- Log in to post comments
मजकूर
भाग - २ सुद्धा दुसर्या पानावर गेला म्हणून तिसरा भाग सुरु करत आहे.
-----------------------------------------------------
मी अलिकडे घेतलेली पुस्तके
मराठी:
- श्रीगाडगेमहाराज - गो.नी.दांडेकर ( शेवटी एकदाचे मिळाले :) बुकगंगा.कॉम वर मिळाले )
- बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
- रथचक्र - श्री. ना. पेंडसे (साहित्य अकादमी पारितोषिक विजेती कादंबरी)
- रणांगण - विश्राम बेडेकर
इंग्रजी:
- अ बेन्ड इन द गँजेस - मनोहर माळगांवकर (मी 'गंगेज्' असा उच्चार करतो ;) )
- रावण अॅन्ड एडी - किरण नगरकर
चर्चा प्रकार
अभिप्राय
वल्ली
वल्ली · Tue, 16 Nov 2010 - 11:17
अगदी नुकतीच घेतलेली पुस्तके म्हणजे
आवरण - एस. एल. भैरप्पा - अनु. उमा कुलकर्णी
सीविच - अॅलिस्टर मॅक्लीन - अनु. अशोक पाध्ये
धनंजय - रौप्यमहोत्स्वी दिवाळी अंक.
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Tue, 16 Nov 2010 - 12:21
इमारत - फिरोझ रानडे
शुभ्र काही जीवघेणे - अंबरीश मिश्र
रीटा वेलिणकर - शांता गोखले
भाषा आणि संस्कृती - ना. गो. कालेलकर
वाचणार्याची रोजनिशी - सतीश काळसेकर
चाऊस मराठी इंग्रजी डिक्शनरी (उत्तम डिक्शनरी आहे. अद्ययावत आणि मराठी वापरकर्त्यांचा विचार करून बनवलेली. नाव आणि प्रसिद्धीमुळे बिचकला असाल, तर बिचकू नका.)
ठाण्यात सरस्वती सेकंडरी स्कूलच्या मैदानात अक्षरधाराचे प्रदर्शन आहे. तिथूनच घेतली.
एकावर एक फुकट, भरघोस सवलत. सगळे छान आहे. पण एक वाईट म्हणजे कार्ड घेत नाहीत. :(
रोचीन
रोचीन · Tue, 16 Nov 2010 - 12:40 · उत्तर
>> चाऊस मराठी इंग्रजी डिक्शनरी. उत्तम डिक्शनरी आहे.
सहमत्!!
भरघोस सवलत--म्हणजे किती % ??
इमारत कशावर आहे?? फिरोझ रानडे म्हणजे तेच ना जे आर्किटेक्ट आहेत्??प्रतिभा रानडेंचे मिस्टर का??
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Tue, 16 Nov 2010 - 15:05 · उत्तर
१०, १५, २०, ४०... टक्के. खरेदीच्या किमतीवर अवलंबून.
फिरोझ रानडे म्हंजे तेच.
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 17 Nov 2010 - 06:32
पाडस
अकरा कोटी गॅलन पाणी
डोंगर म्हातारा झाला
हेडहंटर
आणि अजून एक आहे ज्यामधाल उतारा मी वेळ मिळताच टाकेन तेव्हा त्याचं नाव देत नाही :) :P
बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते · Wed, 8 Dec 2010 - 07:05 · उत्तर
ऋष्या, 'डोंगर...' कसे वाटले रे?
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 8 Dec 2010 - 15:43 · उत्तर
'डोंगर..' नुसतंच घेतलंय, अजून वाचायचंय. ते वाचायला घ्यायच्या आधी हातात "ईंडिया आफ्टर गांधी" आलंय :)
'डोंगर..' वाचलं की सांगतो कसं वाटलं ते
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 17 Nov 2010 - 08:11
श्री.सागर यांच्या यादीतील
- बनगरवाडी, रथचक्र, रणांगण, अ बेन्ड इन द गँजेस, रावण अॅन्ड एडी ही सर्व पुस्तके माझ्याकडे जरी असली तरी आता 'रथचक्र' आणि 'रणांगण' खूपच जीर्ण झाले असल्याने ते कपाटातून [वाळवीच्या भीतीने] काढून टाकणे गरजेचे आहे. टाकीनही....पण परत नव्याने ही दोन्ही पुस्तके घ्यावीत का असा संदेह निर्माण झाला आहे....जोपर्यंत ती अवस्था आहे, तो पर्यंत दोन्ही असू द्यावी असेही मन सांगत आहे.
२. मेघना यांच्या यादीतील ~ चाऊस मराठी इंग्रजी डिक्शनरी ~ खरंच सुंदर आणि मोहोरेदार छपाई असलेली संग्राह्य डिक्शनरी आहे यात दुमत नाही. खूप सवलतीत देतात असे म्हणतात....माझ्याकडे आहेच पण ती प्रेझेंट मिळाली असल्याने किंमतीबाबत चौकशी करण्याच्या प्रश्न आलाच नाही.
"भाषा आणि संस्कृती - ना. गो. कालेलकर" ~~
या निमित्ताने एके ठिकाणी झालेल्या वाचनाचा संदर्भ आठवत आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने बृहद् मराठी शब्दकोशाचा एक प्रकल्प डॉ.कालेलकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापला होता.... तो शब्दकोश अस्तित्वात आला का? याची काही माहिती असल्यास मेघना यानी इथेच द्यावी अशी विनंती आहे. मला त्याबाबतची प्रगती कुठे आढळली नाही. साहित्य व संस्कृती मंडळ तर इतके उदासिन आहे की, चौकशी पत्राला साधी पोचदेखील देत नाहीत.....[असो ते अवांतर आहे.]
इन्द्रा
रोचीन
रोचीन · Wed, 17 Nov 2010 - 09:37 · उत्तर
>>खूप सवलतीत देतात.
मला चाऊस मराठी इंग्रजी डिक्शनरी + २ इतर पुस्तके रु. १५०/- ला मिळाली.
सागर
सागर · Wed, 17 Nov 2010 - 10:26 · उत्तर
रथचक्र' आणि 'रणांगण' खूपच जीर्ण झाले असल्याने ते कपाटातून [वाळवीच्या भीतीने] काढून टाकणे गरजेचे आहे. टाकीनही....पण परत नव्याने ही दोन्ही पुस्तके घ्यावीत का असा संदेह निर्माण झाला आहे....जोपर्यंत ती अवस्था आहे, तो पर्यंत दोन्ही असू द्यावी असेही मन सांगत आहे
इंद्रराज, मागे पुस्तकविश्ववर एक महत्त्वाची चर्चा झाली होती की, पुस्तकांची काळजी कशी घ्यावी?
तुम्ही यात काही भर टाकू शकला तर आनंद होईलच पण त्यातील काही उपाय तुम्ही वापरुन तुमची पुस्तके वाचवू शकलात तर अधिक आनंद होईल :)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 17 Nov 2010 - 10:49 · उत्तर
"...मागे पुस्तकविश्ववर एक महत्त्वाची चर्चा झाली होती की, पुस्तकांची काळजी कशी घ्यावी?"
अरेच्या मला हा इतका महत्वाचा धागा माहितीच नव्हता...! वॉव....वाचतोय. माहितीपूर्ण तसेच रंजनात्मकही दिसतोय. वाचून प्रतिक्रिया देतो.
इन्द्रा
सागर
सागर · Wed, 17 Nov 2010 - 10:56 · उत्तर
हो इंद्रराज,
जुनीच चर्चा होती तुम्ही इथे येण्यापूर्वीची... म्हणूनच दुवा दिला :)
उपयोग होईल अशी आशा आहे.
त्या लेखावर प्रतिक्रियेची वाट बघतो आहे.
आता ब्रेक घेतोय संध्याकाळीच येईल आता :)
सागर
सागर · गुरुवार, 18 Nov 2010 - 07:59
१. मोरू आणि मैना - चि. वि. जोशी
२. हास्य चिंतामणी - चि. वि. जोशी
३. चिमणरावांचे चर्हाट - चि. वि. जोशी
४. सत्तांतर - व्यंकटेश माडगूळकर (साहित्य अकादमी पारितोषिक विजेती कादंबरी) नाही मिळाले :(
सागर
सागर · Fri, 19 Nov 2010 - 16:57
१. असह्य - सुहास शिरवळकर
२. निमित्तमात्र - सुहास शिरवळकर
३. आक्रोश - सुहास शिरवळकर
४. एका तेलियाने - गिरीश कुबेर
५. कान्होजी आंग्रे - मूळ इंग्रजी लेखक मनोहर माळगांवकर , मराठी अनुवादः पु.ल. देशपांडे
६. माचीवरला बुधा - गोनीदां
७. वाघरु त्या तिथे रुखातळी - गोनीदां
८. क्रौंचकाव्य - सुरेशचंद्र वारघडे
शर्मिला फडके
शर्मिला फडके · Wed, 24 Nov 2010 - 13:02
लिओनार्दो दा विन्सी- दीपक घारे
पिवळ्या धम्मक छत्रीतली मुलगी- मुळ लेखक उदय प्रकाश, अनुवाद- गणेश विस्पुते
तुम्हे याद होगा- (हिंदी चित्रपटाचा इतिहास १९३१ ते २००८)- अशोक उजळंबकर
आरागॉर्न
आरागॉर्न · Fri, 26 Nov 2010 - 15:17
एकूणात पब्लीकची जोरदार पुस्तक खरेदी चालू आहे. :)
माझी अजून दिवाळीत घेतलेली वाचून व्हायची आहेत. :(
शमिश
शमिश · Fri, 26 Nov 2010 - 18:18
'निरगाठी' आणि 'चंद्रिके ग, सारिके ग' -- गौरी देशपांडे
साद देती हिमशिखरे --- जी. के. प्रधान ( अनुवाद डॉ. रामचंद्र जोशी )
परमहंस योगानंदांचं अॅन ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी
एक मित्राकडून आलेलं बारोमास ही आहे सदानंद देशमुखांचं
सागर
सागर · Fri, 26 Nov 2010 - 18:29 · उत्तर
साद देती हिमशिखरे --- जी. के. प्रधान ( अनुवाद डॉ. रामचंद्र जोशी )
वैयक्तिक मला हे पुस्तक खूप आवडते. अजूनही मी हे पुस्तक सहा महिन्यांतून एकदा तरी वाचतोच.
अध्यात्मात एवढे साधे सरळ पण नितांत सुंदर आणि अगदी नितळ पुस्तक क्वचितच दिसते.
मला तरी हे पुस्तक खूप आवडले आहे :)
सुंदर निवड एवढेच म्हणेन.
अर्थात बाकीची सर्व पुस्तके (बारोमास सकट) छानच आहेत यात शंका नाही. पण साद देती मध्ये जो स्पष्टपणा, सरळपणा आहे तो वेगळाच आहे.
शमिश
शमिश · Fri, 26 Nov 2010 - 19:43 · उत्तर
खरं आहे.आणि मुळात अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल करणारा त्याचे आधीचे आयुष्य आणि नंतरचे आयुष्य याचा दुवा कसा साधतो हे वर्णन फार क्वचित वाचायला मिळते.
तसे या बाबतीत मालती बाळ यांचे 'कोण्या एकाची साधनगाथा' सुद्धा आवडले होते. पुढच्या वेळेस कदाचित ते घेईन.
सागर
सागर · Fri, 26 Nov 2010 - 19:47 · उत्तर
कोण्या एकाची साधनगाथा बद्दल माहिती नाही. वाचलेले नाही. माहिती दिलीत तर आवडेल जाणून घ्यायला
पण यानिमित्ताने या ही एका पुस्तकाची ओळख झाली.
मिळवून वाचेन हे देखील पुस्तक.
शमिश
शमिश · Fri, 26 Nov 2010 - 20:00 · उत्तर
ॐ मालती बाळ या मिरजेजवळील म्हैसाळ च्या. त्यांची अध्यात्मात बरीच प्रगती होती. बराचसा काळ त्या उत्तर भारतात राहत होत्या. तसे पहायला गेले तर त्या एक संसारी स्त्रीच. नवरा, मुलं यांच सगळं करून त्या साधना करत असत. 'कोण्या एकाची साधनगाथा' मध्ये त्यांचा हा प्रवास त्यांनी सांगितला आहे. काहीशी अनुदिनी वाटासी असंच पुस्तक आहे. पण त्यात त्यांच्या साधनातल्या प्रगतीचं, वेगवेगळ्या टप्प्यांचं, त्यांच्या गुरुंचं मार्गदर्शन, सिद्धींचे अनुभव असं सगळं कथन त्यांच्याच शब्दात येतं. म्हणजे सांगोवांगी, अफवा यांच्या ऐवजी खुद्द साधकाच्या तोंडून आलेले अनुभव असल्यामुळे त्यांचं एक वेगळंच मुल्य आहे असं मला वाटतं.
वाचनालयात गेलो तर हे पुस्तक आणेन आणि इथे डेटाबेस मध्ये अॅड करेन.
सागर
सागर · Sat, 27 Nov 2010 - 16:10 · उत्तर
अरे वा छान माहिती दिलीत. हे पुस्तक नक्की मिळवून वाचेन.
एका अज्ञात (किमान मला तरी) पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद :)
त्यांची वेबसाईट सापडली : http://www.ommalatitapovan.org/index.htm
शमिश
शमिश · Sun, 28 Nov 2010 - 09:58 · उत्तर
वाचनालय ही जागाच अशी आहे ना... दर वेळेला काही तरी नवीन असं वाचायला मिळतंच!
सागर
सागर · Sun, 28 Nov 2010 - 11:45 · उत्तर
अगदी अगदी :)
टण्या
टण्या · Sun, 5 Dec 2010 - 16:53 · उत्तर
अरे वा. हे माहितीच नव्हते. ह्या आमच्या शेजारी. म्हणजे भिंतीला भिंत लागून. फार मृदू स्वभावाच्या बाई होत्या या. बाकी अध्यात्माबद्दल मी ठार असल्याने अध्यात्मिक पुस्तकांच्या वाटेला जात नाही.
३_१४ अदिती
३_१४ अदिती · Mon, 29 Nov 2010 - 11:12 · उत्तर
हे वाचलंत का? वाचून झालं असेल तर त्याबद्दल काही लिहाल का? माझ्याकडे बरेच दिवस आहे, अजून उघडलेलंही नाही. :-(
शमिश
शमिश · Mon, 29 Nov 2010 - 14:26 · उत्तर
मीही अजून वाचलं नाही आहे. ज्या दिवशी ही तीन पुस्तकं घेऊन आलो त्यादिवशी थोडं चाळलं होतं.पाहू कधी मूड लागतो ते..
बर्याच दिवसांत एकसंध असं वाच्न होतच नाहीये. मध्यंतरी बाकी शून्य तेवढं एकसंधपणे वाचलं होतं.
टण्या
टण्या · Sun, 5 Dec 2010 - 16:51 · उत्तर
हे पुस्तक योगी महेश (बीटल्सफेम - नेदरलँडमध्ये वास्तव्य - मागल्या वर्षी निर्वतले) यांचे आहे ना?
शमिश
शमिश · गुरुवार, 23 Dec 2010 - 18:24 · उत्तर
नाही... परमहंस योगानंदांचं आहे ते.
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 24 Dec 2010 - 05:57 · उत्तर
करेक्ट माझ्याकडे आहे हे पुस्तक.. ठिक आहे.. सुरवात फार रोचक असली तरी मला नंतर कंटाळवाणे झाले
यशोधरा
यशोधरा · Sat, 27 Nov 2010 - 05:00
मिळवतीची पोतडी -संपादित विद्या बाळ/ मेधा राजहंस
कारागृहाच्या भिंती, शंख आणि शिंपले, सीतेचे पोहे - ना ग गोरे
आतला आनंद, नक्षत्रचित्रे - शांता शेळके
>>'कोण्या एकाची साधनगाथा>>> छान आहे हे पुस्तक.
नंदन
नंदन · Sun, 28 Nov 2010 - 21:04
ग्रेस मेटॅलियसचं 'पेटन प्लेस' हे पुस्तक घेतलं. हे नाव जीएंच्या एका कथेत (ओळखा पाहू) वाचलं होतं, तेव्हापासून डोक्यात होतं. दुसरं म्हणजे हॉवर्ड झिनचं 'अ पीपल्स हिस्टरी ऑफ युनायटेड स्टेट्स'. 'इंडिया आफ्टर गांधी' या तुलनेत कसं वाटतं हाही एक किडा डोक्यात आहेच. मराठीत दिवाळी अंक पोस्टाने यायची वाट पाहतोय.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 29 Nov 2010 - 09:05
नंदन....जमल्यास 'पेटन प्लेस' हा चित्रपटदेखील जरूर पाहा. खूप जुना आहे [मला वाटते ५६-५७ चा असेल], पण आम्हास येथील स्थानिक थिएटर क्लब युनिटमार्फत 'गोल्डन डेज ऑफ हॉलिवूड' अशा एका आठवड्याच्या कार्यक्रमात पाहायला मिळाला होता (आता, त्यातील दुसरे दोन आठवणारे १. कॅसाब्लांका व २. ऑल अबाऊट ईव्ह). तो पाहूनच ग्रेसची कादंबरी वाचावी वाटली. त्या काळात (१९५६) एका स्त्री लेखिकेने तसा धाडसाचाच विषय निवडला होता यात संदेह नाही. (त्यातील 'सेलेना' या पात्राचे नाव मला जितके आवडते तितके तिचे चित्रीकरणही....अगदी ट्रॉयच्या 'हेलेन' सारखेच)
जी.एं.नी 'माणूस नावाचा बेटा' मध्ये उल्लेख केला आहे या कादंबरीचा.....["चौकात तो नेहमी जेथे पुस्तके घेत असे तो बुकस्टॉल होता. सहज जाता जाता त्याने शोकेसमध्ये 'पेटन प्लेस' हे पुस्तक आहे की नाही पाहिले. होय, ते अद्याप तिथे होतेच. ते त्याला फार दिवसांपासून विकत घ्यायचे होते....." इ. इ.]
इन्द्रा
रोचीन
रोचीन · Mon, 29 Nov 2010 - 10:09 · उत्तर
हे पण छान आहेत!! चंदेरीच्या एका खुप जुन्या दिवाळी अंकात गौतम राज्याध्यक्षांनी लिहिलेल्या एका लेखाची आठवण झाली. त्यात त्यांनी त्यांना आवडणार्या हॉलिवुड क्लासिक्स बद्दल लिहिलं होतं!!फारच छान लेख होता तो!! माझी क्लासिक्स्ची आवड डेव्हलप व्हायला त्याचा फार मोठा हात आहे. राज्याध्यक्षांचे सर्वच लिखाण (आणि अर्थातच फोटोपण) छान असते!! :)
यशोधरा
यशोधरा · Mon, 29 Nov 2010 - 10:13 · उत्तर
>राज्याध्यक्षांचे सर्वच लिखाण (आणि अर्थातच फोटोपण) छान असते!!
राजाध्यक्षांची लिहायची ष्टाईल मलाही आवडते. फोटो तर सुरेखच.
रोचीन
रोचीन · Mon, 29 Nov 2010 - 10:17 · उत्तर
च्या शेवट्च्या सीन ने फारच प्रभाव टाकला होता माझ्यावर्!!जेव्हा तो फादर कोर्टात त्यामुलीच्या बाजुने साक्ष देतो!!
दुर्दैवाने मला तो संपुर्ण संवाद आठवत नाहीये!!
@ इंद्रा,
संदर्भ देऊ शकाल का??
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 29 Nov 2010 - 16:29 · उत्तर
"....दुर्दैवाने मला तो संपुर्ण संवाद आठवत नाहीये!!..."
डोण्ट वरी....जरूर देतो.
इन्द्रा
नंदन
नंदन · Mon, 29 Nov 2010 - 11:21 · उत्तर
>>> जी.एं.नी 'माणूस नावाचा बेटा' मध्ये उल्लेख केला आहे या कादंबरीचा.....
--- बरोबर, तेव्हापासूनच नाव लक्षात होतं. त्यांच्या पत्रव्यवहारातून सापडलेलं असंच अजून एक नाव म्हणजे 'स्टोरी ऑफ अॅन आफ्रिकन फार्म'. पुस्तक वाचून झालं की चित्रपटाचा शोध घेतोच. रोचिननेही त्याची शिफारस केली आहे.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Tue, 30 Nov 2010 - 06:35
"....जेव्हा तो फादर कोर्टात त्यामुलीच्या बाजुने साक्ष देतो!! दुर्दैवाने मला तो संपुर्ण संवाद आठवत नाहीये!!......"
~~ हुश्श !! झालं एकदाचं ती साक्ष उतरवून घेण्याच काम, थेट डीव्हीडीवरून...रोचीन. हेअर इट इज फॉर यू.
"....I am sure that the prosecute will see truth of the investigation. I assisted her in miscarriage, miscarriage of Lucas Cross’ baby. By witnessing here, perhaps I could lose the great privilege of my practice in medicine.
But it is time that someone should spoke of the whatever the price of the privilege of speak. Selena out of fear, fear of being forced to submit her guts, when she hid her crime for fear of how we would react to her being assaulted by her step-father. She couldn't trust no one anymore. Selena had to see me for medical reasons, reasons she swore me of the secrecy. No one violet the secrecy except for a bigger purpose. We all the prisoners of each others guilt, killed by each others deeds. It is time to stop now. We’re a small town, but we’re a prosperous one—and yet we allow tar-paper shacks to stand. We have half a dozen churches which most of you attend—and then don’t practice the work they preach once you walk down the steps. We have a fine school that you take for granted. We have a newspaper with a most intelligent editorial page—which you use for wrapping garbage. It’s time you people woke up. Perhaps today is the day that you will, because there’s something much bigger than the tragedy of Selena Cross on trial here—our indifference, our failure as a community to watch over one another, to know who needs help and to give it. Selena has been living in a prison of a wrong, long enough one we have built. I have no more to say your honour."
हॅपी ?? आय बेट यू आर, रोचीन.
इन्द्रा
रोचीन
रोचीन · Tue, 30 Nov 2010 - 06:57 · उत्तर
आय अॅम हॅप्पी !!ही साक्ष अगदी शेवटी आहे का?? नंतर चित्रपट संपतो??
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Tue, 30 Nov 2010 - 08:32 · उत्तर
नक्कीच....त्यानंतर ज्युरी सदस्य निकालासाठी चेम्बरमध्ये जातात व बाहेर येवून 'व्हर्डिक्ट = डिफेन्ड्न्ट नॉट गिल्टी' जाहीर करतात....सेलेनाची सुटका....मग तिथून थोडासा तो 'ऑल ईज वेल.....रीयुनियन' चा सीन....पेटन प्लेस रस्त्यावर असलेल्या त्या टुमदार घरात सर्व प्रवेश करतात....कॅमेरा रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हिरव्याकंच झाडीवर केन्द्रीत होतो व त्या मागे आवाज येतो कॉन्स्टन्स मॅकेन्झीचा....
".....We finally discovered that season of love. It is only found in someone's else's heart. Right now, someone you know is looking everywhere for it -- and it is in you..." ~ मग द एन्ड !
हेही छानच आहे.....मी विसरलोच होतो...थॅन्क्स, रोचीन.
इन्द्रा
नंदन
नंदन · Tue, 30 Nov 2010 - 10:48
वी (We) हे येव्हगेनी झाम्यातिन या लेखकाचं पुस्तक आत्ताच विकत घेतलं. कारण? हा दुवा पहा. १९१७ च्या बोल्शेविक क्रांतीनंतर अवघ्या तीनच वर्षांत हे पुस्तक यावं, ही गोष्ट रोचक आहे.
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 3 Dec 2010 - 05:23 · उत्तर
खरंच रोचक आहे.
लवकर वाच आनि सांग कसं आहे ते
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 2 Dec 2010 - 05:06
रानातील प्रकाश - जी ए
सोन्याचा पिंपळ - श्रीनिवास कुलकर्णी
क्रांतिकारकांचा अध्यात्मवाद -गोपाळ गोडसे
हिंदुत्व - स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर
यशोधरा
यशोधरा · Sun, 5 Dec 2010 - 11:31
कोसबाडच्या टेकडीवरुन - अनुताई वाघ
पाडस- अनुवादित - राम पट्वर्धन
बालकांड - ह मो मराठे
आस्तिक शिरोमणी चार्वाक - डॉ साळुंखे
मर्हाटी लावणी- म वा धोंड
नागझिरा, बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
मुक्काम शांतिनिकेतन - पु ल देशपांडे
देवांची जन्मकथा - पुष्पा त्रिलोकेकर
शिवकालीन महाराष्ट्र - डॉ अ रा कुलकर्णी
सुनीताबाई - मंगला गोडबोले
पूर्णिया आणि मुक्तांगणची गोष्ट - अनिल अवचट
एका रानवेड्याची शोधयात्रा -कृष्णमेघ कुंटे
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Tue, 7 Dec 2010 - 18:57
कोल्हापुरात "किताब कॉर्नर" मार्फत कालपासून शाहु स्मारक भवन येथे पुस्तक प्रदर्शन सुरू झाले आणि विशेष म्हणजे आपल्या येथील सदस्या आणि प्रख्यात लेखिका कविता महाजन आणि मिलिंद बोकील यांची पुस्तके अगदी दर्शनी भागात लावण्यात आली आहे. प्रदर्शनाला भेट देणारी साहित्यप्रेमी मंडळींच्या नजरेत ही रचना चटकन येते.
या निमित्ताने आज पहिल्या दिवशी तिथे जी पुस्तके मी खरेदी केली ती खालीलप्रमाणे :
१. ग्राफिटी वॉल ~ कविता महाजन यांची पहिली दोन्ही पुस्तके अनुक्रमे 'ब्र' आणि 'भिन्न' ही अगोदरच खरेदी केली होती. त्यामुळे 'ग्राफिटी वॉल' विषयी उत्सुकता होतीच. शिवाय मला वाटते कविताताईंनीच अनुवादित केलेले इस्मत चुगताई (बरोबर?) यांचे एक पुस्तक तिथे दिसले. अनुवादित विभागाकडे गर्दी जरा जास्तच असल्याने ते पुस्तक हाती घेता आले नाही...पण प्रदर्शन ३० डिसेंबरपर्यंत असल्याने नंतर पाहिनच. ग्राफिटी वॉलचे मुखपृष्ठ आणि पुस्तकाची मांडणी लक्ष वेधून घेते. राजहंसने कविता महाजन या नावाला कोणता दर्जा दिला आहे ते लागलीच समजून येते.
(थोडेसे अवांतर ~ कविता महाजन यांच्यासाठीच ~ ग्राफिटी वॉलचे राजहंसने स्पेलिंग Graffity असे करण्याचे कारण काय?)
२. शाळा : मिलिंद बोकील : माझ्या आवडत्या लेखकांच्या यादीतील लेखकाचे पुस्तक....मौजेची देखणी छपाई.
३. जागर - नरहर कुरुंदकर
४. महानायक, पानिपत ~ विश्वास पाटील : प्रचंड खपाच्या या दोन कादंबर्या धारवाड (कर्नाटक) इथे कॉलेज शिक्षण घेत असलेल्या माझ्या मावसबहीणीसाठी.
इन्द्रा
कविता महाजन
कविता महाजन · Wed, 8 Dec 2010 - 04:16
(थोडेसे अवांतर ~ कविता महाजन यांच्यासाठीच ~ ग्राफिटी वॉलचे राजहंसने स्पेलिंग Graffity असे करण्याचे कारण काय?)
ओ ओ... ही माझीच चूक. :-(. पुढच्या आवृत्तीत नक्की दुरुस्त करेन. ( आमचे प्रकाशक म्हणतात तसे म्हणते, "पुढची आवृत्ती आली तर...!") :-). वर्षभरात दुसरी आली आहे, त्या अर्थी तिसरी येईलच म्हणा! असो. पण वाचताना अजून काही चुका लक्षात आल्या तर जरूर कळवा. माझ्याकडे मी लिहिलेल्या, संपादित केलेल्या पुस्तकांची एक 'दुरुस्त्यांची प्रत' बाजूला ठेवलेली असते. ही डॉ. सरोजिनी वैद्य यांनी लावलेली चांगली सवय. चौथ्या आवृत्तीतही बाई मजकूर दुरुस्त करायच्या. :-).
आणि हो, या खेपेला या पुस्तकाचे मुखपृष्ठ व मांडणी मीच केलेली आहे. पुस्तकात वृत्तपत्रीय धाटणीचे फोटो वापरावेत ही कल्पना प्रवीण टोकेकर यांची होती. ( ते काहीतरी खास तापदायक कल्पना सुचवतात आणि गायब होतात. ती अमलात आणताना आपले हाल होतात, पण कल्पना इतकी चांगली असते की सोडवतही नाही!) पूर्ण काळेपांढरे पुस्तक करणे, ही वेगळी गंमत होती. त्याच्या शीर्षकाचे सुलेखन मी कोळशाने ( चारकोल) केले आहे.
कविता महाजन
कविता महाजन · Wed, 8 Dec 2010 - 04:45
कॉनरॉड रिक्टरची जी.एं.नी अनुवादित केलेली पुस्तके बरीच वर्षे बाजारात उपलब्ध नव्हती. ती आता परचुरे प्रकाशनाने पुन्हा छापली आहेत. ज्यांनी वाचली नसतील, त्यांनी जरूर वाचावीत. वाचली असतील त्यांनी संग्रही ठेवण्यासाठी (विकत) घ्यावीत! मी काही महिन्यांपूर्वीच ती विकत घेतली आहेत. ही पुस्तकं पहिल्यांदा वाचली होती तेव्हाही आवडली होती आणि इतक्या वर्षांनी पुन्हा वाचली तेव्हाही आवडली. नावे : रान, गाव, शिवार.
यशोधरा
यशोधरा · Wed, 8 Dec 2010 - 06:52 · उत्तर
आली का बाजारात? घ्यायलाच हवीत! :)
बातमीबद्दल धन्यवाद कविताताई.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 8 Dec 2010 - 08:12 · उत्तर
"....कॉनरॉड रिक्टरची जी.एं.नी अनुवादित केलेली रान, गाव, शिवार,..."
~ कविताताई, ही तिन्ही पुस्तके माझ्याकडे आहेत. जी.ए.कुलकर्णी या नावाचे मराठी साहित्यक्षेत्रात किती मोल आहे हे तुमच्यासारखे साहित्यिक तसेच आमच्यासारखे सर्वसामान्य वाचक याना नव्याने सांगण्याचे कारण नाही. अशी ही व्यक्ती जेव्हा कॉनरॉड रिक्टरच्या कादंबर्या अनुवादासाठी हातात घेते त्यावेळीच त्या पुस्तकांचे महत्व अधोरेखित होते.
असे असले तरी जी.ए. फक्त 'रिक्टर' बद्दलच "मॅड" होते असा अर्थ निघत नाही. डोस्टोव्हस्की त्याना जीव की प्राण होता. आणि जे आवडले नाही तर ते पूर्णच आवडले नाही असा त्यांचा खाक्या होता. Lady Chatterley's Lover आवडली नाही म्हणजे बिलकुल आवडलीच नाही, उगाच एखादा भाग चांगला अशीही मलमपट्टी नाही; तर इंग्रजीचा प्राध्यापक असूनही 'मी अजून शेक्सपीअर पूर्ण वाचलेला नाही, आणि जितका वाचला तो सगळाच आवडला असेही नाही..." ही कबुली देणेदेखील धाडसाचेच, जे जी.ए.च करू जाणत.
अनुवादीतच काय पण स्वतःच्या लिखाणाच्या दर्जाविषयीदेखील ते फार जागरूक असत. एका पत्रात ते म्हणतात, "मी मोठ्या जिद्दीने एका सो-कॉल्ड कादंबरीची शंभर-दीडशे पाने खरडून ठेवली होती. पण रिक्टरची एक कादंबरी वाचली आणि तो सारा पसारा मी अक्षरशः चुलीत कोंबला. त्यातील वेदनेला अर्थ नव्हता; भावनांना दिशा नाही; पाण्यातील भोवर्याला एक उत्कट जीवघेणा मध्यबिंदू असतो, तसले व्याकूळ आवर्त नाही. केवळ शब्दांचे बुजबुजले वारूळ होते. ती पाने जाळायला थोडे मन घट्ट करावे लागले. कारण त्याच वेळी एखादे पुस्तक, कादंबरी प्रसिद्ध करण्याची इच्छा सांगणारे 'साधना' चे पत्र आले होते. आणखी पन्नास पाने लिहून कादंबरी खपवता आली असती. म्हटले, आपले इतर लेखन तरी असे काय डोस्टोव्हस्की लागून गेलेय? पण इतर लेखन फडतूस वाटले, ते प्रसिद्ध झाल्यानंतर, पाठवताना बरे वाटल्याखेरीज मी एक ओळ छापली नाही. एकच आनंदाची गोष्ट म्हणजे मी कुठे उभा आहे याची मला खरी कल्पना आहे. विनयाची फाजील भावना माझ्याजवळ नाहे, पण निव्वळ दोन-चार दिवाळी अंकात कथा प्रसिद्ध होऊ शकतात, म्हणून टिर्या बडवणेही जमणार नाही."
ग्रेट मॅन रीअली ! अशा लेखकाविषयी 'त्या' खरेदीनिमित्य तुम्ही लिहिलेले पाहून तुमच्याविषयी वाटणारा आदर द्विगुणीत झाला. थॅन्क्स !
इन्द्रा