माझे शेल्फ
वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र
वॉरन बफे हे नाव माहीत नाही, असा कोणी नसेल. विशेषत: गुंतवणुकीच्या क्षेत्रातला हा बादशहा. सर्वश्रेष्ठ गुंतवणूकदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कुठलीही नोकरी वा कुठलाही व्यवसाय न करता न्याय्य मार्गाने अब्जाधीश होण्याची कमाल त्याने करून दाखवली. त्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराचं गूढ सहजपणे उलगडून त्यात मोठी झेप कशी घ्यायची, यासाठीचं मार्गदर्शन केलं आहे.मुख्य म्हणजे अगदी मजेशीर आणि कुणालाही समजेल अशा भाषेमधल्या दिलखुलास विधानांच्या आधारे त्यानं हे साधलं आहे. बफेच्या या विधानांना मंत्र असं इथं म्हटलं आहे. याचं कारण म्हणजे त्याचं प्रत्येक विधान खूप विचारांमधून, अनुभवांमधून आणि यश-अपयश यांच्या हिंदोळ्यांवर तरंगल्यानंतर तयार झालेलं आहे. यांमधील नेमकी ५० विधानं निवडण्याचा प्रयत्न इथं केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ५० विधानांचा इथं नुसता उल्लेख नाही, तर प्रत्येक विधानामध्ये दडलेला बफेचा विचार आणि काही वेळा खोडसाळपणा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. एकुणच वॉरन बफेनं गुंतवणुकीच्या विश्वाला ग्लॅमर मिळवून दिलं, हे इथं आवर्जून सांगितलं पाहिजे. ‘गुंतवणूक म्हणजे जुगार नसून, नीट अभ्यास करून शांतपणे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्या माणसाला शेअर बाजारात यश मिळतंच,’ असा आत्मविश्वास त्यानं दिला आहे. अगदी छोट्या रकमांच्या गुंतवणुकीतूनसुद्धा अवाक करून सोडणारं यश गुंतवणूकदार शेअर बाजारात मिळवू शकतात. शेअर बाजार आणि गुंतवणूक यांच्याविषयी गैरसमजच जास्त पसरले आहेत. शेअर बाजाराविषयीची ही नकारात्मक मानसिकता काही अंशी मोडून काढण्यासाठी तरी अशा पुस्तकांचा उपयोग होईल.
लक्षात ठेवा गुंतवणूक विषयीचे अज्ञान आणि कर्ज एकत्रितपणे माणसाला डुबवू शकतात त्यामुळे कर्ज काढून गुंतवणूक करू नये गुंतवणूकीचे निर्णय विचारपूर्वक सर्व पर्याय पडताळून, योग्य सल्लागारांच्या मार्गदर्शनाने करावी. कारण अविचाराने केलेली खरेदी आपल्याला निश्चिंत झोप देऊ शकत नाही. सल्लागार निवडताना खूप काळजीपूर्वक निवडावा जो स्वतःच्या कमिशन साठी काम न करता आपल्या हिताला प्राधान्य देईल आणि जेणेकरुन आपले कुठेही नुकसान होणार नाही. आपले वर्तन हे गुंतवणूकदारापेक्षा उद्योजकाप्रमाणे हवे वायफळ खर्च टाळणारा ,नियमांचे पालन करणारा,यशाने हुरळून न जाणारा आणि अपयशाने खचूनही न जाता ध्येयाकडे सतत मार्गक्रमण करणारा उद्योजक व्हावे शेअर मार्केट मध्ये भाकिते करणारे कायम तोंडावर पडतात 100% खात्रीशीर भाकीत कुणीच मांडू शकत नाही. भाकीत मांडणारे कदाचित आपल्या उतावीळपणाचा फायदा घ्यायला टपले असतीलही भविष्यातील निरनिराळ्या शक्यताविषयी कुठलेच अंदाज बांधू नये आणि त्यावर आधारित गुंतवणूक ही नकोच. उदा. EV, AI सार्वमत हे आपल्या विचारांना पर्याय ठरत नाही त्यामुळे सगळेजण एखादा शेअर्स विकताना दिसतात म्हणून आपणही तसेच करू नये. इतर लोकांची मतानुसार नव्हे तर आपल्या उद्दिष्टानुसार आणि आपल्या अभ्यासानुसार शेअर्स बाबत आपले वर्तन असावे त्यामुळे एकदा गुंतवणूक केली तीन वर्षानंतरच पोर्टफोलिओत डोकवायचे, त्यातही सर्व गोष्टी योग्य असतील तर गुंतवणूक दीर्घकाळ तशीच ठेवावी.इथेच रंकाचा राव आणि रावाचा रंक होतो त्यामुळे फूकटचा माज बाळगू नका शेअर मार्केट पेक्षा कुणीही मोठे नाही शेअर्सची किंमत ही कामगिरीनुसार बदलते ट्रेडिंग मुळे वाढलेली किंमत कधीही खालीही येऊ शकते बाजारात अधूनमधून वेगवेगळ्या बूम येतात ,पण लक्षात ठेवा हे जास्त काळ टिकत नाही त्यामुळे दीर्घकाळ टिकणार्या कंपन्या निवडा. खराब कंपनीचे (Fraud Case) व्यवस्थापन बदलले तरीसुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करा. तेजीच्या काळात सगळ्या चांगल्या वाईट कंपन्या तरून जातात कंपनी आणि शेअरहोल्डरची खरी कसोटी बाजार भीतीच्या सावटाखाली असताना लागते. शेअर्स खरेदीचे निर्णय घेण्यापूर्वी कंपनीच्या कामगिरीचा विचार करा. नुसत्या कोरड्या आकडेवारीने किंवा अपूर्ण माहितीने फक्त दिखाव्याला भुलून गुंतवणूक करु नये. ज्या उद्योगांना सतत भांडवलाची आणि कर्जाची गरज लागते अश्या उद्योगातून परतावा नेहमी कमी मिळतो. तसेच काही क्षेत्राला वारंवार अडचणी (कच्च्या माल तुटवडा,आर्थिक घोटाळे ) येतात त्या कंपन्या गुंतवून पडू नका. नफा जरूर कमावयचा पण त्यासाठी अनाठायी धोका पत्करून आपली रात्रीची झोप मात्र गमवायची नाही घिसाडघाईने चुकीचे गुंतवणूक निर्णय घेउन अडचणीत स्वतःला पाडू नका शेअर्स विक्रीचे निर्णय घेण्यापूर्वी कंपनीचे भवितव्य आणि कामगिरी याचाच विचार करा. शेअर्स चे भाव कोसळले म्हणून विकू नका. तसेच दीर्घकाळ आपल्या जवळ शेअर्स बाळगले म्हणून घसरणीमुळे नुकसानही सहन करु नका शेअर बाजारात काय किंवा एकूणच काय ह्रदयापेक्षा मनाला आणि भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या. कारण बाजार पैशापेक्षा मानसिकतेवर चालतो.