मुखपृष्ठ
योद्धा शास्त्रज्ञ राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम

माझे शेल्फ

योद्धा शास्त्रज्ञ राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम

इंग्रजी शीर्षक
Yoddha Shastradnya Rashtrapati A. P. J. Abdul Kalam
सारांश

रोचक परिचय... भारताचे बारावे राष्ट्रपती म्हणून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २५ जुलै २००२ रोजी शपथ घेती, तेव्हा या सर्वोच्य पदावर आरूढ होणारी राजकीय क्षेत्राबाहेरची दुसरी व्यक्ती अशी नोंद इतिहासात झाली. यापूर्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् या थोर त्वज्ञाची या पदी निवड झाली होती. डॉ. कलाम हे मुळातले एक योद्धा शास्त्रज्ञ. ‘सामर्थ्य सामर्थ्यांचा आदर करते’ हे सूत्र मनाशी बाळगून त्यांनी भारताला संरक्षणदृष्ट्या समर्थ करण्याचे स्वप्न उरी बाळगले. १९८२ ते १९९२ या अवघ्या दहा वर्षांत ‘एकात्मिक लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र विकसन योजना’ पूर्ण केली आणि त्रिशूल, पृथ्वी, अग्नी, नाग आणि आकाश या पंचास्त्रांचा उदय झाला. देशाचा सर्वोच्च नेता बनलेल्या या थोर शास्त्रज्ञानाच्या आयुष्याचा, विचारसरणींचा जुजबी परिचय सर्वसामान्यांना व्हावा म्हणून माधव मोर्डेकर यांनी लिहिलेले त्यांचे छोटेखानी चरित्र रोचक व लहानथोरांसाठी उपयुक्त आहे. डॉ. कलाम यांचा जीवनपट थोडक्यात विशद करतानाच त्यांच्या उत्तुंग कार्याचा सुरेख आढावाही घेतल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
68
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788177664072
समुदायाने जोडले
बंद