माझे शेल्फ

समरधुरंधर संभाजी महाराज ( अध्याय 1 – बुऱ्हाणपूरची लूट )

सारांश

कादंबरीच्या पहिल्या अध्यायात – “बुऱ्हाणपूरची लूट” – शंभूराजांच्या या थरारक मोहिमेचा वेध घेतला आहे. ही अचाट मोहीम नेमकी कशी आखली गेली? तिच्यामागे शंभूराजांचे दूरगामी नियोजन काय होते? मुघलांच्या डोळ्यांत धूळ फेकून स्वराज्याचे सैन्य बुऱ्हाणपूरपर्यंत कसे पोहोचले? मातब्बर मुघल सुभेदार बहादूरखानाला कशा प्रकारे आव्हान दिले गेले? आणि बुऱ्हाणपूरचा खजिना हस्तगत केल्यानंतर स्वराज्याचे सैन्य सुरक्षितपणे परत कसेले?

या सर्व प्रश्नांची उत्तरे “समरधुरंधर संभाजी महाराज” या कादंबरीच्या रोमहर्षक कथानकातून उलगडत जातात. इतिहासातील या महत्त्वपूर्ण प्रसंगाला लेखक प्रेम धांडे यांनी कादंबरीच्या प्रभावी आणि उत्कंठावर्धक शैलीत मांडले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याची युद्धनीती आणि बुऱ्हाणपूरच्या धाडसी मोहिमेचा इतिहास कादंबरीच्या रूपात अनुभवण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी