मुखपृष्ठ
टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट

माझे शेल्फ

टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट

इंग्रजी शीर्षक
To Cut A Long Story Short
सारांश

खिळवून ठेवणारी नाट्यमय कलाटणीची मालिका.सत्यघटनांना कथेत गुंफण्याचा जेफ्री आर्चर यांना नादच. ‘टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट’ या कथासंग्रहातील पंधरा कथापैकी आठ कथा अशा सत्यघटनांवर आधारित आहेत. कमी अधिक लांबीच्या या कथा पात्रयोजना, कथानक विस्तार, कथाबीज, पार्श्वभूमी सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठणाऱ्या आहेत. अर्थातच त्या वैशिष्ट्यांत जेफ्री आर्चरच्या लेखणीचे कसब, लालित्य, ओघवतेपणा यांचा सिंहाचा वाटा निश्चितच आहे. विषयांचे वैविध्य वाचकाला खिशवून ठेवण्यात पूर्णतया यशस्वी होते. यात रेल्वेस्टेशनवर समोरासमोरच्या प्लॅटफॉर्मवर झालेली नजरानजर व त्यातून फुलू आलेली प्रेमकथा आहे, प्रचंड आत्मविश्वासाने खेळलेल्या बाजीची कथा आहे, कायद्याला हवे तसे वाकवणाऱ्या कायदेतज्ज्ञाची कथा आहे, तसेच एका तरुणीची अत्यंत विलक्षण, सुरस आणि चमत्कारिक कथा आहे. शेवटची ‘द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर’ ही सर्वोत्कृष्ट म्हणावी अशी कथा आहे. प्रत्येक कथेच्या शेवटी, विख्यात लेखक ‘ओ हेन्री’प्रमाणे धक्कातंत्र वापरले आहे. या अचानक कलाटणीपायी नाट्यपूर्णता चरमसीमेवर पोचते. यातील सर्वांत छोटी व पहिली कथा ‘डेथ स्पीक्स’ - लेखकाच्या काळजाला असा काही स्पर्श करून गेली की तिला या कथासंग्रहात अग्रक्रम मिळाला. अर्थात ही कथा त्याची स्वत:ची नाही. ही कथा मूळ अरबी भाषेतून अनुवादित करण्यात आली आहे. सखोल संशोधानानंतर सुद्धा या कथेच्या मूळ लेखकाचा नाव व पत्ता सापडू शकलेला नाही. (हीच कथा सॉमरसेट मॉमच्या ‘----’ नाटकात व नंतर जॉन ओहारा यांच्या ‘---’च्या प्रस्तावनेत व जी. ए. कुलकर्णी यांच्या एका कथेत सुवर्णगरूडाच्या माध्यमातून आलेली आहे.) एकूणच मेहता पब्लिशिकेशनने प्रकाशित केलेला व लीना सोहोनींनी उत्कृष्ट अनुवाद केलेला हा संग्रह विदेशी पात्रं-पार्श्वभूमी व कथानकं असूनही खूपच मनोरंजक झाला आहे. प्रत्येकाच्या आवडीची किमान वाटतो यातच या कथासंग्रहाचे यश व वैशिष्ट्य लपलेले आहे. चंद्रमोहन कुलकर्णींचे मुखपृष्ठ नावीन्यपूर्ण व प्रभावित करणारे आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद