मुखपृष्ठ
श्रीमान योगी

माझे शेल्फ

श्रीमान योगी

इंग्रजी शीर्षक
Shriman Yogi
सारांश

खरंतर छत्रपती शिवाजी महाराज हा मराठी वाचकांचा आणि लेखकांचा आवडीचा विषय . मराठी साहित्यात अनेक लेखकांनी शिवचरित्र वाचकांपुढे सादर केले.स्मरणात राहावे असे बाबासाहेब पुरंदरे, गजानन मेहेंदळे, वा.सी. बेंद्रे अशा लेखकांनंतर प्रसिद्ध लेखक स्वामी कार रणजित देसाई ह्यांनी अतिशय प्रेरणादायी कादंबरी स्वरूप शिवचरित्र वाचकांपुढे ठेवले. छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रासाठी आदरयुक्त तेवढंच लाडकं व्यक्तिमत्व. शिवरायांचा जीवन काळ अगदी नजरेसमोर उभे राहील अशी कादंबरी लिहली आहे. आपल्या लेखन शैलीने प्रत्येक प्रसंग जिवंत करण्याची प्रतिभा लेखकांमध्ये आहे. त्यावर नरहर कुरुंदकर ह्यांची प्रस्तावना म्हणजे सोने पे सुहागा म्हणता येईल. रणजित देसाई ह्यांनी जेव्हा ह्या कादंबरीला हात घालण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा नरहर कुरुंदकरांनी मार्गदर्शक पर सूचना देणारे पत्र प्रस्तावना म्हणून दिली आहे. कादंबरी बद्दल बोलायचं झालं तर ११००+ पानांची ही कादंबरी वाचकास जागीच खिळवून ठेवते. शिवचरित्रातील घटना माहीत नाही असे किमान महाराष्ट्रात तरी कोणी सापडणार नाही. सर्व घटना, घटनाक्रम माहीत असताना सुद्धा कादंबरी मनाला अनामिक हुरहूर लावून ठेवते. गोष्ट सुरू होते ती भोसले आणि जाधव ह्यांच्या वैरापासून. त्यानंतर लखुजी जाधवांचा मृत्यू,शिवरायांचा जन्म, शहाजीराजांचा दुसरा विवाह,शिवरायांचे बालपण हा काळ सरतो. नंतर जिजाऊ - शिवबाची बंगळूरास शहाजी राजांशी भेट , त्यातच शहाजीराजांनी शिवबाला दिलेली जहागीरदारी इथून सुरू होते शिवरायांची राजकीय कारकीर्द व स्वराज्य स्थापनेची वाटचाल. पुढे रोहिडेश्र्वर येथील शपथ, तोरणेची मोहीम, स्वराज्याचा शुभारंभ अशा दिशेने वाटचाल करत स्वराज्याची पायाभरणी करतात. शिवरायांच्या परक्रमाची चाहूल ऐकत निजामशाही व आदिलशाही धसका घेउन मातब्बर सरदारांना शिवरायांवर चालून पाठवतात. पुढे अफजल वध, पन्हाळ्याचा वेढा , घोडखिंडची लढाई , स्वराज्यावर चालून आलेले मिर्झाराजे जयसिंग, पुरंदरचा तह अशी यथोचित मांडणी लेखकांनी केली आहे. पुरांदराच्या तहाने ढासळलेले राज्य न डगमगता पुन्हा नव्या जोमाने उभे करणारे शिवराय मनाला भावतात. आग्र्याच्या कैदेत बादशहाच्या हातावर दिलेल्या तुरी, राजांचे अनेक गुण दर्शवतात. ह्या सर्व सुख दुःखाच्या काळात शिवरायांना अनेक लोकांची सोबत लाभली. शिवरायांना जन्मनारी माता जिजाऊ , घडविणारे दादाजी कोंडदेव , पत्नी सईबाई ह्यांचं मृत्यूही मनाला चटका लावून जातो. अनेक वीर स्वराज्य निर्मिण्यासाठी खर्ची पडले . राजे विशाळगडावर जोपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत मृत्यूलाही उसंत न देणारे बाजीप्रभू देशपांडे, जेधे आणि ३०० बांदल सेना , राजांच्या कोंढाणा स्वराज्यात असावा ह्या. इच्छे खातर आपल्या मुलाचे लग्न बाजूला सारून मृत्यूला कवटाळणारे तान्हाजी , साल्हेर - मुल्हेरचा लढाईत पराक्रमाची शर्थ करणारे रामजी पांगेरा , पुरंदरच्या लढाईत धारातीर्थी पडलेले मुरारबाजी , अवघ्या साठ मावळ्या निशी पन्हाळा सर करणारे कोंडाजी फर्जंद, वेगाने शत्रूच्या गोटात दौडणारे प्रतापराव गुजर आणि सहा मराठी वीर ह्या आणि अशा हजारो मावळ्यांच्या रक्ताने न्हाऊन हे स्वराज स्थापन झाले. शूरता आणि राज्य कारभार ह्या दोन्ही गोष्टीत पारंगत असणारे पेशवे मोरोपंत पिंगळे, मुजुमदार, अनाजी दत्तो न्यायाधीश निराजीपंत , चिटणीस बाळाजी आवजी ह्यांची गुण स्वभाव सुद्धा तेवढ्याच प्रभावी पने लेखकांनी वाचकांसमोर मांडली आहे. आजारपणातील शिवरायांनी स्वतःशी केलेले संवाद तर अस्सल बावनकशी सोन आहे ह्या संवादासाठी लेखकांना कितीही पुरस्कार दिले तरी कमीच. कादंबरी वाचताना शिवरायांचे अनेक पैलू उलगडत जातात. अगदी लहान वयात खंडोजी बल्लाळ व त्याच्या भावांसोबत केलेलं राजकारण , शिवरायांची राजकारणी मुत्सद्दीपणा दर्शवतं . शिवरायांच्या सर्व धर्म समभाव चा सुद्धा प्रत्यय येतो. बजाजी निंबाळकर ह्यांचे धर्म पुनरागमन ह्यामुळे शिवरायांचे धर्मशास्त्रातील ज्ञान व आप्त स्वकियांबद्दल वाटणारा जिव्हाळा जाणवतो. संतश्रेष्ठ तुकोबा राया , समर्थ रामदास , काशी पंडित विद्वान गागाभट्ट ह्यांच्याशी असलेलं सख्य सुद्धा जवळून अनुभवायला मिळतं. अविरत कष्ट करण्याची तयारी , अफाट लोकसंग्रह, प्रजेबद्दल करुणा , उदंड आत्मविश्वास , कर्तव्य कठोरता, दूरदर्शी दृष्टी हे सर्व सामवलेले शिवराय हे एक युगपुरुष जाणवतात. त्यामुळे समर्थांनी केलेले शिवरायांचे वर्णन अगदीच अचूक वाटते : निश्र्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारु | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी १ परोपकरचीया राशी | उदंड घडती जयाशी | जयाचे गुण महत्वशी | तुळणा कैशी.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
1963
पृष्ठसंख्या
623
भाषा
मराठी
ISBN
9788177662221
समुदायाने जोडले
बंद