माझे शेल्फ
संकरित
रोचक विज्ञानकथा...कल्पनावैविध्याला नैतिकतेची जोड... विज्ञानकथेत विविधांगी विषय हाताळलेले असून, एखादं विज्ञान, प्रयोग किंवा त्यांचे निष्कर्ष मानवाच्या जेवढ्या भल्यासाठी वापरता येऊ शकतात; तेवढाच त्या विनाशालाही कारणीभूत ठरू शकतात. ‘परिर्वन ही कथा मूळपेशींवर आधारलेली आह. ‘कोळिष्टक’ ही कथा ‘स्पायडर फार्मिंग आणि त्यांच्या जनुकावर आधारलेली आहे. ‘संकरित’ ही कथा जनुकांमध्ये हेतुपुरस्सर बदल घडवून आणल्यानंतरचे परिणाम दर्शविते तर ‘अस्तित्व’मध्ये वैद्यशास्त्रात मानवावरील विधायक प्रयोग दाखविलेला असून, ‘अखेर तो परतला’ ही कथा स्मृतिपटलांवर आधारित आहे. ‘सॉकर’ ही कथा फुटबॉलच्या रोमांचक खेळावर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून भाष्य करणारी आहे. ‘विचारवहन’ हे मानवी मेंदूतील प्रक्षेपित होणाऱ्या क्षीण लहरींवर आधारलेले आहे. शिवाय, दुर्गम्य ही कथा भौतिकशास्त्रातील टॅनेलिंग इफेक्टवर आधारित आहे.