मुखपृष्ठ
स्पाय प्रिन्सेस

माझे शेल्फ

स्पाय प्रिन्सेस

इंग्रजी शीर्षक
Spy Princess
सारांश

टिपू सुलतान ची वंशज असलेली एक भारतीय राजकन्या. दुसऱ्या महायुद्धात सामील होते एक "ब्रिटिश गुप्तहेर" बनून!!!!! नसानसांत अपार धैर्य भिनलेली हि शूर वाघिण, अखेर जर्मनांच्या हाती लागते. विश्वासघात ,अनन्वित छळ आणि प्राणांतिक यातना..... पिस्तुलाची गोळीच तिची यातून मुक्तता करते. शौर्याचं अनोखं स्फुल्लिंग जागत ठेवणारी एक रोचक ,थरारक सत्यकथा , गुप्तहेर युवराज्ञी "नूर इनायत खान" हिची.टिपू सुलतानाच्या वंशातील या तरुणीची माहिती आपल्याला फारशी नाही किंवा खरे तर अजिबात नाही. दुसऱ्या महायुद्धातील एस ओ ई चीगोपनीय कागदपत्रे आता उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे नोरा इनायत खानच्या कार्याची आणि बेडरपणाची कहाणी आता सुसूत्रपणे सांगता येणे शक्य झाले आहे. श्रावणी बासू या लंडनमधील पत्रकार महिलेने मूल कागदपत्रे अभ्यासून नूरचे चरित्र लिहून ‘स्पाय प्रिन्सेस’ या नावाने प्रसिद्ध केले. त्याचा मराठी अनुवाद भारती पांडे यांनी केला असून तो मेहता पब्लिशिंग हाऊसने बाजारात आणला आहे. सुफी पंथाचा प्रभाव असलेल्या एका मुस्लीम कुटुंबातील नूर ही मुलगी स्वप्नाळू, सुंदर आणि समंजस होती. तिचे वडील इनायत खान. आई अमेरिकन. मुलांसाठी कथा लिहिण्याची तिला आवड होती. दिसायला नाजूक, मूळ भारतीय पण आता पॅरिसमध्ये स्थायिक. विलायत आणि हिदायत हे तिचे धाकटे भाऊ. ती ब्रिटिश, फ्रेंच आणि भारतीय होती. ब्रिटिशांची गुप्तहेर म्हणून ती पॅरिसमध्ये काम करू लागली. पॅरिस जर्मनांच्या ताब्यात गेल्यावर तिला पकडण्यात आले आणि जर्मनीतील छळछावणीत पाठविण्यात आले. तिचा भयंकर छळ करण्यात आला आणि शेवटी तिला गोळ्या घालून ठार करण्यात आले. जनरल चार्ल्स द गॉल यांनी तिच्या मृत्यूनंतर तिला क्वा द गेर हा सर्वोच्च मुलकी पुरस्कार देऊन सुवर्णताऱ्यासह तिचा गौरव केला. सन्मानपत्रात म्हटले आहे. ‘‘ए.एस.ओ. नोरा इनायत खान, डब्ल्यू एएएफ, हिला १६ जून १९४३ रोजी लायसँडर विमानाने फ्रान्समध्ये पाठविण्यात आले. बिनतारी यंत्रचालक म्हणून पॅरिसमधील बंडखोरांची एक संघटना आणि लंडन यांच्यातील संपर्क चालू ठेवण्याची कामगिरी तिच्यावर सोपवलेली होती. त्या बंडखोर संघटनेतील अनेक लोकांना पकडण्यात आले. तेव्हा तिला पळून जावे लागले. तरीही तिने आपले काम चालू ठेवले. १९४३ जुलैमध्ये ती ग्रिग्राँ येथे चकमकीत सापडली. जर्मन सैनिकांना जखमी करून तिने पळ काढला. परंतु तिला ऑक्टोबर १९४३ मध्ये पकडूनच जर्मनीला पाठविण्यात आले.’’ या प्रशस्तिपत्रासोबत सुवर्ण ताऱ्यासह तिला क्रवा द गेर हा सन्मान देण्यात आला. जनरल द चार्ल्स द गॉल यांची स्वाक्षरी या पत्रावर आहे. नोराला १९४९ मध्ये जॉर्ज क्रॉस देण्यात आला. खरे तर भारतीय स्वातंत्र्यासाठी लढण्याची तिची इच्छा होती. १९४२ मध्ये आर.ए.एफ. मध्ये नोकरीसाठी तिने अर्ज केला होता आणि इंग्लंडमध्ये मी युद्धकाळात ब्रिटिशांना सहाय्य करीत असले तरी युद्ध संपल्यावर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणार आहे असे ती स्पष्ट सांगत होती... डाखाऊ येथे तीस हजार व्यक्तींची रक्षा पुरण्यात आली आहे. तेथेच नूरचे स्मरण जागवणारी छोटी फुलबाग आहे. एका भारतीय पराक्रमी स्त्रीची नव्याने ओळख करून देणारे हे पुस्तक वाचनीय आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद