मुखपृष्ठ
स्नेहधारा

माझे शेल्फ

स्नेहधारा

इंग्रजी शीर्षक
Snehadhara
सारांश

रणजित देसाईंनी जागवलेल्या ऋणानुबंधांच्या गूढतरल भाव-स्मृती… रणजित देसाई यांनी अखेरच्या दिवसांत कोल्हापूरच्या दैनिक सकाळमध्ये कोरीव लेणी हे सदर लिहून, आपल्या अनेक स्नेहीसोबत्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्या व्यक्तिचित्रांचा हा संग्रह म्हणजे एकापरने रणजित देसाई यांच्या प्रतिभेचा अंतिम ललित आविष्कार. पुस्तकरूपात येणारे हे शेवटचेच लेखन. स्वा. सावरकर, आचार्य अत्रे, भालजी पेंढारकर, तात्यासाहेब शिरवाडकर, राजे देशमुख, सी. रामचंद्र, काशीनाथ घाणेकर, पुंडलिकजी कातगडे, प्राचार्य एम. आर. देसाई, शरद तळवलकर, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब खर्डेकर, कुमार गंधर्व, बालगंधर्व, सुलोचना, हंसा वाडकर, डॉ. पिसुर्लेकर, बाळासाहेब देसाई, नरहर कुरुंदकर, भाऊसाहेब खांडेकर, बडे काही नाही’ म्हटल्यावर यशवंतराव म्हणतात, खोटं बोलू नको. माणसं ओळखणं ही अवघड गोष्ट. अनुभवानं मला ती जमली आहे. मी अशा समारंभात माझ्या माणसांना ओळख दाखवत नाही. चारचौघांत तुमच्यापाशी बोललो तर तर वशिल्याच्या कामासाठी लोकांचं लचांडे पाठीमागं लागतं... तर तू गैरसमज करून घेऊ नकोस.’’ रणजित देसाई यांचं विमान उशिरा आलं तर यशवंतराव अस्वस्थ झालेले दिसले. माधवीसाठी त्यांनी वेणूताईंच्या ड्रेसिंग टेबलवर प्रसाधनांची जणू जत्राच तयार ठेवली होती. माधवी मासा चांगला करते म्हटल्यावर साहेबांनी मासा दहा किलो पापलेट आणून ठेवले. ‘इथं कोणताही पदार्थ एकट्यानं खाल्ला जात नाही. बंगल्यातील सर्वांसाठी तो असतो. जेवताना ते सांगतात, ‘मला माशांची भयंकर भीती वाटते. काटे काढून दिले तरच खाईन.’’ भाऊसाहेब खांडेकरांना आचार्य अत्रे यांच्याकडे घेऊन जाण्याचे रणजितने कबूल केले, भाऊसाहेब टाळाटाळ करीत राहिले. सहाची वेळ ठरली असताना आठ वाजता अत्र्यांकडे गेले. ‘आज आमची शिवशक्ती धन्य झाली.’ म्हणत अत्र्यांनी हार घालून बाळासाहेब देसाई, नरहर कुरुंदकर, भाऊसाहेब खांडेकर, बडे गुलामअली खाँ, इंदिरा संत, वसंत देशपांडे अशा साहित्य-संगीत-चित्रपट शिक्षण प्रकाशन क्षेत्रातील मान्यवरांशी आलेल्या कमी अधिक सौहार्दपूर्ण संबंधांच्या स्मृती जागवणाऱ्या या छोट्या-छोट्या लेखांतून रणजित देसाई यांच्या सौजन्यशील, समंजस, कलासक्त, कृतज्ञ भावविश्वाचे नेटके दर्शन घडते. ‘स्वामी’ची प्रत देण्यासाठी रणजित देसाई स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भेटीला मुंबईला जातात. पुस्तक चाळून ते चार दिवसांनी पुन्हा या म्हणतात. स्वामी वाचली, आवडली असे सांगतात, मात्र पुढे पण भाषा, परदेशी भाषेचा आधार घ्यायची जरूरी होती का?’ अशी पृच्छा करून ‘आपली मराठी भाषा समृद्ध आहे, भाषा समृद्ध आहे, भाषा शुद्ध करा. तुमची कादंबरी चांगली आहे.’ असे बजावतात. प्रकृतीच्या विकलांग अवस्थेतही सावरकरांनी आपली कादंबरी वाचून दोष दाखवावे. याचेच अप्रूप रणजित देसाई यांचे मन भरून येण्यास पुरेसे ठरते. यशवंतराव चव्हाण एका कार्यक्रमाच्या वेळी रणजित देसाई दिसूनही कार्यकर्त्यांच्या गराड्यात त्यांना भेटू शकत नाहीत. ते डोंगरे यांना पाठवून सर्किट हाऊसवर येण्याचा निरोप देतात. रणजितचे हात पकडून बेडरूममध्ये नेतात. ‘तू रागावला असशील. गैरसमज करून घेतला असशील नाही?’ विचारतात. ‘तसं अत्र्यांकडे गेले. ‘आज आमची शिवशक्ती धन्य झाली’ म्हणत अत्र्यांनी हार घालून स्वागत केले. अत्रे म्हणाले, भाऊ तुमच्या अंगावर डाग असले तरी तुमचं मन गंगेइतकं निर्मळ आहे.’ भाऊंनी म्हटले. आज जो संयुक्त महाराष्ट्र होतोय त्याचे श्रेय तुम्हांला आहे. जे मनात आहे ते स्पष्ट बोलण्याचे धाडस केवळ तुमच्यात आहे. ‘श्रेष्ठ नाटककारांच्या पंक्तींत अत्रे बसू शकत नाहीत, ‘हा कोडफुटक्या खांडेकर काय सांगतो’ या जुन्या जखमांची भळभळ त्या भेटीने दूर झाली. तात्यासाहेब शिरवाडकर न कळवता अचानक कोवाडला येतात. ‘स्फूर्ती ही स्वयंस्फूर्तीच हवी. जेव्हा सुचेल तेव्हा लिही, उगीच भरडण्यात अर्थ नसतो, ‘असे ते सांगतात. ‘आयुष्यातल्या एकाकीपणाबद्दल शोक करू नको, त्याचा दोष कुणाला देऊ नकोस. कल्पित शोकामागे धावण्यात अर्थ नाही.’ असाही सल्ला देतात. हा माणुसकीचा जिव्हाळा रणजितना भाव्याकुळ करून टाकतो. अशा अनेक हृदयांतरीच्या स्नेहाच्या धारा रणजित देसाईंनी खुल्या केलेल्या आहेत, म्हणून त्यांचे दर्शन प्रेरणादायी व कृतज्ञतेचे ठरते.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
90
भाषा
मराठी
किंमत
90.00
समुदायाने जोडले
बंद