मुखपृष्ठ
वपु

माझे शेल्फ

वपु

इंग्रजी शीर्षक
Vapu
सारांश

वपु : कन्येने रेखाटलेले भावचित्र... व. पु. काळे हे मराठीतील एक लोकप्रिय कथाकार. कथाकथनकार म्हणून ते अधिक प्रसिद्ध झाले. कथाकथनाच्या प्रयोगाला ‘उपयोजित कला’ (परफॉर्मिंग आर्ट) म्हणून त्यांनी मान्यता मिळवून दिली. देखणं व्यक्तिमत्त्व भाषाप्रभुत्व या दोनदेणग्यांबरोबरच त्यांना अनेक कला प्राप्त झाल्या होत्या. ते जानेमाने वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट) होते. मुंबई महापालिकेतील त्यांची नोकरी याच विषयाशी संबंधित होती. त्यांनी आरेखित केलेल्या मुंबई महापालिकेच्या अनेक वास्तू आजही मुंबईच्या वैभवात भर घालत आहेत. असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या व. पु. काळे यांच्या साहित्यिक, कलामय आणि त्यापेक्षाही प्रापंचिक व्यक्तिमत्वाचा मागोवा त्यांची कन्या स्वाती चांदोरकर यांनी वपु या छोटेखानी पुस्तकात नेमकेपणानं घेतला आहे. रूढार्थाने हे चरित्र नाही तर प्रसिद्ध असलेली एक व्यक्ती वडील म्हणून किंवा इतर सांसारिक नात्यात कशी दिसली त्याचे हे ‘भावचित्र’ आहे. व. पु. काळे ही त्यांची संक्षिप्त ओळख व. पु. या आद्याक्षरांपेक्षा ‘वपु’ या एका नावानेच प्रचलित झाली. म्हणून पुस्तकालाही तेच शीर्षक दिले आहे. वपुंचे वडील पु. श्री. काळे हे जुन्या जमान्यातील नामवंत नाट्यचित्र नेपथ्यकार होते. कलेचा हा वारसा वपुंकडे आला. त्यांनी सुमारे चौतीस वर्षांपूर्वी आपल्या पिताश्रींचे चरित्र ‘सांगे वडिलांची कीर्ती’ या नावाने प्रसिद्ध केली. तोच वारसा पुढे नेत वपुंच्या कन्येने आपल्याही पित्याचे जीवनचित्र शब्दांतून रेखाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रामाणिक म्हणण्याचे कारण, जवळच्या व्यक्तीबद्दल आणि त्यातही तिचे समाजात काही वेगळे स्थान असेल अशाबद्दल लिहिणे तसे अवघड असते. पण चांदोरकर यांनी प्रेम आणि तटस्थता प्रस्तुत पुस्तकात चांगल्या प्रकारे एकत्रित केली आहे. लेखिकेचे आजाबो, अण्णा (पु. श्री. काळे) सांगत असलेल्या एका छोट्याशा बोधकथेने पुस्तकाची सुरुवात होते. पुढच्या दहा पंधरा पृष्ठात आजोबा, आजी इतर माणसं, पुण्यातल्या ‘श्रम साफल्य’ बंगल्यातलं वास्तव्य, तिथल्या आठवणी, वपुंच्या लहानपणाच्या काही गोष्टी अशा स्वरुपात हे शब्दचित्र गती घेतं. अगदी थोडक्यात अनेक नाती या कॅन्व्हासवर शब्दांच्या माध्यमांतून उमटत राहतात. वपुंना मुलं बापू म्हणत, त्यामुळे पुढे बहुतेक उल्लेख त्याच नावानं होतो. त्याचं आर्किटेक्टरवरच शिक्षण मुंबईच्या जे. जे. मध्ये झालं आणि पुढचं सगळं आयुष्य ते ‘मुंबईकर’ म्हणूनच जगले. कुटुंबात वावरताना त्यांनी अगदी सहजतेने आपलं घर बहिणीला ‘भाऊबीज’ म्हणून देऊन टाकलं, असे त्यांच्या मनाच्या मोठेपणाचे अनेक नमुने पुस्तकात जागोजागी आढळतात. नोकरी व्यवसायातूनच त्यांनी लेखन चालू ठेवलं आणि पुढे त्यातूनच कथाकथन जन्माला आलं. त्याबद्दल लेखिका लिहिते, ‘कथाकथन बापूंना जमलं. नुसतं जमलं नाही, तर त्यात ते बादशहाच झाले. कुठलीही गोष्ट असू दे. कधीही सांगू देत, बापू त्यातल्या पाचांची नावं कधीही विसरले नाहीत. तीस-चाळीस गोष्टी तरी बापू सांगत असतच. (पृष्ठ १७) हा स्मरणशक्ती प्रत्यक्ष भेटलेल्या माणसांच्या बाबतीत मात्र दगा देत असलेल्या नमूद करतात. पण ही स्मरणशक्ती हा त्यांच्या आईचा वारसा असल्याचेही त्या सांगून जातात. वपुंची पत्नी वसुंधरा, लेखिकेची आई, तिचंही व्यक्तिचित्रण यात येणं ओघात आलंच. पण जवळपास ते निम्म्यानं आलंय. अर्थात तेही आवश्यक आहे. पण पुस्तकाचं नाव वपु-वसुंधरा या अद्वैताच ‘वपुंधरा’ असं एकत्रित केलं असतं तर ते अधिक उठून दिसलं असतं. चाळीतल्या जीवनापासून नंतर सुस्थितीतील निवासस्थान असा प्रवास आणि त्यातील मध्यमवर्गीय गृहिणी म्हणून त्याचं स्थान, स्वभाव यांचं एक चांगलं चित्रण येतं. पती-पत्नीचं एकमेकांवरचे प्रेम आणि संसाराला समर्पित अशी भारतीय गृहिणी, मुलांवरच्या संस्काराचं महत्त्व अशा अनेक गोष्टी यात येतात. त्या लिहितात, ‘आई स्वत: एक कलाकार होती. ती गायची छान (पृ. ३७) त्यांना नाटकात काम करण्याची संधी मिळत होती. पण कुटुंबासाठी त्यांनी स्वत:हून ते नाकारलं. उत्तम समीक्षक म्हणून वसुंधरा याच वपुंच्या पहिल्या वाचक होत्या. त्यांनी इतरही अनेक नाट्परीक्षणं लिहिली; त्याचं ‘दहाव्या रांगेतून’ हे पुस्तकही प्रसिद्ध झालं आहे. त्यामानानं त्या लवकर गेल्या. त्यांचे एक उद्गार विदारक चित्र उभं करतं. त्या वपुंना म्हणाल्या होत्या, आधी मी मेली तर सुटले. पण एक विनंती, घर माझ्या नावावर ठेवा. तुम्ही माझ्या आधी गेलात तर माझं आयुष्य त्या नटसम्राटासारखं भरकटू नये म्हणून (पृ. ३८) ही अनिश्चितता शब्दात पकडून स्वारी लिहितात, आईला विश्वास अविश्वासाचा प्रश्न भेडसावला नाही. हा प्रश्न निर्माण होण्याआधीच तिच्या जाणिवा लुप्त झाल्या आणि नंतर ती स्वत:च लुप्त झाली. (पृ. ३९) आईच्या मृत्यूचे वर्णन वाचताना माणसातली सहृदयता जागी होते. (पृ.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
134
भाषा
मराठी
किंमत
120.00
ISBN
9788177668285
समुदायाने जोडले
बंद