मुखपृष्ठ
तो एक पाकिस्तानी

माझे शेल्फ

तो एक पाकिस्तानी

इंग्रजी शीर्षक
To Ek Pakistani
सारांश

पाकिस्तानच्या अणुबाँब जनकाची सुरस कहाणी… ‘द मॅन फ्रॉम पाकिस्तान’ हे पाकिस्तानच्या अणुबाँबचे तथाकथित जनक डॉ. ए. क्यू. खान यांच्या एकूण कारकिर्दीचा आढावा घेणारे असे पुस्तक. पाकिस्तानला अण्वस्त्रसज्ज देशांच्या पंक्तीत नेऊन बसविण्याचा ध्यास घेतलेला हा मणूस पाकिस्तानच्या अणुक्षेत्रातील त्याचा उदय आणि एकूण कामगिरी यांची रसभरित कहाणी, लेखक डग्लस फ्रान्झ आणि पत्रकार पत्नी कॅथरिन कॉलिन्स यांनी या पुस्तकाद्वारे सादर केली आहे. ‘तो एक पाकिस्तानी’ हा या पुस्तकाचा मराठी अनुवाद शेखर जोशी यांनी केला आहे. मूळ पुस्तकाइतकाच त्याचा अनुवादही माहितीपूर्ण आणि मनोरंजक करण्याचा लेखकाचा प्रयत्न जागोजागी दिसून येतो. २० व्या शतकाच्या प्रारंभी अल्बर्ट आईनस्टाईनने अणूमधे लपलेल्या शक्तीचा शोध लावला. दुसऱ्या महायुद्धात याचा वापर अणुबाँबच्या निर्मितीत करण्यात आला. या अणुबाँबच्या स्फोटामध्ये जपानमधील हिरोशिमा-नागासाकी ही शहरे क्षणार्धात जळून खाक झाली. हा इतिहास सर्वांच्या परिचयाचा आहे. या हादऱ्यानंतर सगळे जग हादरून गेले. बऱ्याच राष्ट्रांनी एकत्र येऊन अण्वस्त्रबंदीसाठी आवाज उठवला. अमेरिका, रशिया, ब्रिटन अशा प्रमुख राष्ट्रांनी एकत्र येऊन ‘आय ए ई ए’ म्हणजेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. सदर आयोग मार्शल प्लॅन म्हणून परिचित असलेल्या योजनेच्या धर्तीवर एक योजना तयार करून शांततापूर्ण अणुकार्यक्रम राबविण्यास प्रोत्साहन देईल असे जाहीर करून या प्रस्तावाचे ‘शांततेसाठी अणु’ असे नामकरणही केले. एकीकडे ‘आय ए ई ए’ आकार घेत असतानाच दुसरीकडे अमेरिकेने इराण, इस्त्रायल, भारत, पाकिस्तान यासारख्या अनेक देशांना अणुभट्ट्या सवलतीच्या दरात विकायला सुरुवात केली. अमेरिकेचा या क्षेत्रातील प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रशियानेही स्वत:ची मित्र राष्ट्रे असलेल्या देशांना अणुतंत्रज्ञानाची खिरापत वाटायला सुरू केली. या सर्वांची अतिशय मनोरंजक माहिती या पुस्तकातून मिळते. थोडक्यात काय तर लहानमोठी सर्वच राष्ट्रे अण्वस्त्रनिर्मितीबाबत छुपेछुपे प्रयत्न करू लागली. शांततापूर्ण अणुऊर्जा कार्यक्रम आणि त्याचा अण्वस्त्रनिर्मितीसाठी व्हावयाचा संभाव्य वापर यातील तथाकथित सीमारेषा म्हणजे एक मृगजळ असल्याचे हळूहळू सिद्ध होऊ लागले आहे. या अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानी शास्त्रज्ञ व या कादंबरीचा नायक अब्दुल करीम खान अण्वस्त्र चळवळीत सक्रिय होत आपली पावलं उमटवित होता. खानचा जन्म २७ एप्रिल १९३६ रोजी भारतातील भोपाळ संस्थानात झाला. खानचे वडील अब्दूल गफूर खान ‘मुस्लीम लीग’ या राजकीय पक्षासाठी कार्य करीत असत. मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी आणि हिंदूंचा द्वेष हे गुण खानने आपल्या वडिलांकडून वारसाहक्काने मिळवले होते. पुढे जरी खानने आपल्या आयुष्यातील दहा वर्षे युरोपात घालवली असली तरीही बालपणापासून झालेल्या मुस्लीम संस्कारांच्या पगड्यातून तो बाहेर पडू शकला नाही. पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही सुमारे दशकभर त्या देशाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. किमान प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या उद्योग, शाळा आणि आर्थिक संस्था या सुविधांचीही तिथे कमतरता होती. त्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती झपाट्याने होत होती. त्याची असूया वाटणारे खान सारखे बरेच पाकिस्तानी होते. अब्दूल खान या पाकिस्तानी शास्त्रज्ञानाने जागतिक पातळीवर अण्वस्त्र तंथज्ञानाचा काळाबाजार करावयास सुरुवात केली. त्याच्या कारवायासंबंधी बारीक सारीक बारकावे लेखकाने सुसंगत रीतीने मांडले आहेत. सुमार दर्जाचे तंत्रज्ञान अवगत असलेला हा शास्त्रज्ञ आपली राक्षसी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काय काय करतो. द्वितीय अणुयुगाचा एक महत्त्वाचा भागीदार कसा बनतो, पाकिस्तानसारख्या एका सर्वस्वी कमकुवत देशाला अण्वस्त्रसज्ज देशांच्या पंक्तीत कसा नेऊन ठेवतो आणि जगातील अत्यंत अस्थिर देशांना आपले अण्वस्त्र तंत्रज्ञान बिनदिक्कत कसे विकतो या सर्वाची कहाणी सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये खानच्या कारवायांचा उदय आणि ऱ्हास याची कारणे जाणून घेऊन वाचकापर्यंत पोहोचविण्याचे काम लेखकाने केले आहे. तांत्रिक बाजू बरोबरच पुस्तकाची ललित बाजूसुद्धा व्यवस्थित हाताळली असल्यामुळे वाचकाची उत्सुकता व कुतूहल जागे ठेवण्यात लेखकाला यश मिळाले आहे. एका वेगळ्याच विषयावरचे माहितीपूर्ण व उत्कंठा वाढवणारे असे हे पुस्तक आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद