तो राजहंस एक
इंग्रजी शीर्षक
To Rajhans Ek-Bal Samant
सारांश
तो रा ज हं स एक (नटसम्राट बालगंधर्व यांचे चरित्र) १९८७ साली महाराष्ट्रात सर्वत्र बालगंधर्वजन्मशताब्दी साजरी करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला. शासनाच्या या निर्णयाला जनतेचे मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. या निमित्ताने अनेक नियतकालिकांनी बालगंधर्वाचा गुणगौरव करणारे खास अंक काढले. लोकसत्ता दैनिकाचे तडफदार आणि झुंजार संपादक माधवराव गडकरी यांनी 'लोकसत्ता" दैनिकाच्या बालगंधर्व विशेषांकात बालगंधर्वावर एक लेख लिहिण्याची विनंती केली. गेली वीस वर्ष बालगंधर्व या विषयावर मी पुष्कळ लिखाण केले आणि ठि