मुखपृष्ठ

माझे शेल्फ

विकसन

इंग्रजी शीर्षक
Vikasan
सारांश

वि. स. खांडेकरांनी १९७१ ते ७३ या काळात लिहिलेल्या कथांचा संग्रह ‘विकसन’ या नावाने प्रकाशित झाला आहे. खांडेकरांनी लिहिलेल्या या कथा बहुतेक दिवाळी अंकांतून प्रकाशित झालेल्या असल्या तरी आजही त्या तितक्याच ताज्या वाटतात याचं कारण त्यातील भावना आणि विचार ांचा सुरेख मेळ हे आहे. ‘विकसन’ ही शीर्षक कथा एक लहान तीन-चार वर्षांचा मुलगा, त्याची कडक शिस्तीची आई, तिच्या मनाप्रमाणे वागणारे वडील आणि आजी या चार पात्रांभोवती गुंफलेली आहे. त्यातही वडिलांविषयी अवघा एकदाच उल्लेख आहे. आई, आजी आणि मूल यांच्या भावबंधांचं चित्रण करणारी ही कथा आहे. आजीकडे पाहण्याचा मुलाचा दृष्टीकोन कसा बदलत जातो ते अगदी बारकाव्यांसह खांडेकर लिहितात. ‘पुनर्जन्म’ ही एक प्रेमाच्या त्रिकोणाची कथा आहे. लग्न हा एका अर्थाने पती-पत्नी दोघांचा पुनर्जन्म असतो. लग्नानंतर पूर्वजीवन विसरून माणूस संसारात रमला पाहिजे, असे खांडेकर सांगतात. शरीर या कथेत मुलाच्या लग्नाची स्वप्नं पाहणारे आई-वडील आणि आर्थिक परिस्थितीमुळे लग्नाच्या बंधनात न पडू शकणारा मुलगा अखेर एका मुलीबरोबर खंडाळ्याच्या हॉटेलमध्ये राहतो हे समजल्यावर वृद्ध आईवडिलांना धक्का बसतो. प्रीती या कथेत शरीरापलीकडे जाऊन केलेले प्रेम कसे श्रेष्ठ ते लेखक सांगतात. खांडेकरांच्या लेखनामध्ये कोणत्याही गोष्टीची चांगली बाजू ते दाखवतात. बऱ्याचदा त्यांचे लेखन आदर्शवादाकडे जाणारे असते ही टीका होते. पण सामान्य माणसे आजही नीतिमूल्ये सांभाळून प्रामाणिकपणे जगणारी असतात. त्यामुळे ही टीका बरोबर नाही. पण ‘मनोरा’मधील सरोजिनीबाईंसारख्या दांभिक व्यक्तीही समाजात असतात. त्यांचे चित्रण तर खांडेकरांनी केले आहे. ‘मुंगी उडाली’ मध्ये नैतिक अध:पाताचे चित्रण करताना खांडेकर अध्यात्म्य समजावतात.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
100
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788177662511
समुदायाने जोडले
बंद