मुखपृष्ठ
संहार

माझे शेल्फ

संहार

इंग्रजी शीर्षक
Sanhar
सारांश

क्रूरकर्मा… दुसरे महायुद्ध मित्रराष्ट्रांनी जिंकल्यानंतर हिटलरच्या आणि त्याच्या सहकारी क्रूरकर्म्यांच्या अमानुष कहाण्या प्रसिद्ध होऊ लागल्या, हिटलरसारख्या हुकूमत गाजविण्याच्या महत्त्वाकांक्षेनं झपाटलेला अन् वंशवादाच्या आंधळेपणात पृथ्वीवरून ज्यूंचं सूळ उच्छेदन करण्याच्या ईर्षेने वेडावलेला असा अनेक पुराव्यानिशी जगापुढे आला. मराठीतही ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, ‘गुडबाय हिटलर’, ‘वॉर्सा ते हिरोशिमा’ सारखी पुस्तकं आली. तशी ज्यूंच्या आत्मकहाण्यांतूनही त्या अमानुष, काळ्या दिवसांचं चित्रण आलं. उदा. ‘डायरी ऑफ अॅना फ्रॅंक’, ‘ऑपरेशन डे ब्रेक’, ‘शिंडलर्स लिस्ट’ सारखे चित्रपटही त्यातील क्रौर्य अधोरेखित करतात. हिटलरच्या इच्छेनुसार काम करणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये रूडॉल्फ राईकमन या जर्मन सैन्यातील कर्नलन ‘ऑशविल्झ’ या छळछावणीमध्ये किती अमानुषप्रकारे ज्यूचं हत्याकांड केलं आणि हिटलरची मर्जी संपादली त्याचं वर्णन रक्त गोठविणार आहे. ज्यूंनी ‘इस्त्रायल’ची स्थापना केल्यावर त्यांच्या ‘मोसाद’ या गुप्तहेर संघटनेतील एका हुशार अन् कर्तबगार अधिकाऱ्यानं राईकमनचा किती कल्पकतेनं शोध घेतला आणि त्याला त्याच्या अतिअमानुश कर्माची शिक्षा दिली. याचा अत्यंत मनोवेधक आलेख उमेश कदम यांनी त्यांच्या ‘संहार’ या पुस्तकात काढला आहे. ज्यूचं हत्याकांड गॅसचेंबर्समध्ये करण्यामागे याच राईकमनचा मेंदू होता. त्याचं ज्ञान त्यानं विधायक कार्याऐवजी विध्वंसक आणि माणुसकीला काळिमा आणणाऱ्या कामासाठी वापरलं. जर्मनी युद्धात वरचढ होती तोपर्यंत राईकमनची कृष्णकृत्यं बिनबोभाट सुरू होती. पण जर्मनीचा पाडाव होऊ लागताच आणि मित्रराष्ट्राच्या सैन्याने ‘ऑशवित्झ’ला वेढा घालताच राईकमन शिताफीने पसार झाला. अन् लपत-छपत तो दुसऱ्या राष्ट्रात, आपली ओळख न देता दुसऱ्या नावानं एकाकी जीवन जगू लागला. पण ‘उपरवाले के पास देर है, अंधेर नही’ या उक्तीनुसार राईकमन केलेल्या अत्याचार गुन्ह्यांची शिक्षा त्याला याच जन्मात मिळाली राईकमनची शोधमोहीम आणि त्याला झालेलं शासन इथपर्यंतचा भाग ‘संहार’मध्ये येतो. उमेश कदम याचं हे पहिलच पुस्तक, पण हा सारा कथाभाग अत्यंत ओघवता, उत्कंठापूर्ण झाला आहे. चित्रपटाची पटकथा लिहावी, तसं ‘संहार’च लेखन, मांडणी झाली आहे. हे लिखाण मूळ इंग्रजीतून करून त्याचा अनुवाद मराठीत केल्यासारखे संवाद या कादंबरीत अधून-मधून डोकावतात तरीही प्रसंग उभारण्याचे त्यांचं कसब अथवा व्यक्तिमत्व फुलविण्यातील त्यांची शैली लक्षणीय यातील सारी पात्रं वाचकासमोर नेमकेपणा स्पष्ट होतात. उमेश कदम यांच्या लेखनाचेच यश आहे. ‘संहार’ हे दुसऱ्या महायुद्धातील एका क्रूरकर्म्यांचं अंगावर शहारे आणणारा कथानक माणुसकीला काळिमा फासणारा मानवजातीवर, माणुसकीवर प्रेम-श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक संवेदनशील वाचकानं ‘संहार’ असणाऱ्या प्रत्येक संवेदनशील वाचकांना ‘संहार’ अवश्य वाचायला हवं. चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ कल्पक आहे.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
90
भाषा
मराठी
किंमत
90.00
समुदायाने जोडले
बंद