माझे शेल्फ
तेलसम्राट
खुप कमी पुस्तकं असतात, जी हातात घेतल्याक्षणी मनाचा वेध घेतात, आपल्याला जागेवर खिळवुन ठेवतात, आपण त्या पात्रांसोबत जगतो, त्यांच्या आयुष्यात गुंतत जातो, असंच एक पुस्तक आहे, तेलसम्राट! मार्क रीच नावाच्या एका वादळी आयुष्य जगलेल्या, आणि ए टु झेड, म्हणजे एयुमिनिअम ते झिंक, व्हाया तेल, बॉक्साईट, मॅंगेनीज, क्रोम अशा सगळ्या जीवनावश्यक वस्तुंच्या व्यवहारांचा अनाभिषिक्त सम्राट, मार्क रीच! डॅनिअल अमान ह्या लेखकानं अत्यंत तटस्थ वृत्तीने हे पुस्तक लिहलयं! मुळ इंग्रजी नाव आहे, ‘द किंग ऑफ ऑईल!’ पुस्तकाच्या पानापानवर, प्रत्येक प्रकरणामध्ये, आपल्याला एक नवा, वेगवेगळा मार्क रीच भेटतो, खरतरं एकोणीसाव्या वर्षी नाखुशीनेच जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदी विक्रीच्या कंपनीत चाळीस डॉलर्सवर काम करायला मार्क अगदीच नाखुश होता. पण ज्यु असल्याने व्यापार त्याच्या रक्तात भिनला होता. अल्पावधीतच दिर्घकालीन वायदे व्यवहार करण्यात फिलीप ब्रदर्स ह्या बलाढ्य कंपनीमध्ये, मार्क रीचने, स्वतःची प्रतिभा आणि भविष्याचा वेध घेण्याची चुणुक दाखवली. काही साथीदारांना सोबत घेऊन तो स्वतःची नवी कंपनी सुरु करतो. जगभरात स्वतःचं एक जाळं उभा करतो. अंगावरच्या कपड्यानिशी घर सोडावा लागलेला हा मुलगा, वीस वर्षात दहा हजार कोटींचा मालक बनतो. (हा काळ १९६५ ते १९८५ पर्यंतचा आहे. तेव्हाचे दहा हजार कोटी रुपयांचे मुल्य आजच्यापेक्षा जास्तच होते.) जिथे संधी मिळेल,तिथे मध्यस्थी करुन पैशाची रास जमवणारा मार्क रीच! इराण आणि इस्त्राईल ह्या दोन कट्टर दुष्मनांमध्ये पाईपलाईन टाकुन तेलाचा व्यवहार करतो. इराणच्या खोमेनीकडुन स्वस्त दराने तेल घेऊन अमेरीकेला थांगपत्ता न लागु देता बाजारभावाने विकतो. वेगवेगळ्या नावाने कंपन्या काढुन, साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या अफ्रिकेतल्या जमैका, कॉगो अशा अनेक गरीब देशांच्या सरकारांवर आपलं नियंत्रण ठेवतो. वेगवेगळ्या देशांमधल्या ताणलेल्या संबंधांचा, ह्या वीस तीस वर्षात झालेल्या प्रत्येक युद्धाचा तो इतका आर्थिक फायदा घेतो, की काही दिवसात फोर्ब्ज मासिकांच्या श्रीमंताच्या यादीत कव्हरपेजवर झळकु लागतो. बाहेरच्या देशातुन येवुन, अल्पावधीत डोळे दिपावुन टाकणारं, कुबेराला लाजवेल इतकं वैभव कमावणार्या मार्कचे अनेक शत्रु तयार होतात, अनेक बड्या हस्तींच्या डोळ्यात तो आणि त्याचं प्रखर यश खटकु लागतं! इर्षेपोटी आणि स्वतःच्या फायद्यासाठी मार्क रीचला आयुष्यातुन उठवण्याचे, त्याला पुर्णपणे उध्वस्त करण्याचे षडयंत्र रचु लागतात. अमेरीकन कोर्ट, एफ बी आय, प्रसारमाध्यमांची फौज, गुप्तहेर, मानव-स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचं ढोंग करणारे बहुतांश अमेरीकन्स, हात धुवुन मार्क रिचच्या मागे लागतात. मार्कवर कर चुकवल्याच्या, भ्रष्टाचाराच्या खोट्या केसेस टाकल्या जातात, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. मार्क अमेरीका सोडुन स्विझर्लॅंडचा आश्रय घेतो, मजबुर होवुन, अमेरीकेचे नागरीकत्व सोडुन इस्राईलचा नागरिक बनतो. अमेरीका खवळते, मार्कची हजारो करोडोची संपत्ती जप्त केली जाते. प्राणाहुन प्रिय असलेली मार्कची मुलगी गॉब्रियल ब्लड कॅंसर झाल्यामुळे अमेरीकेत शेवटचा श्वास घेते, तेव्हा तिला भेटायची मार्कची विनंती अमेरीकन सरकार फेटाळुन लावते. मार्क एक बाप असल्याचे अंत्यसंस्कार सुद्धा पुर्ण करु शकत नाही. पुढे मार्कचा घटस्फोट होतो. त्याचं दुसरं लग्नही मोडतं. मार्क मोडत नाही, चाणाक्ष बुद्धीमता, भविष्याचा अचुक अंदाज आणि थंड डोक्याने विचार करण्याच्या खासीयतमुळे, त्रेसष्ठ वर्षापर्यंत तो मार्क रिच एंड कंपनीचे झेंडे जगभरात फडकवत राहतो. जेव्हा त्याच्याच कंपनीतले लोक असहकार्य आणि दगाबाजी करतात, तेव्हा मात्र मार्क कोसळुन पडतो, स्वतःची कंपनी उध्दस्त होताना पाहण्याआधीच, खिन्न आणि विषण्ण मनाने, कंपनीतल्या इतर लोकांना तो आपला हिस्सा कवडीमोलात विकतो आणि एक वादळ शांत होतं! ह्या पुस्तकात एका माणसाची अनेक रुपं आपल्यासमोर येतात. दुसर्या महायुद्धानंतर, ज्यु असल्यामुळे जीव वाचवण्यासाठी स्वतःचा हक्काच्या देश सोडावा लागणारा चिमुकला, निरगस मार्के! निर्वासित बनुन जर्मनीमधुन, अमेरीकेमध्ये शरणार्थी म्हणुन, आई वडीलांचं बोट धरुन आलेला, लहानगा स्वप्नाळु मार्के! तेलाच्या मागणीपुरवठ्याचं गणित अचुकपणे ओळखणारा आणि जगभरात असलेल्या तेलाच्या व्यवहारांवर पकड असलेल्या सात कंपन्याची मक्तेदारी मोडुन काढणारा चलाख आणि निधड्या छातीने जोखीम घेऊन, जग जिंकणारा मार्क रीच! प्रचंड पैसा कमवल्यावर तेल व्यवहाराचा अनाभिषिक्त सम्राट असुनही, प्रसिद्धीच्या झोतात न येता, पडद्याआड राहुन, ज्यु धर्माच्या शिकवणीप्रमाणे, गरीब-गरजु लोकांना प्रतिवर्षी कोट्यावधी रुपये दान करणारा, एक उदार अंतःकरणाचा माणुस, मार्क! आरोपांचे शुक्ल काष्ठ मागे लागल्यावर एकेक वार मुकपणे धीराने सहन करणारा, खंबीर कणखर ही विशेषणे कमी पडतील, प्रत्येक संकटात शांत राहणारा, प्रत्येक जीवघेण्या