- Log in to post comments
हुश्श... धावती भेट आटोपली पुण्याची, आता येथे आलो तेव्हा दिसले की भाग - ३ देखील दुसर्या पानावर गेला आहे तेव्हा भाग -४ सुरु करतो आहे.
धावत्या भेटीतही मला पुण्याच्या अक्षरधारा प्रदर्शनास भेट देता आली व काही पुस्तके घेऊ शकलो.
वेळेअभावी पुविच्या एक अपवाद वगळता कोणत्याच मित्र मैत्रीणींना भेटणे शक्य झाले नाही याबद्दल क्षमस्व.
अर्थात वेळेअभावी मनासारखी सगळी खरेदी नाही करता आली. पण काहीच न मिळण्यापेक्षा काहीतरी खरेदी झाली हे महत्त्वाचे. कविताजींबरोबर फेसबुकावर एका चर्चेमुळे 'पाडस'ला उजाळा मिळाला होता आणि हे सुंदर पुस्तक संग्रहात ठेवायचे राहिले होते. हे पुस्तक अक्षरधाराच्या प्रदर्शनात पाय ठेवल्याबरोबर गटवले :)
माझी खरेदी :
पाडस - मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांच्या 'द इयरलिंग' चा अनुवाद - अनु: राम पटवर्धन
अकरा कोटी गॅलन पाणी / स्टडफार्म - अनिल बर्वे
डोंगर म्हातारा झाला - अनिल बर्वे (अकरा कोटी गॅलन... बरोबर फुकट मिळाले)
असूरवेद - संजय सोनवणी (पेपरबॅक प्रत रु.९५ फक्त )
प्राक्तन - सुहास शिरवळकर (पेपरबॅक प्रत रु.६० फक्त )
नाईट - एली वायझल - अनु: आशा कर्दळे (पेपरबॅक प्रत रु.५० फक्त )
रसिक साहित्यमधून
सॉरी सर - सुहास शिरवळकर
मरणोत्तर - सुहास शिरवळकर
एम टी आयवा मारु - अनंत सामंत
बुकगंगा.कॉम वरुन
संधिकाल - फ्रिजॉफ काप्रा यांच्या द टर्निंग पॉईंट चा स्वैर अनुवाद - अनु: माधवराव घोरपडे
आणि अक्षरधारा प्रदर्शनात भेटलेल्या एका खास मैत्रिणीकडून भेटीदाखल मिळालेले
भोवरा - इरावती कर्वे
अभिप्राय
सागर
सागर · Tue, 4 Jan 2011 - 10:33 · उत्तर
ऋ
राजेश्री छत्रपति शिवाजी महाराजांवर आहे. मस्त आहे एकदम.
नक्की वाच.
मृत्युन्जय
मृत्युन्जय · Tue, 4 Jan 2011 - 16:48 · उत्तर
राजेश्री शिवाजी महाराजांच्या जीवनावर आहे. पण त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धावर. संभाजी महाराज मोठे झाल्यापासुनचा कालखंड किंवा रादर राज्याभिषेकानंतरचा.
आहे कॉर्पोरेट तरी संजय जोश्यांचे आत्मकथन आहे त्यांच्या कॉर्पोरेट जगतातील अन्जुभवांवर आणी वयाच्य ४३ व्या वर्षी भरगच्च पगाराची नौकरी सोडुन कला आणि साहित्याच्या क्षेत्रात योगदान देण्याच्या निर्णायावर. छानच आहे. त्या माणासाच्या धाडसाचे कौतुक वाटते
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 5 Jan 2011 - 05:31 · उत्तर
अरे वा! राजेश्री वाचायच्या यादीत अॅडवतो आहे. कॉर्पोरेटही लायब्ररीत मिळाले की वाचेनच
वेदश्री
वेदश्री · गुरुवार, 20 Jan 2011 - 10:21
भाचरांनी मला खास फोन करून चिंटूची ४ नविन रंगीत पुस्तके कित्ती छान दिसतायत इंटरनेटवर असे अगदी भरभरून सांगितले आहे. दोघा भाचरांना वाचनाची प्रचंड आवड असल्याने त्यांच्या अशा अबोल मागण्यांना मी नाही म्हणाले तरच नवल! बाकी अशा लाघवी मागण्या वगळता सद्ध्या एकूणातच पुस्तकांकडे (वाचन आणि खरेदी दोन्ही) लक्ष द्यायला वेळ मिळत नाहीय. :-(
यशोधरा
यशोधरा · Mon, 24 Jan 2011 - 07:34
प्रकाटाआ. ५ व्या भागामध्ये लिहिले आहे.