मुखपृष्ठ

माझे शेल्फ

यशाची द्वारे

इंग्रजी शीर्षक
Yashachi Dware
सारांश

यश म्हणजे काय ? यश म्हणजे नुसते द्रव्य मिळवणे नव्हे. यश मिळवूनही मन अतृप्त राहात असेल , जीवाची तगमग संपत नसेल तर त्याला यश म्हणता येणार नाही. खरे सुख-समाधान देणाऱ्या उत्कर्षाचा पाया कसा घालायचा , मिळालेल्या यशाने मन प्रसन्न कसे करायचे हेच या पुस्तकात सांगितले आहे. यशाचे हे नवे रस्ते शुद्ध मार्गाचेच हवे असले पाहिजेत. यावरही भर दिला आहे. जो , समोरचा माणूस ओळखतो , सतत सावध राहतो , कार्यक्षम असतो त्यालाच यशाचे वरदान लाभत असते. यश , प्रथम माणसाच्या मनात तयार होते व नंतर ते प्रत्यक्षात उतरते. म्हणून ज्याला यश मिळवायचे आहे त्याने प्रथम स्वप्ने पहायला शिकले पाहिजे. आणि ती स्वप्ने साकार करण्यासाठी त्याने अथक परिश्रम केले पाहिजेत , हेच या पुस्तकात सांगितले आहे. यशासाठी लहानसहान गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण कोणती गोष्ट केव्हा उपयोगी पड़ेल हे सांगता येत नाही. नदीचा उगम अगदी छोटाच असतो , त्याप्रमाणे नंतर प्रचंड वाटणारे उद्योग सुरवातीला अगदी छोट्या प्रमाणात असतात. म्हणून सामान्य गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्यातूनच मोठे यश लाभू शकते , हेच येथे सांगितले आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
110.00