मुखपृष्ठ
व्यक्तिवेध : शरद पवार ते गोविंद पानसरे

माझे शेल्फ

व्यक्तिवेध : शरद पवार ते गोविंद पानसरे

इंग्रजी शीर्षक
Vyaktivedha : Sharad Pawar Te Govind Pansare
सारांश

डॉ. जयसिंग पवार यांच्या ‘व्यक्तिवेध : शरद पवार ते गोविंद पानसरे’ या पुस्तकात एकूण अठरा लेखांचा समावेश करण्यात आला आहे. समाजातील अनेक मान्यवरांची व्यक्तिचित्रे या पुस्तकात शब्दांकित केली आहेत. यात शरद पवार, पंडित सेतु माधवराव पगडी, मु. गो. गुळवणी, सूर्यकांत-चंद्रकांत हे बंधू, कॉ. गोविंदराव पानसरे अशा अनेक मान्यवर मंडळींचा समावेश आहे. या मंडळींची व्यक्तिचित्रे म्हणजे लेखकाला त्यांच्यातील विविध गुणांमधून घडलेले व्यक्तिदर्शनच होय. साहित्य, संस्कृती, इतिहास यांची जाण असणारे शरद पवार...भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम... सिने-नाट्य कलावंत, लेखक सूर्यकांत...सिने कलावंत चंद्रकांत यांची चित्रकारिता...फारसी भाषेत असणारा मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचा खजिना मराठीत आणणारे सेतुमाधवराव पगडी... ऐतिहासिक साधन साहित्य संपादन-प्रकाशनातून समोर आणणारे थोर इतिहास संशोधक डॉ. आप्पासाहेब पवार...‘थोरातांची कमळा’ या दंतकथेला विराम देणारे मु. गो. गुळवणी... निरपेक्षपणे इतिहास संशोधन करणारे समुद्रगुप्त पाटील... शाहू महाराजांच्या दिलदारपणाचं दर्शन घडविणारे दादा महाराज सांगवडेकर...बुिद्धप्रामाण्यवादी नास्तिक विचारवंत भाई माधवराव बागल... लोकशिक्षणास वाहून घेतलेले मालोजीराजे निंबाळकर...इतिहास आणि इतिहासेतर क्षेत्रातील व्यक्तींचा ओघवत्या भाषेत घेतलेला अभ्यासपूर्ण वेध.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद