात लेखक उपमाही समर्पक, प्रभावी योजतो. उदा. हातातील गोट्या फरशीवर सांडाव्या तसे ते स्वर खोलीभर विखुरले. ‘किंवा व्यक्तिमत्त्व स्पष्ट करताना झाडावर एखादं पानही चुकीच्या जागी उगवलेलं लाजवंतीला आवडत नाही.’ असं लाजवंतीचं वर्णन करतो. सुभाषितात्मक वाक्यही अनुभवातून आलेली आहेत. उदा. ‘जेव्हा तुम्ही स्वत:च आतून खचलेले असता तेव्हा इतरांना धीर देणे फार अवघड असते.’ किंवा ‘स्वप्न जेवढे मोठे, तेवढा अपेक्षाभंगही मोठा.’ मात्र हा अनुवाद वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे. मूळ मराठीत पुस्तक लिहिल्यासारखा अनुवाद प्रवाही आणि प्रभावी झालाय.

त्याच्या आयुष्यातील कटू-गोड आठवणी, झालेले वादविवाद, मित्रांमधील हेवेदावे, बालपणातील बुजरा खिस हे गुलछबू पुरुष बनलेला खिस गेल असा प्रवास त्याने भारतीय नजरेतून पाहता जरा जास्तच मनमोकळ्या पद्धतीने उलगडून दाखवले आहेत. या जीवनचरित्रात गेल कधी त्याच्या आयुष्याचे तत्त्वज्ञान सांगतो, कधी क्रिकेटच्या डाव उभारणीच्या टिप्स देतो, कधी मुली-बायका पटवण्याच्या त्याच्या पूर्वायुष्यातील युक्त्या असं काहीही त्याच्या मनाला वाटेल तसे तो सांगतो. प्रत्येक कठीण प्रसंगी मोकळ्या हवेत जा, छाती भरून श्वास घे, स्वत:चं ध्येय निश्चित कर, मोकळ्या श्वासाबरोबर डोक्यातला राग विरून जाऊ दे अन् पुढे चल, हे त्याचे तत्त्वज्ञानदेखील तो अनेक ठिकाणी उद्धृत करतो. बालपणी भोगलेल्या दारिद्र्यामुळे जीवनात प्रचंड पैसा कमावण्याची इच्छा, स्वत:चे आलिशान घर, घरात आपल्या आईवडिलांसह सावत्र भावंडं आणि जिवलग मित्रांसाठी बांधलेल्या स्वतंत्र खोल्या, त्याच घरात त्याने उभारलेला आवडता डान्स बार असं सारं काही समरसून जगणाऱ्या गेलच्या आयुष्यातील बहुतांश प्रमुख घटनांचे मनोवेधक चित्रण पुस्तकात करण्यात आले आहे. खेळायचे ते जिंकण्यासाठी नव्हे, तर प्रेक्षकांना खूश करण्यासाठी आणि जगायचे ते आपल्याच मस्तीत असा कलंदरी खाक्या असलेल्या गेलच्या जीवनाचे आंतरबाह्य दर्शन घडवण्याचे काम या पुस्तकातून होते. तरीही त्याच्याच भाषेत सांगायचे झाल्यास हे माझे आयुष्य आहे, ते मी माझ्या पद्धतीने जगणार. आधी स्वत:ला खूश ठेवणार, मग इतरांना. शून्यातून आपले विश्व उभे केलेल्या एका असामान्य क्रिकेटपटूची आणि स्वत्व हरवू ने देणाऱ्या लढवय्या वृत्तीच्या खेळाडूचे हे आत्मकथन वाचताना मनात अनेक भावतरंग उमटतात. या पुस्तकातील एकमेव दोष म्हणजे संपूर्ण जीवनातील घटनाक्रम सांगताना तो कलासुसंगतपणे मांडला गेलेला नाही. गेलला ज्या आठवणी आधी आठवल्या त्या आधी आणि जे किस्से नंतर आठवले ते नंतर अशा अगदी मनमुक्त शैलीत त्याचा जीवनक्रम समोर येतो. मग वाचकाला त्यातील कालसंगती लावून घेण्यासाठी क्षणभर थांबून त्याची कलासंगती लावत बसावे लागते. बाकी पुस्तकातील गेलच्या बालपणीची छायाचित्रे, बालमित्र, त्याचे जुने घर, आई, वडील, प्रशिक्षक अशी छायाचित्रे वाचकाला मनमुराद आनंद देतात.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद