मुखपृष्ठ
तुकयाची आवली

माझे शेल्फ

तुकयाची आवली

इंग्रजी शीर्षक
Tukayachi Aawali
सारांश

वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे तुकाराम महाराज तर सर्व परिचित आहेतच. पण त्यांची पत्नी आवली हिचा परिचय आपल्यासमोर येतो तो काहीशा नकारात्मक स्वरूपातच! साक्रेटीसची बायको झांटिपी आणि तुकारामाची बायको आवली यांची तुलना करण्याचा मोहही बऱ्याच लोकांन झाल्याचं आठवतंय. कजाग, तोंडाळ ,भांडखोर अशी काहीशी आक्रमक प्रतिमा अवलीच्या वाट्याला आलीय. मंजूताईनी तिची ही उपेक्षा जाणून घेतली आणि तिला त्यात न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या आवली या चरित्रात्मक कादंबरीतून केला आहे. कर्तबगार पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री उभी असते, असं कौतुकानं म्हटलं जातं. संतपदाला जाण्याचं जे अफाट कर्तुत्व तुकाराम महाराजांनी केलं, त्या पाठीमागे आवलीचे संसार सावरणारे हात होते. तिची उपासमार होती. तिचे कष्ट होते.आवली आणि तुकाराम यांच्या संसारातला विठ्ठल हा जणू खलनायक आहे. कादंबरीत एकूण वीस प्रकरणं आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विठ्ठलाचं स्वगत म्हणजे त्या प्रकरणाचा कळस आहे. आवली-तुकारामाचं लग्न ठरल्यानंतर सर्वांत आनंद या विठ्ठलाला होतो कारण तुकारामच्या संतदाची इमारत नेटकेपणानं, मजबुतीनं आवलीच्या आधारावरच उभी राहणार होती. आवलीचा मृत्यू इतका वेगळ्या प्रकारे दर्शवला आहे, की या आवलीला न्याय मिळाला असं वाटतं. नशिबासारखा खरखरीत असलेला हात तुकारामाच्या हाती देऊन ही तुकयाची आवली मृत्यूला सामोरी जाते. संत तुकाराम हे देणे ईश्वराचे. केवळ आवलीमुळेच तुम्हाला, मला, आपण सर्वांना मिळालं. आई आणि पत्नी म्हणून आवलीनं आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडलंच पण केवळ तिच्यामुळेच तुकोबाराय भक्तीमार्गात तल्लीन होऊ शकले. कादंबरीची भाषा, सर्व प्रसंगांची भावस्पर्शी मांडणी यामुळे एक वेगळ्याच उंचीवर ही कादंबरी वाचकाला नेते. एका ऐतिहासिक पण दुर्लक्षित स्त्रीच्या कल्पकतेने रेखाटलेल्या चरित्ररूपी कादंबरीला तेवढेच यथार्थ, समर्पक आणि विलक्षण बोलकं मुखपृष्ठ मिळणं हा ही एक शिरपेचच होय.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद