मुखपृष्ठ
उधाण वारा

माझे शेल्फ

उधाण वारा

इंग्रजी शीर्षक
Udhan Vara
सारांश

तसलिमा नासरीन यांच्या आत्मकथेचा (आमार मेयेबेला) चा हा दुसरा भाग.....या आत्मकथे मधे तुम्हाला भेटणार आहेत तिचे कुटुंबिय .......वडिल डॉ.रजबअली जे एक संवेदनाशुन्य आणि कोरडे गृहस्थ आहेत.....आई ईदन प्रेमळ व कष्ट करून करून वाकलेली आणि कोणाचीहि साधी सहानुभुती नसलेली सत लक्तरा मधे वावरणारी......मोठा भाऊ नोमान कंपनीचा सेल्समन व त्याची अहंमन्य दिसायला सामान्य बायको हसीना मुमताज उर्फ मुमु.....त्याच्यापेक्षा लहान भाऊ छोटेदा - कमाल ,त्याची बायको नखरेल गीता़, छोटी बहिण यास्मीन......नासरीन चा कवीमित्र रूद्र..... खरे नाव शहिदुल्ला .......अत्यंत ज्वलंत मानवताप्रेमी कवी,दारुडा,वेश्यागमनी,गुप्तरोगी...... याने भावने चे प्रदर्शन करून नासरीन ची सही एका कागदावर घेउन तिला पत्नी घोषीत केलेले......तिच्याशी संबंध ठेवायच्या नादात तिलाहि गुप्तरोगाचा चटका देउन बसतो....... यांतील जवळजवळ सर्व पुरुष स्त्रियांच्या संबंधात ढिलेआहेत.......डॉ.रजबअली ह्यांचे एक दुसरे कुटुंब त्यांनी रईसाबेगम सोबत केलेले आहे.......लग्न झाल्यापासुन दोघे भाऊ बायको एके बायको या मंत्रात गुंग.....नासरीन ने रूद्र शी घेतलेला तलाक....... अशा घडामेडीने गच्च अशी हि आत्मकथा अत्यंत वाचनीय!

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
464
भाषा
मराठी
किंमत
699.00
ISBN
9788184981070
समुदायाने जोडले
बंद