माझे शेल्फ
टाटा : एका कॉर्पोरेट ब्रँडची उत्क्रांती
टाटा ब्रँड म्हणजे आहे तरी काय? काय आहेत त्याची मूल्यं? जगातील आणि भारतातील लोकांना त्यातून काय समजतं? या रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तकात मॉर्गन विटझेल टाटांच्या हृदयाचा ठाव घेतात, त्याचे मूळ समजावून सांगतात. टाटांच नाव आणि प्रतिमा कशी निर्माण होत गेली तसेच या प्रतिमेचं रुपांतर एका बलवान आणि मौल्यवान ब्रँडमध्ये करण्यासाठी या उद्यांगसमूहाने काय केलं, याचं वर्णन करतात. ‘टाटा’ १४० वर्षाहून अधिक जूनी आहे. त्यांच्या २८ पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत. ऐंशीहून अधिक देशामध्ये त्यांचा कारभार आहे. आणि पंच्याऐंशीहून अधिक देशामध्ये ते आपल्या वस्तू आणि सेवा निर्यात करतात. टाटांचे वेगळेपण यात आहे की, त्यांचे सामाजिक कार्य हे त्यांच्या एकूण ध्येयामध्ये समाविष्ट आहे. कंपनीच्या स्थानिक परिस्थितीची गरज लक्षात घेऊन ते भागधारक, कर्मचारी, भागीदार यांच्यासाठी आर्थिक मूल्यांची निर्मिती करतात. मराठी अनुवाद विदुला टोकेकर यांनी केला असून प्रस्तावना राम चरण यांनी लिहिली आहे. एका आदर्श कंपनीचे अंतरंग वाचनीय असे आहे.