माझे शेल्फ
उद्ध्वस्त
अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्या युद्धातील ही एक गोष्ट आहे .मी लाय या क्वांग अंगै खेड्याजवळील छोट्या वस्तीत अमेरिकन सैनिक शिरतात आणि एकूण एक रहिवाश्यांना मारून टाकतात . त्यांच्या अत्याचारातून लहान मुले वृद्ध स्त्रियाही वाचत नाहीत. त्यांच्याबरोबर असलेला रकारी छायाचित्रकार चोरून या संपूर्ण घटनेचे फोटो घेतो . योगायोगाने एक सहा वर्षाची मुलगी यातून वाचते पण तिला आपल्या आईवडिलांची प्रेते पहावी लागतात . अमेरिकन छायाचित्रकार ही सगळी माहिती प्रसारमाध्यमाला देतो आणि अमेरिकेत मोठी खळबळ उडते . सरकारला जनतेचा प्रचंड रोष सहन करावा लागतो. वरिष्ठ पातळीवरून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो .खरे तर ही एक सत्यघटना आहे आणि लेखकाने यात कल्पनाविस्तार केला आहे .मन सुन्न करणारी कादंबरी .‘उद्ध्वस्त’मधली काही व्यक्तिमत्त्वं आज वास्तवातली, हयात असलेली आणि काही नसलेली वाचकांना भेटतील. अशा व्यक्ती प्रत्यक्षात तत्सम प्रसंगी जशा वागल्या-बोलल्या असत्या, तशाच चित्रित केल्या आहेत. या कथानकामध्ये वास्तव आणि कल्फित यांचा संयोग साधून आधुनिक इतिहासातला एक अविश्वसनीय वाटावा असा विदारक आणि हृदयभेदक अध्याय, चित्तवेधक आणि नाट्यफूर्ण रीतीनं मराठी वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बलाढ्य, हेकेखोर अमेरिकेची काळी बाजू उजेडात आणून, दुर्बलांवर राज्य गाजवण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी माणूसपणा टाचेखाली कसा चिरडला जातो, याचं विदारक वर्णन म्हणजे ’उद्ध्वस्त.’