माझे शेल्फ
स्वान्सीतील दिवस
प्रवासवर्णन म्हटलं की प्रत्यक्ष त्या ठिकाणची दृश्ये डोळ्यांसमोर उभी करणारी कलाकृती अशी तिची व्याख्या केली जाते. भटकंती करत असताना विशिष्ट प्रदेशाशी आपला होणारा संवाद लेखिकेने अतिशय सहज सोप्या भाषेत पुस्तकात मांडला आहे. आपण केलेली सफर वाचकांनाही घडवते.तेथील निसर्गसौंदर्याबरोबरच तिथे अनुभवलेले लोक, जीवनमान यांविषयीही मोकळेपणाने भाष्य केले आहे. छायाचित्रे आणि रंगसंगतीच्या माध्यमातून केलेली ललित लेखांची मांडणी वाचकांना नक्कीच खिळवून ठेवणारी आहे.सुदूरच्या ‘युनायटेड किंग्डम’मधल्या निसर्गसुंदर ‘वेल्स’ परगण्यातलं एक टुमदार शहर ‘स्वान्सी’. अनपेक्षित योगानं माझं तिथे जाणं झालं. काही काळ निवांत राहणं झालं. आसपासही थोडं भटकणं झालं. तिथल्या निसर्गाचे विभ्रम मी पाहिले. ‘वेल्श’ लोकांची जीवनशैली न्याहाळताना कुतूहलापोटी स्वान्सीवासीयांशी कधी संवाद साधले. अनेकदा एकटीनं केलेल्या भटकंतीमुळे स्वत:शीही संवाद होत राहिला. एक लक्षात आलं, ज्या नगरीशी माझं कोणतंही नातं नव्हतं, जी माझी जन्मभूमी नव्हती की कर्मभूमी; त्या ‘स्वान्सी’नं हलकेच माझ्या मनात जागा मिळवली. कायमची. तिथल्या अनुभवांना दिलेलं हे शब्दरूप – स्वान्सीतील दिवस.
माणूस आयुष्यात चुकतोच पण पण त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे. यासंदर्भातील माधवराव आणि सखाराम बापू बोकील यांचे संवादही फार भावपूर्ण आहेत. माधवरावांची श्री गजाननावर नितांत श्रद्धा होती. तसाच आदर त्यांना छत्रपतींच्या गादी विषयी होता. आपण राज्याचे स्वामी नसून सेवक आहोत ही भावना त्यांच्या मनात कायम होती. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येणारच, माधवरावांवर ती अतोनात आलीत. पण संकटांना न डगमगता आपले कर्तव्य पूर्ण जोमाने करत राहावे, हे कादंबरीतून शिकलो. व्यवस्थापनातील अनेक संज्ञा जसे planning, staffing, controling, coordination, deligation, Human resource management याची उदाहरणे ही पदोपदी सापडतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. मराठी साम्राज्याचा विस्तार,घरभेदयांच्या कुरघोड्या, परकीय आक्रमणे आणि त्यातून रयतेची माधवरावांनी जिंकलेली मने याचे चित्रण त्यासोबत पत्नी रमाबाई वर असलेले निर्व्याज्य प्रेम त्यामुळे निपुत्रिक असूनही दुसरे लग्न न करणारे माधवराव आणि पती सोबत सती जाणाऱ्या साध्वी रमाबाई यांच्या चरित्रामध्ये वाचक दिपून जातो. जाज्वल्य इतिहास आणि शोकात्मिक प्रेमाचे प्रतीक असलेल्या या कादंबरीला माझ्याच नव्हे तर असंख्य वाचकांच्या हृदयसिंहासनावर आढळ स्थान आहे. आपण ही कादंबरी वाचली नसल्यास जरूर वाचावी.