माझे शेल्फ

वाळवाण

सारांश

पिढ्यान्पिढ्या सांभाळलेली, जन्मोजन्मीचं नातं असलेली जमीन... शेतकऱ्याच्या काळजाचा तुकडा, पोटच्या लेकराप्रमाणं सांभाळलेला, त्याला जीव लावलेला. तोच काळजाचा तुकडा क्रूर नियतीनं कापला, हिसकावला, ओरबाडला, रक्तबंबाळ केला तर होणाऱ्या भयंकर यातना सोसणाऱ्यालाच माहीत. याच यातना प्रकल्पग्रस्तानी भोगल्या आपलं घरटं अन् जमीन आपल्या डोळ्यांदेखत कोणीतरी उद्ध्वस्त करावी... उद्ध्वस्त घर आणि चिरफाड झालेल्या जमिनीकडे हताशपणे पाहण्याशिवाय असहाय जीव काहीच करू शकत नाही; तो तळमळतो, तडफडतो. अखेरच्या श्वासापर्यंत व्यवस्थेशी संघर्ष करतो. अशाच एका प्रकल्पग्रस्ताचा काळजाला भिडणारा ज्वलंत प्रश्न... वाळवाण.

एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची दारुण परिस्थिती मांडणारी ही कादंबरी. हा विषय, भीषण वास्तव लेखकाने तळमळीने मांडले आहे.

अशोक वीर या सुशिक्षित अपंग शेतकऱ्याचे जीवन रंगवताना लेखकाने अपंगांच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकला आहे.

प्रकल्पग्रस्तांचं जीवन, धरणग्रस्तांचे प्रश्न, त्यांची वाताहत, शेतकर्यांचा जगण्याचा प्रश्न मांडणाऱ्या कविता, कथा, कादंबरी साहित्यिक क्षेत्रात येत असताना ‘वाळवाण’ ही कादंबरी या प्रश्नांशी अधिकच खोलवर जाऊन विचार करणारी ठरते.

कादंबरी अशोक वीर व त्याच्या सामान्य कुटुंबाभोवती व भोवतालच्या शेतकर्यांच्या प्रश्नावर फिरताना दिसते. शेतीचे प्रश्न- पाणी, वीज, शेतमाल बाहेर काढण्यासाठी लागणारी वाट, बाजारपेठ, अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, सधन शेतकरी या सर्व विषयांचा वेध ही कादंबरी घेते.

या कादंबरीत अन्याय झालेल्या कुटुंबाचं दु:ख जितकं लेखकाच्या मनात आहे तितकंच वाचकांच्या मनात उतरू शकतं.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी