मुखपृष्ठ

माझे शेल्फ

वॉरन बफे

इंग्रजी शीर्षक
Warren Buffet
सारांश

वाँरेन बफे एक सामान्य पेपर टाकणारा मुलगा वयाच्या 11 व्या वर्षी पासून गुंतवणूक क्षेत्रात आला आणि आज वयाच्या नव्वदीत तो अमेरिकेतील नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार आहे. आज त्याच्याकडे संपत्ती 6.4 लाख करोड रूपये आणि त्यातही कितीतरी कंन्याची मालकी त्याच्याकडे आहे. त्याच्या बर्कशायर हँथवे हया गुंतवणूक कंपनीचा एक शेअर 2.16 करोड रूपयाला आहे यावरून कळते की त्याच्या गुंतवणूक पद्धतीवर गुंतवणूकदारांचा किती ठाम विश्वास आहे. त्याच्या यशाची सूत्र आणि गुंतवणूक पद्धत हया पुस्तकात सांगितली आहेत त्याच्या व्हँल्यू इन्व्हेस्टींग सूत्रांची माळ गुंफण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक गुंतवणूकपूर्व सल्ले : श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यापेक्षा खरेखुरे श्रीमंत व्हा आपण कितीही महाग कपडे घेतले,गाडी घेतली तरीही आपण कुणाही श्रीमंतापेक्षा गरिबच वाटणार कारण हया तुलनेच्या खेळाला अंत नाही त्यामुळे फक्त गरजांवर खर्च करा अनावश्यक वायफळ खर्च टाळून पैसे वाचवा...आणि आर्थिक असहाय्यतेला नाही म्हणा..... ज्याचा वाचवलेला पैसा घरात आहे त्यांनी तो बँकेत साठवा आणि ज्यांचा साठलेला पैसा खात्यात कुजत पडलाय त्यांनी तो तसाच ठेवण्यापेक्षा गुंतवा. छोट्या छोट्या गोष्टीत बेपर्वा माणसे मोठमोठ्या गोष्टीमध्ये बेफिकीर आणि बेशिस्त असू शकतात आणि लोक जितकी बेपर्वाईने वागतील तितकेच आपण स्वतः जबाबदारीने वागले पाहिजे. माणूस अनुकरणशील प्राणी आहे पण म्हणून इतरांच्या चुकांचे अनुकरण करणे हे पण चुकीचेच होईल गुंतवणूकदार होण्यापूर्वी : आपल्या कुटुंबाचा आयुर्विमा ,आरोग्य विमा (क्रिटिकल इलनेस सह) काढलेला असावा सहा महिन्यांचे उत्पन्न Emergency फंड म्हणून वेगळ्या बँक अकाउंट वर FD सारख्या सुरक्षित पर्यायात गुंतवावेत जेणेकरुन अडचणीच्या वेळी ते कामाला येतील आणि आपली गुंतवणूक दीर्घकालीन ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य होईल. गुंतवणूकदार झाल्यानंतर : ज्याला वेळेचा आणि ज्ञानाचा अभाव आहे आणि पैशाची सुरक्षितता जास्त महत्त्वाची वाटते त्यांनी कमी नफा असले तरी बाँड किंवा FD मध्ये पैसे गुंतवणूक करावी. ज्यांची थोडीफार रिस्क घ्यायची तयारी असेल त्यांनी म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करावी ज्यांना शेअरबाजाराचे जुजबी ज्ञान आहे त्यांनी इंडेक्स फंडात पैसे गुंतवावेत ज्यात सेन्सेक्स निफ्टी लिस्टेड कंपन्याचे शेअर्सच्या प्रमाणानुसार गुंतवणूक केली जाते ज्यांना अकाउंटसचे आणि शेअर बाजार कसा चालतो याचे मूलभूत ज्ञान आहे त्यांनी इक्विटी शेअर्स मधे गुंतवणूक करावी. तसेच शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी अतिबुद्धिवान किंवा गणितज्ञ असण्याची कुठलीही गरज नाही ब्ल्यूचिप कंपन्यात गुंतवणूक करूनही उत्तम परतावा मिळवता येतो. Profit loss, Financial Statement विश्लेषण करता येणे पुरेसे आहे. पण तेवढ्यासाठी पण आपण कुणावर तरी विसंबून राहत असू तर एवढेच लक्षात ठेवा "जो दुसऱ्या वर विसंबला त्याचा कार्यभार संपला" शेअर बाजार खूप अवघड क्लिष्ट आहे असा काही तज्ञ आणि ट्रेनिंग सेंटरने त्यांच्या स्वतःच्या पोटापाण्यासाठी निर्माण केलेला भ्रम आहे आणि टीव्ही ,न्यूजपेपर , मासिक यांनी तो भ्रम आणखी जास्त बळकट केला आहे. त्यामुळे माणसाने स्वतःचा नजरिया बदलावा गुंतवणूक कशी करावी: दरमहा गुंतवणूकीसाठी रक्कम बाजूला काढायची सवय लावावी गुंतवणूक करण्यासाठी बाजूला काढलेली रक्कम ही आयुष्यभर फक्त गुंतवणूकीसाठीच वापरावी. शक्यतो लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करावी जेणेकरून चक्रवाढीचा फायदा आपल्याला भेटेल. ज्या कंपन्या सातत्याने उत्तम नफा कमावतात. अश्या केवळ 8-10 कंपन्यात दीर्घकाळ म्हणजेच दहा आणि त्यापेक्षा जास्त वर्षासाठी गुंतवणूक करावी आणि निश्चिंत राहावे हयात काहीच थ्रिल नाही म्हणून इन्स्टंट पैसा कमवायच्या (Trading , FO, Commodity )मागे धावू नये.हाव भीती आणि मूर्खपणा हे माणसाचे अवगुण असतात त्यामुळे आपल्या अवगुणांवर मात करायची आणि दुसऱ्याच्या हयाच अवगुणांचा फायदा घ्यायचा तसाच मत्सर हा ही माणसाचा मोठा दुर्गुण आहे जो माणसाला कायम असमाधानी बनवतो. त्यावर मात करा आपल्याला कळत नसलेल्या व्यवसायात गुंतवणूक करू नये. लक्षात ठेवा इथे सबुरीने वागणा-या माणसाला सतत कार्यरत माणसे संपत्ती मिळवून देतात. जे सेक्टर कायम चालतात आणि भविष्यात ज्यांची मागणी राहील अशा सेक्टर टाँप कंपन्याची गुंतवणुकीसाठी निवड करावी. गुंतवणूक करताना Lumpsum रक्कम एकदाच गुंतवू शकता ते पण ज्यावेळी मार्केट करेक्शन मोड वर असेल किंवा ज्यावेळी मार्केट भयभीत असेल आणि डिस्काउंटचे बोर्ड झळकत असतील किंवा गुंतवणूकीसाठी SIP पद्धतीचा वापर करू शकता ज्यात महिन्याच्या ठराविक तारखेला ठराविक रक्कम ठराविक शेअर्स खरेदीसाठी वापरली जाते.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
216
भाषा
मराठी
किंमत
230.00
ISBN
9788184985672
समुदायाने जोडले
बंद