मुखपृष्ठ
श्री तुळजाभवानी

माझे शेल्फ

श्रीतुळजाभवानी

इंग्रजी शीर्षक
Shree Tuljabhavani
सारांश

श्रीतुळजाभवानी ही महाराष्टाची कुलस्वामिनी आहे . भाग्याविधाती आहे . ती सर्जक आहे . संगोपक आहे आणि संहारकही आहे . महासरस्वती , महालक्ष्मि , आणि महाकाली अशी ती त्रिरुपा आदिशक्ती आहे.तिचे रूप हे महिषमर्दिनीचे रूप आहे . आपल्या अष्टभुजांत विविध आयुधे धारण करून ती महिषादि असुरांचा संहार करते आणि अथांग वत्सलतेने आपल्या भक्तांचा प्रतिपाळ करते . सप्तशतीत साकारलेले श्रीतुळजाभवानीचे महिषमर्दिनीरूप जसे ज्ञानदेवांच्या नितांत श्रद्धेचा विषय बनून राहिले , तसेच ते शिवछत्रपतींच्याही श्रद्धेचा ठाव बनले .स्वातंत्र्यसमरात परकीय सत्तेंशी झुंज घेताना वीरांना आणि वाडमयकारांना प्रेरणा देणारी ही दिव्या आदिशक्ती त्या काळी केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताचीच स्वातंत्रसंजीवनी ठरली .या शोधग्रंथात श्रीतुळजाभवानी या देवतेचा पौराणीक आणि ऐतिहासिक शोध घेत असताना देवितत्वाने भारलेल्या एका प्राचीन मिथकाची प्रेरकता डॉ .रा .चिं.ढेरे यांनी अनेक अंगानी उलघडलेली आहे .

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
615
भाषा
मराठी
किंमत
600.00