मुखपृष्ठ
उत्खनन

माझे शेल्फ

उत्खनन

इंग्रजी शीर्षक
Utkhanan
सारांश

उत्खनन म्हणजे गतजन्म. पूर्वजन्म खणून काढल्यामुळे होणारे परिणाम. प्रत्येक संत, ज्ञानी असं सांगतात की, हा आताचा क्षण महत्वाचा. तो पूर्णपणे जगा, कारण पुढचा क्षण तुमचा असेलच असं नाही. मग नक्की काय पाळायचं ? गतजन्माची सफर आणि त्यामुळे ढवळून गेलेला आज की फक्त हाच क्षण ? - Swati Chandorkar हे पुस्तक म्हणजे मानवी मनाच्या पूर्वजन्मातील आठवणींवर आधारित असे उत्खनन आहे. या पुस्तकाच्या वाचनाने, अभ्यासाने, प्रत्येक मनाची कवाडे उघडतील; इतकेच नव्हे, तर स्वतःबाबत एक वेगळीच व विस्तृत अशी जाणीव प्रत्येकाला होईल. आपले अनेक पुनर्जन्म तर होणारच आहेत; परंतु, आपल्याला सध्या फक्त या जन्मातली भूमिका नीट जगायची आहे, हे ध्यानात येईल. या जन्मातली दुःखे, क्लेश, वेदना, आजार याचे मूळ गतजन्मात सापडू शकते; परंतु ते जाणून घेण्याची गरज नॉर्मल (सर्वसामान्य) माणसाला अजिबात नाही. - डॉ. विद्याधर गोपाळ ओक(प्रस्तावनेतून).

ध्यानावस्थेत गेले की त्यांना कुणाचेही पूर्वजन्म कळतात, असे म्हणतात. हे कितपत खरे आहे. ते अनेकांना स्वानुभव आल्याशिवाय ठरवणे कठीणच. पण या पुस्तकात अशी विद्या अवगत झालेल्या विदुषीची उत्कंठावर्धक कहाणी आहे. एका सामान्य व हलाखीच्या अवस्थेतून स्वत: गेलेल्या एका स्त्रीचे एका संताच्या सान्निध्यात आल्यामुळे तशा व्यक्तीमध्ये झालेले परिवर्तन, आणि ते झाल्यानंतरही जिच्या मनामध्ये उठणाऱ्या अनंत मनोतरंगांचे चित्रण आहे. तिला तिच्या पूर्वजन्माचे ज्ञान होते आणि शांत, स्वच्छ होऊ पाहणारे पाणी पुन्हा पुन्हा गढूळ होत राहते. ती इतरांनाही त्यांचे पूर्वजन्म दाखवून त्यांनाही अशांत करते. संत झाला, ज्ञानी झाला, तरी माणूस तो माणूसच राहतो. त्याचे अंतरंग त्याला कळते. इतरांना महान उपदेश करणाऱ्या माणसांमध्येही भावनांचे उसळणारे निद्रिस्त ज्वालामुखी असतात. ते या पुस्तकात दिसतील. शेवटी माणूस स्वत:पासून स्वत:चे खोटे संरक्षण करू शकत नाही, म्हणजेच स्वत:ला फसवू शकत नाही. म्हणूनच शांती ही मानवामध्ये बाहेरून आत जाऊ शकत नाही, तर आतच जागी व्हावी लागते आणि कदाचित, या शांतीच्या महासागरातील पाण्याच्या वजनानेच त्याच्या तळातील ज्वालामुखींना, विझवलेल्या अवस्थेत कायमचे दाबून ठेवावे लागते. अवस्थेपासून अशा शांतीच्या आणि सांसरिक व अटळ अशा परिस्थितीजन्य दु:खांपासून समतोल साधण्याच्या मानवी मनाच्या सर्कसचे प्रभावी असे दर्शन या पुस्तकामध्ये मांडले गेले आहे. पुस्तकाची भाषा सहज-सुंदर आणि जिवंत अशी आहे. आशय अर्थपूर्ण आहे. सगळी पात्रे आपल्यालाही भेटलेली आहेत, असे वाचकांना सतत जाणवेल. पुस्तकात सादर झालेले प्रसंग अतिशय अकृत्रिम, भावनोत्कट आणि परिणामकारक आहेत. माणसानं सध्याचा जन्म जरी जमेल तेवढा समजून घेतला, तरी मोठेच काम झाले. आपण एका कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, मानवतेचा, निसर्गाचा, आकाशगंगेचा, अनेक आकाशगंगांच्या समुहाचा एक छोटा भाग आहोत हे सत्य. आपण एकटे नाही आणि स्वतंत्रही नाही. तसेच, जगात ‘परमेश्वर’ अशी आपणास भेटू शकणारी शक्ती वा व्यक्ती नाही, ते आपण मानवांनीच वैश्विक अस्तित्वाला दिलेले नाव आहे. आपण स्वत:ही याच वैश्विक अस्तित्वाचा एक भाग असल्यामुळे आपल्यातही परमेश्वर आहे, असे म्हणतात. मात्र आपण ‘आहोत’ ही जाणीव, आणि त्या सकट असलेला या क्षणाचा निसर्ग हे आपले ‘सत्य अस्तित्व’ म्हणजे आपल्याला आपल्यासकट सर्वांचे, सर्व निसर्गाचे जीवन निभवायचे आहे. पर्यायाने, आपण जमेल तेवढा आपल्याकसट जगातील सर्व गोष्टींचा विचार करीत राहिलो. त्यांच्याबद्दल मनात आपुलकी ठेवून त्यांच्या भल्यासाठीही आपले विचार व कृती राखू शकलो. तरच आंतरिक शांतीचा अनुभव आपण घेऊ शकतो. यालाच मनाची तरलता म्हणता येईल. मानवी जीवनात तरी याहून अधिक मौलीक काय असावं! हे एक नवीन विषयाला हात घालणारे सुंदर पुस्तक सौ. स्वाती चांदोरकरांनी लिहिल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन!

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद