मुखपृष्ठ
उगवतीच्या दिशेला

माझे शेल्फ

उगवतीच्या दिशेला

इंग्रजी शीर्षक
Ugawtichya Dishela
सारांश

सुरुवात करताक्षणी आपल्याला खिळवून ठेवणारं हे पुस्तक शेवटपर्यंत आपली उत्कंठा वाढवत नेतं. त्याला असलेली वसाहतकालीन भारताची, भारतीय स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी आपल्याला या पुस्तकापासून जराही बाजूला होऊ देत नाही. तीन मैत्रिणींचं निखळ विश्व मांडणारं हे पुस्तक आपल्याला शांता शेळके अनुवादित चौघीजणी (लिट्ल विमेन) या पुस्तकाची आठवण करून देत राहतं. ही कहाणी आहे विवा, रोझ आणि टॉर या तीन मुलींची. विशीच्या आतल्या रोझ आणि टॉर एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी आहेत. विवाची आणि त्यांची ओळखही नाही. पण काच बोटीतून त्या तिघीजणी भारतात यायला निघतात आणि त्यांची एकमेकांशी ओळख होते. सुरुवातीला एकमेकींच्या जवळ जायला फारशा उत्सुक नसलेल्या या मुली बोटीवरून उतरेपर्यंत, म्हणजे भारतात पोहोचेपर्यंत एकमेकींच्या छान मैत्रिणी होतात. नंतरही या ना त्या कारणाने भेटत राहतात आणि त्यांचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे बंध जुळतात. त्या सगळ्या नातेसंबधांचा तरल आलेख हे पुस्तक मांडतं. भारतात येणारा तत्कालीन ब्रिटिश समाज, त्यांचं जगणं, तत्कालीन भारतीय समाज या दोन्ही समूहांचे एकमेकांशी असलेले लागेबांधे, ताणेबाणे, स्वातंत्र्यपूर्व काळाची ती धगधग ही सगळी पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. १९२८ साली लंडनमधील ‘लेडी’ नावाच्या एका मासिकात आलेल्या जाहिरातपासून ही कादंबरी सुरू होते. विवा होलावे या अठ्ठाविशीच्या तरुणीने कुणाला भारतात आपल्या मुलांना पाठवायचं असेल तर मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी आपण आया म्हणून उपलब्ध आहोत अशी जाहिरात दिलेली असते. या जाहिरातीवरूनच आपल्याला त्या काळात काय चालत असणार याची कल्पना येते आणि पुढे पुढे ती वृfद्धंगत होत जाते. भारतात नोकरीसाठी येणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची मुलं सुट्टीसाठी संपवून भारतात जात असतं. त्यांना सोबत म्हणून जाण्याचं काम त्या काळी मिळत असे. विवा होलावेला भारतात जायचं असतं ते भारतात मरण पावलेल्या तिच्या आई - वडिलांची एक टंक मसुरीला जाऊन परत घेण्यासाठी. त्या टंकमध्ये आपल्यासाठी घबाड नाही. आणि त्यात जे असेल ते आता खराब झालं असेल हे तिला माहिती आहे, पण तरीही गेली अनेक वर्षे ती मसुरीला जायचं नियोजन करते आहे. आई -वडील-बहीण यांच्या मृत्यूनंतर ती एकटी वाढली आहे. एकटेपणाच्या अपरिहार्यतेतून एक अपयशी प्रेमप्रकरणही तिच्या खाती जमा आहे. त्यामुळे अविश्वास, सावधवपणा, भूतकाळाची भेट म्हणून मिळालेला अस्वस्थपणा या सगळ्यासह ही विवा गाये नावाच्या सोळा वर्षांच्या मुलाची आया किंवा सोबतीण म्हणून भारतात यायला निघते. लेखिका व्हायचं हे तिचं स्वप्न आणि जगण्यासाठी सतत पैसे मिळवण्याची सक्ती या कात्रीत ती अडकलेली आहे. ती ज्याची सोबतीण म्हणून निघाली आहे, तो सोळा वर्षांचा गाय हा मुलगा कुणालाच नको आहे. अतिशय अस्वस्थ, घुसमटलेलं बालपण वाट्याला आलेलो हा मुलगा शाळेत रँगिंगला बळी पडला आहे. तिथून त्याला नाकारलं गेलंय. भारतात असलेल्या आई-वडिलांकडे त्याला पाठवलं जातंय. पण त्यांनाही तो खरं तर नकोच आहे. तो बोटीवर विचित्र वागून, विचित्र परिस्थिती ओढवून घेतो. विवालही अडचणीत आणतो. पण नंतर तिच्यात आणि त्याच्यात एक समृद्ध नातं तयार होतं. असं असलं तरी पौगंडावस्थेतल्या या मुलाची फरफट आपल्याला अस्वस्थ करत राहते. रोझ आणि टॉरे या दोन मैत्रिणी भारतात यायलो निघाल्या आहेत, त्या रोझच्या लग्नासाठी. भारतात ब्रिटिश सैन्यात काम करणाऱ्या जॅकशी रोझ लग्न करणार आहे. जॅक सुनीता नावाच्या एका सुंदर भारतीय मुलीत गुंतलेला आहे. त्या काळात इंग्लंडमध्ये लग्न जमत नसे अशा उपवर मुलींना त्यांचे आई-वडील भारतात आलेल्या तरुणावर गळ टाकण्यासाठी भारतात पाठवून देत. रोझने जॅकशी आधीच जमवलंय. पण तिचे आई-वडील तिच्या लग्नाला येऊ शकणार नाहीयेत म्हणून टॉर ही तिची जिवलग मैत्रिण करवली म्हणून तिच्यासोबत आली आहे. भारतातच असलेली तिची एक नातेवाईक स्त्री हे लग्न लावून देणार आहे.’’ टॉर ही एक टिपिकल बायकीपणाने वागण्याचा तिरस्कार करणारी, आपल्याला हवं तसं वागणारी बिनधास्त, पण गोड मुलगी आहे. प्रेमप्रकरणात सतत अपयशी होणारी टॉर पुन्हा तितक्याच उत्कटतेने प्रेमात पडत राहते.बोटीवर ती फ्रॅंक या डॉक्टरच्या प्रेमात पडते. पण फ्रॅंक विवामध्ये गुंतत जातो आणि स्वत:च्या स्वाभिमानाची, स्वच्छंदी जगण्याची आस असलेली विवा त्याच्यात गुंतूनही त्याला झिडकारत राहते. भारतात उतरल्यानंतरचं सगळ्यांचं जगणं, भारतात त्यांना येणारे वेगवेगळे अनुभव, त्यांचं हळूहळू बदलत गेलेलं आयुष्य आणि ते एकमेकांशी शेअर करण्याची त्यांची आच या सगळ्यांतून ही कादंबरी एक विलोभनीय दुनिया आपल्यासमोर उभी करते. एरवी आपण तत्कालीन ब्रिटिशांकडे राज्यकर्ते या एकाच नजरेने पाहतो पण या राज्यकर्त्या वर्गातले वेगवेगळे थर, त्यांचे प्रश्न, त्यांचं जगणं हे सगळं कसं होतं ते या कादंबरीमुळे आपल्याला काचेच्या त्या बाजूकडून समजतं.

मातेकोनी मॅडम पातोक्वानींच्या सांगण्यावह्वन पॅराशूटच्या साह्याने विमानातून उडी मारणार आहेत, हे जेव्हा रामोत्स्वेला समजतं, तेव्हा तिला भीती वाटते. म्हणून ती चार्लीला सांगते, की पॅराशूटचं धाडस तू केलंस तर पेपरमध्ये तुझं नाव छापलं जाईल, तुला प्रसिद्धी मिळेल, सुंदर मुली आपणहून तुझ्या मागे येतील वगैरे. रामोत्स्वेचं हे म्हणणं चार्लीला पटतं आणि तो पॅराशूटचं धाडस करायला तयार होतो. दरम्यान, लोबात्सेच्या रोव्हर ९० या गाडीचं फस्र्ट क्लास मोटर्सचा मालक मोलेफी याने जाणीवपूर्वक नुकसान केलं आहे, हे मातेकोनीला समजतं आणि ते त्याच्या गॅरेजमध्ये जाऊन त्याच्या माणसांकडे त्याची चौकशी करतात. मोलेफीला हे समजल्यावर तो मातेकोनींशी भांडायला येतो; त्यांच्या भांडणात तो मातेकोनींना मारहाण करेल या भीतीने रामोत्स्वे मॅडम पातोक्वानींना घेऊन येते. त्या मोलेफीला असा काही सज्जड दम भरतात, की तो पळच काढतो. त्याचवेळेला रामोत्स्वेला त्या सुचवतात, की मातेकोनींना बेसावधपणे विवाहाच्या बंधनात अडकवता येईल. रामोत्स्वेची संमती मिळाल्यावर तिला त्याकामी मदत करायचं त्या आश्वासन देतात. चार्लीचं पॅराशूटचं धाडस यशस्वी होतं का आणि मॅडम पातोक्वानी रामोत्स्वे-मातेकोनींच्या विवाहासाठी कोणता मुहूर्त शोधतात, यातील रोचकता अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचलंच पाहिजे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद