मुखपृष्ठ
शूट टू किल

माझे शेल्फ

शूट टू किल

इंग्रजी शीर्षक
Shoot To Kill
सारांश

व्यासंग वाढवणाऱ्या साहित्यकृती… स्कॉट ग्रॅहॅम लिखित ‘शूट टू किल’ ही डॉ. देवदत्त केतकर यांनी अनुवाद केलेली कादंबरी मारेकऱ्यांदरम्यान फुलणाऱ्या जगावेगळ्या प्रेमाची कहाणी आहे. स्कॉट ग्रॅहॅम एक कसलेल्या ’एसएएस’ (स्पेशल एअर सव्र्हिस) सैनिक होता. उत्तर आय्लंड आणि फॉकलंड मोहिमेबद्दल त्याला शौर्यपदक मिळाले होते. ’आयआरए’ बरोबरच्या चकमकीत त्याने अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. मायरीड फॅरेल ही ‘आयआरए’ साठी बाँब पेरणारी एक लहानखुरी पण नितांतसुंदर तरुणी या दोघांचे जीवघेणे आणि भयानक असे गुपित असते. आपल्या पक्षाच्या आणि सैन्याच्या नियमांना बगल देत ते अनेक वर्षे एकमेकांवर उत्कट प्रेम करत राहतात. ‘आयआरए’ च्या तीन नि:शस्त्र अतिरेक्यांना रॉक ऑफ जिब्राल्टरवर गोळ्या घालून ठार करण्यात आले आणि स्कॉट आणि मायरिडच्या छुप्या प्रेमप्रकरणाचा शेवट झाला. ’एसएएस’ च्या इतिहासातला तो एक वादग्रस्त प्रसंग ठरला. स्कॉट ग्रॅहॅमच्या असाधारण प्रेमाचे आणि जगाला हादरवून सोडणाऱ्या तीन हत्यांचे चित्तथरारक सत्यकथन ‘शूट टू किल’ मधून घडते. हा अनुवाद आपल्याला वेगळ्या विश्वाची सफर घडवतो.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद