एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग - ३

सागर

मजकूर

भाग - २ सुद्धा दुसर्‍या पानावर गेला म्हणून तिसरा भाग सुरु करत आहे.
-----------------------------------------------------

मी अलिकडे घेतलेली पुस्तके
मराठी:
- श्रीगाडगेमहाराज - गो.नी.दांडेकर ( शेवटी एकदाचे मिळाले :) बुकगंगा.कॉम वर मिळाले )
- बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
- रथचक्र - श्री. ना. पेंडसे (साहित्य अकादमी पारितोषिक विजेती कादंबरी)
- रणांगण - विश्राम बेडेकर

इंग्रजी:
- अ बेन्ड इन द गँजेस - मनोहर माळगांवकर (मी 'गंगेज्' असा उच्चार करतो ;) )
- रावण अ‍ॅन्ड एडी - किरण नगरकर

अभिप्राय

ऋषिकेश

ऋषिकेश · Wed, 8 Dec 2010 - 15:48 · उत्तर

रिक्टर यांची मुळ (अप्रतिम) पुस्तके इंग्रजीतून वाचली आहेत. आता भाषांतर वाचायला हवे

अभिजितमोहोळकर

अभिजितमोहोळकर · Wed, 8 Dec 2010 - 13:32

हा पुल्देस्पांडे ह्यांनी केलेला अनुवाद घेतला..मला खूप आवडत हे पुस्तक. नवीन म्हंजे किमयागार, अर्थात ही दोन घेतली.

अभिजितमोहोळकर

अभिजितमोहोळकर · गुरुवार, 9 Dec 2010 - 07:52

सुंदर ती दुसरी दुनिया - अंबरिश मिश्र
आपल्या पुर्वजांचे विज्ञान - निरंजन घाटे
अनोळखी दिशा - तीनही भाग - नारायण धारप

अभिजितमोहोळकर

अभिजितमोहोळकर · गुरुवार, 9 Dec 2010 - 07:59

एकेकाच्या वाचनाचा आवाका बघून छाती दडपून गेली आहे....आमच वाचन म्हणजेच भलतच टाईमपास आहे.

असो...
आत्ताच आठवल, रंगमुद्रा हे पुस्तक सुधा घेतले. छान आहे.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · गुरुवार, 9 Dec 2010 - 09:36 · उत्तर

पुस्तकविश्वच्या अंगणात श्री.अभिजित मोहोळकर यांचे मनःपूर्वक स्वागत.

वाचनाच्या आवाक्याने छाती दडपून जाण्यासारखे काही मानू नका, मोहोळकर....अन्यथा तुम्ही येथील चर्चेत भाग घेत असताना साशंक व्हाल, अशासाठी की, इतके वाचलेल्या लोकांसमोर आपण आपली मते मांडावीत की नको असे काहीसे तुमच्या मनी येत राहिल. तर असे काही नसते. तुम्ही नि:संकोचपणे विविध धाग्यात भाग घेऊन तुमच्या वाचनज्ञानाचाही इथे आम्हाला लाभ देवू शकता. 'व्यासपर्व' चा तुम्ही तिथे आदराने उल्लेख केला आहे, याचाच अर्थ तुमचीही वाचनाविषयीची समज गाढच आहे.

असो. नारायण धारपांचे नाव वर वाचले...आनंद झाला. त्यांचे "ऐसी रत्ने मेळवीन..." वाचले नसल्यास जरूर विकत घ्या. जवळपास ४० वर्षापूर्वीचे पुस्तक पण अगदी स्टीव्हन स्पिएलबर्गने त्यावर त्याच्या धाटणीतील चित्रपट काढावा अशा ताकदीचे आहे.

इन्द्रा

(थोडेसे अवांतर : 'गीतयात्री' चे लेखक श्री.माधव मोहोळकर यांच्याशी आपले काही नाते?)

अभिजितमोहोळकर

अभिजितमोहोळकर · गुरुवार, 9 Dec 2010 - 10:45 · उत्तर

तुमच्या आपुलकीबद्दल आभार.

श्री. माधव मोहोळकर आणि मी ह्यांचे केवळ आडनाव सारखे आहे.

यशोधरा

यशोधरा · गुरुवार, 9 Dec 2010 - 09:36 · उत्तर

कोणाचे आहे रंगमुद्रा? लेखक/ लेखिकाही लिहाल का?

अभिजितमोहोळकर

अभिजितमोहोळकर · गुरुवार, 9 Dec 2010 - 10:51 · उत्तर

मला वाटते, हे पुस्तक, माधव वझे ह्यांचे आहे. ह्यात नाट्यसृष्टीवर आपला ठसा उमटवणार्या काही व्यक्तींच्या मुलाखती आहेत. नाव आहेत, विजयाबाई, लागूसाहेब, नसीरुद्दीन शहा, गिरिश कार्नाड, रतन थिय्यम इ.इ. जरूर वाचाव अस हे पुस्तक आहे.

चर्चा प्रकार