माझे शेल्फ

अ थाउजंड स्प्लेंडिड सन्स

इंग्रजी शीर्षक
A Thousand Splendid Suns
सारांश

अफगाणिस्तानात गेली 40 वर्षे जी अशांतता माजली आहे त्याच्या अनुषंगाने ही कथा अगदी हळुवार उलगडत जाते. तिकडच्या बदलत्या राजवटी, अमेरिका आणि रशियाचा प्रादेशिक वर्चस्वासाठी चाललेला संघर्ष , टोळी युद्धे, तालिबानी राजवट व शेवटी परत शांती स्थापनेचा युनो चा प्रयत्न , या सर्वांना समांतर अशी मरियम व लैला यांची कहाणी सुरू असते. मरियम ही हरामी म्हणजे अनौरस व तिच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान अशी तीची सवत लैला, यांचा हा अद्भूत जीवन संघर्ष आहे. या कथेत त्या दोघींचा नवरा रशीद, लैलाचा प्रियकर ताहीर, तिची मुले , अशी पात्रे कथानक फिरते ठेवतात. अफगाण मध्ये माजलेली अनागोंदी, आपला स्वार्थ साधल्यावर तिकडून काढता पाय घेणारी अमेरिका व रशिया, संपूर्ण प्रदेशाची झालेली राखरांगोळी, याचे फार प्रत्ययकारी चित्रण केलेले आहे. वाचताना अनेक वेळा सुन्न करणारे प्रसंग आहेत जे आपल्याला मानसिक दृष्ट्या उध्वस्त करून सोडतात. शेवट मात्र आशावादी केलेला आहे. जरूर वाचावे असे पुस्तक. या पुस्तकाचे सुरेख मराठी भाषांतर करणारे मधुकर प्रधान यांचे खास आभार !

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी