मुखपृष्ठ
ते दिवस ती माणसे

माझे शेल्फ

ते दिवस ती माणसे

इंग्रजी शीर्षक
Te Divas Tee Manase
सारांश

भाऊसाहेब खांडेकरांनी आपल्या पूर्वायुष्याबद्दल आणि त्या काळात प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींबद्दल लिहिलेल्या सतरा लेखांचा हा संग्रह. ‘ते दिवस’ मध्ये सांगलीतले बालपणचे वातावरण त्यांनी चित्रमय शैलीत उभे केले आहे. घराजवळचे गणपती देऊळ. त्या देवळातल्या दगडी हत्ीवर आधी बसण्यासाठी होणारी धावपळ, केगणेश्वरी भोकरीच्या झाडावर चढून खाल्लेली भोकरे, डिंकाचा कारखाना काढण्याची कल्पना, देवळात केलेले नाटक, शनिमहात्म्याचे वाचन, पाहिलेली वेगवेगळी नाटके, इत्यादी तपशील भाऊसाहेबांच्या जडणघडणीवर प्रकाश टाकतात. ‘माझे मराठी शिक्षण’मध्ये अनेक शिक्षण, त्यांची शिकवण्याची पद्धत, व्याकरण व गणित याबद्दल वाटणारा तिटकारा, यांचे उल्लेख येतात. वकिली करणारे मामा विनायकराव माईणकर, बालमित्र रामभाऊ जोशी, आजोबा बाबाकाका माईणकर, डॉ. देव आणि या काळात वाचनाची लागलेली गोडी, मराठीचे शिक्षक शंकरशास्त्री मराठे, कवितालेखनाचे प्रयत्न, १९१९ साली छापून आलेले पाहिले लेखन, गहाळ झालेले रमणीरत्न नाटक, उद्यान व नवयुग या मासिकांचे कार्य, यशवंत मासिकाचे वीरकर, केशवराव दाते आणि गोविंदराव टेंबे यांच्याशी जुळलेला स्नेह, हा सर्व उमेदवारीचा काळ चितारणारे काही लेख आहेत. एका बुडणाऱ्या मुलालाही त्यांनी वाचवले ‘‘माझ्या स्वभावात साहस नाही. आत्मार्पणाच्या सिद्धतेला लागणारे गुण विकसित झाले नाहीत’’ असेही ते म्हणतात. प्लेगमध्ये दादांचा झालेला मृत्यू. बाबाकाकांचा गोष्टीवेल्हाळ उदार स्वभाव, मोलकरणीचा - धोंडुचा - लोभ, देवमाणूस डॉ. देव, मुद्गल मास्तर, गडकरी, थोरली बहीण यांची व्यक्तिचित्रेही कृतज्ञता व आत्मियता यांनी ओथंबलेली आहेत.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
80
भाषा
मराठी
किंमत
80.00
समुदायाने जोडले
बंद