माझे शेल्फ
स्पेअर
इंग्लंडच्या राजमुकुटाचा राखीव मानकरी अर्थात स्पेअर प्रिन्स हॅरी. त्याच्या वादळी जीवनाचा लेखाजोखा म्हणजे त्याचं आत्मचरित्र. अवघ्या किशोरवयात आईला गमावल्यानंतर हॅरीच्या बालमनावर झालेले विघातक परिणाम आणि सेलिब्रिटी जीवनाला लागलेलं पापाराझींचं ग्रहण या कात्रीत सापडलेल्या हॅरीच्या आयुष्याची सफर जणू खाचखळग्यांचा रस्ताच. त्यात कधी अमलीपदार्थांच्या सेवनामुळे तर कधी हिटलरसारखी वेशभुषा केल्याने तो सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत राहिला. अशा तणावपूर्ण जगण्यातूनही स्वतःसाठी लष्करी सेवेची वाट निवडत त्यानं आपलं वेगळेपण अधोरेखित केलं. मेग मेघन आयुष्यात आल्यानं हॅरीच्या जखमांवर फुंकर तर घातली गेली, पण माध्यमांच्या जोखडानं तिलाही आपल्या कचाट्यात ओढलं. या सर्व घुसमटीत हॅरीनं इंग्लंड सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या रोलरकोस्टर आयुष्याची झलक स्पेअर घडवतं.