१. पुणे नगर वाचन मंदीर
दगडू शेठ हलवाई गणपती चौक (चौकाचे नाव आठवत नाहिये... बहुतेक समाधान चौक म्हणतात),
लक्ष्मी रस्ता,
नेमकी खूणः टोपीवाले (अरे देवा प्रसिद्ध टोपीवाल्यांचे नाव नेमके आठवत नाहिये) यांच्या दुकानासमोरच प्रवेशदरवाजा आहे
२. पुणे मराठी ग्रंथालय
पत्र्या मारूती जवळ
नारायण पेठ
पुणे : ४११ ०३०
पुणे मराठी ग्रंथालयाबद्दल माझा अनुभव खूप चांगला आहे, एकदा काही लिखाणासाठी मला तेथील काही पुस्तके पहायची होती. सभासदत्व नसतानाही लगेच पुस्तके पहायला मिळाली, तिथे हवं तित़का वेळ बसून टिपणे वगैरे काढायलाही मिळाले...
१. रसिक प्रकाशनाचेही स्वतःचे ग्रंथालय आहे व त्याची माहिती त्यांच्या पुण्यातील अप्पा बळवंत चौकामधल्या दुकानात मिळ्ते.
२. सकाळनगर, बाणेर येथे पूर्वी एक फिरते ग्रंथालय चालवले जात होते. नानासाहेब परुळेकरांच्या स्मृतीसंदर्भात, सकाळने ते चालवले होते हे आठवते, ग्रंथालयाचा प्रतिनिधी पुस्तके घेऊन वाचकांच्या घरी जात असे, व पुस्तके बदलून घेता येत असत. महिन्यासाठी २ पुस्तके ठेवता येत. योजना अजून सुरु आहे की नाही ठाऊक नाही.
रसिकच्या फिरत्या ग्रंथालयाची सध्या मी सभासद आहे. आत्ता पावती हातात नाही, संध्याकाळी फोन नंबर देते.
दीडशे रूपये महिना (वर्षाचे दीडहजार), एकावेळी पाच पुस्तकं आणि डिपॉझिट नाही. हे घरी/ऑफिसात महिन्यातून एकदा येतात. गाडीचा आकार, पुस्तकं ठेवण्याची पद्धत, आणि पुस्तकांचं कलेक्शन (आणि माझी आवड) पहाता मी फक्त सहा महिन्यांचंच सभासदत्त्व घेतलं याचा आनंद झाला. काही चांगली पुस्तकं आहेत याचा जरूर उल्लेख करेन.
इंग्लिश पुस्तकं कमी आहेत आणि बरीचशी अॅगाथा ख्रिस्ती किंवा जेफ्री आर्चर प्रकारातली आहेत/वाटतात.
यशोधरा, आता मी याच वाचनालयाबद्दल लिहायला आले होते :)
हो हे वाचनालय चालू आहे. मी त्याची सदस्य आहे. खुप छान पुस्तके आहेत. त्यांची तालिका थोडी वाईट आहे पण ओके. मुख्य म्हणजे सकालकडे आलेली सर्व नवी पुस्तके इथे असल्याने खुप नवी पुस्तके मिळून जातात. तसेच वैचारिक बरिच पुस्तके आहेत इथे. महिन्यातून ५ पुस्तके अशी स्कीम आहे.
अरे वा आरती, सह्हीच गं. मला पत्ता दे ना ह्या ग्रंथालयाचा. मला सदस्य व्हायचे आहे, पण पत्ता कुठे सापडेल असे वाटत होते. पुस्तक पुस्तक पे लिख्खा हय वाचनेवाले का नाम, हेच शेवटी खरं, बाकी मिथ्या! :)
यशोधरा,
परुळेकर ग्रंथालय, सकाळ नगर, औंध.
फोन : ९९२२४१९२०५, २५६६१६२३, ९९२२४१९२१८
आधी फोन कर. ते घरी येउन सर्व फॉरमॅलिटिज करतात.
ऋषिकेश, कोथरूड मध्ये विश्वास लायब्ररी छान आहे. फक्त त्यांची मेंबरशीप मे आणि मला वाटतं दिवाळीतच चालू असते.
पत्ता : विश्वास लायव्ररी, रामबाग कॉलनी पौड रोड . पौडरोडवर पालवी हॉटेल आहे, आनंदनगर समोर त्या हॉटेलच्या गल्लीत आत जा उजवी कडच्या कॉर्नरला आहे ही लायब्ररी .
बाय द वे तू फ्लिकरवर आहेस का ? अन तुझी कोट विकून पुस्तक आणायची फ्रेज आवडली बरं का :)
"...."चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"...!!
~~ पण या फ्रेजमध्ये 'ऋषिकेश' नावाची व्यक्ती जुनाट कोट 'विकून'च नवं पुस्तक घेणार आहे असे सूचीत होते? जुनाट कोट अन् नवं पुस्तक यांची सांगड घालायचीच झाल्यास (ऑनलूकरला...) इतपतच म्हणता येईल की, "व्वा, बघा यांचे पुस्तकप्रेम !!....कोट बदलण्यास ही व्यक्ती तयार नाही, पण पुस्तकासाठी पैसे खर्च करतोय. मानलं याला !"
शिवाय जुना कोट घालून डेक्कन वा लक्ष्मी रोडवर फिरणारा 'ऋषिकेश' हा पुस्तक खरेदीसाठीच फिरत असेल असेही नाही.
जी.एं. चा विदुषक सांगतो, "स्त्रीच्या कडेवरील बालक हे तिचेच असले पाहिजे असा काही नियम नसतो..." त्याच चालीवर सुट्टीच्या दिवशी अंगावर दिसणारा ऋषिकेशचा जुनाट कोट हे पुस्तक खरेदीचेच चिन्ह आहे असाही नियम होत नाही.
आज मी एका ग्रंथालयात गेले होते.
नाव - "अक्षरस्पर्श"
पत्ता - ४०/१/ब, भोंडे कॉलनी,
अलूरकर म्यूझिक हाऊस समोरची गल्ली,
कर्वे रोड, पुणे - ४११ ००४
फोन - २५४२ ४९१५
वेळा -
(सोमवार ते शनिवार)
सकाळी ९.३० ते दुपारी १.००, संध्याकाळी ४ ते ७.३०
रविवारी सकाळी ९.३० ते दुपारी १.००
पुस्तके - मराठी व इंग्रजी.
वर्गणी - रु. १०० महिना.
मला छान वाटली लायब्ररी. इंग्रजी पुस्तके सुद्दा आहेत. ती ठीक आहेत.
इथे स्त्री साहित्य विभाग जास्त चांगला आहे असे त्यांचे म्हणणे आहे. तिथेच "मिळुनी सार्याजणी" या मासिकाचे ऑफिसही आहे.
> "स्त्री साहित्य" म्हणजे स्त्री लेखिकांचे साहित्य? की स्त्रीयांवरचे साहित्य? की स्त्रीयांसाठीचे साहित्य? का तिन्ही?
अक्षरस्पर्श हे 'मिळून सार्याजणी' या मासिकाच्याच कार्यालयात त्याच संस्थेतर्फे चालवलं जाणारं ग्रंथालय आहे. इथे पाहा. त्यामुळे इथे स्त्रीवादी साहित्य किंवा लिंगसमतावादी साहित्य असं अभिप्रेत असावं.
ऋषिकेश, हो चिंतातुर जंतू यांनी लिहील्या प्रमाणे "स्त्रीवादी साहित्य". इथे एक नमुद करावेसे वाटते की या सहित्याचा फक्त एक विभाग आहे जो चांगल्या प्रकारे भर घालुन मेंटेन केला आहे. बाकी आपण नेहमीचे विभाग आहेतच.
औ'बादेतील खडकेश्वर मंदिराशेजारच्या मनपा वाचनालयात पुस्तकसंग्रह अगदी उत्तम म्हणण्यासारखा किमान मलातरी वाटायचा साधारण १० वर्षांपुर्वी जेव्हा मी तिथे नियमित सदस्या होते तेव्हा. संग्रह उत्तम असलातरी पुस्तकांची निगा, देखरेख आणि मुख्य म्हणजे पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारी तळमळ आणि उत्साह या गोष्टींचा अभाव प्रकर्षाने जाणवायचा. सध्ध्याची स्थिती काय आणि कशी आहे कल्पना नाही.
औ'बादेतील दुसरे एक सुंदर वाचनालय म्हणजे औरंगपुरा चौकातले शिशुविहार शाळेसमोरील बलवंत वाचनालय. घरापासून दूर असल्याने इथे नियमित सदस्यत्व घेता आले नाही पण शाळेतून परत जाताना अध्येमध्ये चक्कर मारायचे मी तिथे. सदस्यत्व नसूनदेखील एकंदर जी वागणूक मिळायची तिथे त्याने मन पुरते आनंदून जायचे माझे. सदस्यत्व नसूनही मला तिथे बसून पुस्तक वाचायला खुली परवानगी असायची. आजही प्रदर्शनांच्या निमित्ताने तिथे जाते तर तिथल्या कर्मचार्यांची ख्यालीखुशाली विचारणे आपोआप येते मनातून.. आणि त्यांच्या अकृत्रिम आपुलकीच्या शब्दांमुळे जाईन तेव्हा तिथे एक चक्कर ठरलेलीच असे झाल्यास नवल नाहीच!
आजवर नोकरीनिमित्ताने इतके फिरलेय पण तरीही ग्रंथालय/वाचनालय म्हटले की हीच दोन्ही येतात नजरेसमोर.
१०० रुपये डिपॉझिट, १५रु. प्रती महीना फी.
हे वाचनालय चिंतामणी मंदीर ट्र्स्ट तर्फे चालवले जाते. तुम्ही सभासद नसला, तरी तिथे बसून वाचन करता येते.
एका वेळी एक पुस्तक आणि एक मासिक घरी नेता येते. काही मोठी / किंमती पुस्तकं घरी नेताना ( उदा. मृत्युंजय, युगंधर वगैरे ) ५०० रुपये अनामत रक्कम जमा करावी लागते. पुस्तक परत केल्यावर ५०० रुपये परत मिळतात.
इथे बरीच पुस्तके ही अनेक वाचकांनी वाचनालयाला भेट म्हणून दिलेली आढळतात. काही जुनी एन्ग्लिश पुस्तके देखील आहेत.
अभिप्राय
सागर
सागर · Fri, 24 Sep 2010 - 15:20
१. पुणे नगर वाचन मंदीर
दगडू शेठ हलवाई गणपती चौक (चौकाचे नाव आठवत नाहिये... बहुतेक समाधान चौक म्हणतात),
लक्ष्मी रस्ता,
नेमकी खूणः टोपीवाले (अरे देवा प्रसिद्ध टोपीवाल्यांचे नाव नेमके आठवत नाहिये) यांच्या दुकानासमोरच प्रवेशदरवाजा आहे
२. पुणे मराठी ग्रंथालय
पत्र्या मारूती जवळ
नारायण पेठ
पुणे : ४११ ०३०
यशोधरा
यशोधरा · Tue, 28 Sep 2010 - 08:20 · उत्तर
पुणे मराठी ग्रंथालयाबद्दल माझा अनुभव खूप चांगला आहे, एकदा काही लिखाणासाठी मला तेथील काही पुस्तके पहायची होती. सभासदत्व नसतानाही लगेच पुस्तके पहायला मिळाली, तिथे हवं तित़का वेळ बसून टिपणे वगैरे काढायलाही मिळाले...
यशोधरा
यशोधरा · Wed, 29 Sep 2010 - 10:41
१. रसिक प्रकाशनाचेही स्वतःचे ग्रंथालय आहे व त्याची माहिती त्यांच्या पुण्यातील अप्पा बळवंत चौकामधल्या दुकानात मिळ्ते.
२. सकाळनगर, बाणेर येथे पूर्वी एक फिरते ग्रंथालय चालवले जात होते. नानासाहेब परुळेकरांच्या स्मृतीसंदर्भात, सकाळने ते चालवले होते हे आठवते, ग्रंथालयाचा प्रतिनिधी पुस्तके घेऊन वाचकांच्या घरी जात असे, व पुस्तके बदलून घेता येत असत. महिन्यासाठी २ पुस्तके ठेवता येत. योजना अजून सुरु आहे की नाही ठाऊक नाही.
३_१४ अदिती
३_१४ अदिती · Wed, 6 Oct 2010 - 09:26 · उत्तर
रसिकच्या फिरत्या ग्रंथालयाची सध्या मी सभासद आहे. आत्ता पावती हातात नाही, संध्याकाळी फोन नंबर देते.
दीडशे रूपये महिना (वर्षाचे दीडहजार), एकावेळी पाच पुस्तकं आणि डिपॉझिट नाही. हे घरी/ऑफिसात महिन्यातून एकदा येतात. गाडीचा आकार, पुस्तकं ठेवण्याची पद्धत, आणि पुस्तकांचं कलेक्शन (आणि माझी आवड) पहाता मी फक्त सहा महिन्यांचंच सभासदत्त्व घेतलं याचा आनंद झाला. काही चांगली पुस्तकं आहेत याचा जरूर उल्लेख करेन.
इंग्लिश पुस्तकं कमी आहेत आणि बरीचशी अॅगाथा ख्रिस्ती किंवा जेफ्री आर्चर प्रकारातली आहेत/वाटतात.
आरती
आरती · Wed, 29 Sep 2010 - 15:21
यशोधरा, आता मी याच वाचनालयाबद्दल लिहायला आले होते :)
हो हे वाचनालय चालू आहे. मी त्याची सदस्य आहे. खुप छान पुस्तके आहेत. त्यांची तालिका थोडी वाईट आहे पण ओके. मुख्य म्हणजे सकालकडे आलेली सर्व नवी पुस्तके इथे असल्याने खुप नवी पुस्तके मिळून जातात. तसेच वैचारिक बरिच पुस्तके आहेत इथे. महिन्यातून ५ पुस्तके अशी स्कीम आहे.
यशोधरा
यशोधरा · Wed, 29 Sep 2010 - 15:27 · उत्तर
अरे वा आरती, सह्हीच गं. मला पत्ता दे ना ह्या ग्रंथालयाचा. मला सदस्य व्हायचे आहे, पण पत्ता कुठे सापडेल असे वाटत होते. पुस्तक पुस्तक पे लिख्खा हय वाचनेवाले का नाम, हेच शेवटी खरं, बाकी मिथ्या! :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 29 Sep 2010 - 19:46
कोथरूडच्या जवळ कोणते चांगले (मराठी + इंग्रजी) ग्रंथालय आहे का? असल्यास कुठे?
सागर
सागर · गुरुवार, 30 Sep 2010 - 14:38 · उत्तर
मलाही नक्की नाही माहिती रे ऋषि पण दशभुजा गणपती जवळच आहे. चांगले ग्रंथालय आहे ते असे ऐकून आहे.
डहाणूकर कॉलनीतही एक छान ग्रंथालय आहे.
आरती
आरती · गुरुवार, 30 Sep 2010 - 20:31
यशोधरा,
परुळेकर ग्रंथालय, सकाळ नगर, औंध.
फोन : ९९२२४१९२०५, २५६६१६२३, ९९२२४१९२१८
आधी फोन कर. ते घरी येउन सर्व फॉरमॅलिटिज करतात.
ऋषिकेश, कोथरूड मध्ये विश्वास लायब्ररी छान आहे. फक्त त्यांची मेंबरशीप मे आणि मला वाटतं दिवाळीतच चालू असते.
पत्ता : विश्वास लायव्ररी, रामबाग कॉलनी पौड रोड . पौडरोडवर पालवी हॉटेल आहे, आनंदनगर समोर त्या हॉटेलच्या गल्लीत आत जा उजवी कडच्या कॉर्नरला आहे ही लायब्ररी .
बाय द वे तू फ्लिकरवर आहेस का ? अन तुझी कोट विकून पुस्तक आणायची फ्रेज आवडली बरं का :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 1 Oct 2010 - 06:36 · उत्तर
मस्तच! अनेक आभार... पत्त्याबद्दल आणि फ्रेज आवडल्याचं कळवल्याबद्दल :)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 13 Oct 2010 - 11:09 · उत्तर
"...."चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"...!!
~~ पण या फ्रेजमध्ये 'ऋषिकेश' नावाची व्यक्ती जुनाट कोट 'विकून'च नवं पुस्तक घेणार आहे असे सूचीत होते? जुनाट कोट अन् नवं पुस्तक यांची सांगड घालायचीच झाल्यास (ऑनलूकरला...) इतपतच म्हणता येईल की, "व्वा, बघा यांचे पुस्तकप्रेम !!....कोट बदलण्यास ही व्यक्ती तयार नाही, पण पुस्तकासाठी पैसे खर्च करतोय. मानलं याला !"
शिवाय जुना कोट घालून डेक्कन वा लक्ष्मी रोडवर फिरणारा 'ऋषिकेश' हा पुस्तक खरेदीसाठीच फिरत असेल असेही नाही.
जी.एं. चा विदुषक सांगतो, "स्त्रीच्या कडेवरील बालक हे तिचेच असले पाहिजे असा काही नियम नसतो..." त्याच चालीवर सुट्टीच्या दिवशी अंगावर दिसणारा ऋषिकेशचा जुनाट कोट हे पुस्तक खरेदीचेच चिन्ह आहे असाही नियम होत नाही.
इन्द्रा
यशोधरा
यशोधरा · Fri, 1 Oct 2010 - 07:50 · उत्तर
धन्यवाद आरती.
स्वाती
स्वाती · Fri, 1 Oct 2010 - 15:38
आज मी एका ग्रंथालयात गेले होते.
नाव - "अक्षरस्पर्श"
पत्ता - ४०/१/ब, भोंडे कॉलनी,
अलूरकर म्यूझिक हाऊस समोरची गल्ली,
कर्वे रोड, पुणे - ४११ ००४
फोन - २५४२ ४९१५
वेळा -
(सोमवार ते शनिवार)
सकाळी ९.३० ते दुपारी १.००, संध्याकाळी ४ ते ७.३०
रविवारी सकाळी ९.३० ते दुपारी १.००
पुस्तके - मराठी व इंग्रजी.
वर्गणी - रु. १०० महिना.
मला छान वाटली लायब्ररी. इंग्रजी पुस्तके सुद्दा आहेत. ती ठीक आहेत.
इथे स्त्री साहित्य विभाग जास्त चांगला आहे असे त्यांचे म्हणणे आहे. तिथेच "मिळुनी सार्याजणी" या मासिकाचे ऑफिसही आहे.
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 4 Oct 2010 - 07:50 · उत्तर
"स्त्री साहित्य" म्हणजे स्त्री लेखिकांचे साहित्य? की स्त्रीयांवरचे साहित्य? की स्त्रीयांसाठीचे साहित्य? का तिन्ही?
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Mon, 4 Oct 2010 - 14:40 · उत्तर
अक्षरस्पर्श हे 'मिळून सार्याजणी' या मासिकाच्याच कार्यालयात त्याच संस्थेतर्फे चालवलं जाणारं ग्रंथालय आहे. इथे पाहा. त्यामुळे इथे स्त्रीवादी साहित्य किंवा लिंगसमतावादी साहित्य असं अभिप्रेत असावं.
स्वाती
स्वाती · Tue, 5 Oct 2010 - 07:50
ऋषिकेश, हो चिंतातुर जंतू यांनी लिहील्या प्रमाणे "स्त्रीवादी साहित्य". इथे एक नमुद करावेसे वाटते की या सहित्याचा फक्त एक विभाग आहे जो चांगल्या प्रकारे भर घालुन मेंटेन केला आहे. बाकी आपण नेहमीचे विभाग आहेतच.
वेदश्री
वेदश्री · Wed, 13 Oct 2010 - 07:29
औ'बादेतील खडकेश्वर मंदिराशेजारच्या मनपा वाचनालयात पुस्तकसंग्रह अगदी उत्तम म्हणण्यासारखा किमान मलातरी वाटायचा साधारण १० वर्षांपुर्वी जेव्हा मी तिथे नियमित सदस्या होते तेव्हा. संग्रह उत्तम असलातरी पुस्तकांची निगा, देखरेख आणि मुख्य म्हणजे पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारी तळमळ आणि उत्साह या गोष्टींचा अभाव प्रकर्षाने जाणवायचा. सध्ध्याची स्थिती काय आणि कशी आहे कल्पना नाही.
औ'बादेतील दुसरे एक सुंदर वाचनालय म्हणजे औरंगपुरा चौकातले शिशुविहार शाळेसमोरील बलवंत वाचनालय. घरापासून दूर असल्याने इथे नियमित सदस्यत्व घेता आले नाही पण शाळेतून परत जाताना अध्येमध्ये चक्कर मारायचे मी तिथे. सदस्यत्व नसूनदेखील एकंदर जी वागणूक मिळायची तिथे त्याने मन पुरते आनंदून जायचे माझे. सदस्यत्व नसूनही मला तिथे बसून पुस्तक वाचायला खुली परवानगी असायची. आजही प्रदर्शनांच्या निमित्ताने तिथे जाते तर तिथल्या कर्मचार्यांची ख्यालीखुशाली विचारणे आपोआप येते मनातून.. आणि त्यांच्या अकृत्रिम आपुलकीच्या शब्दांमुळे जाईन तेव्हा तिथे एक चक्कर ठरलेलीच असे झाल्यास नवल नाहीच!
आजवर नोकरीनिमित्ताने इतके फिरलेय पण तरीही ग्रंथालय/वाचनालय म्हटले की हीच दोन्ही येतात नजरेसमोर.
शमिश
शमिश · Mon, 29 Nov 2010 - 07:55
निगडी मध्ये, प्राधिकरण भागातः
चिंतामणी वाचनालय.
चितामणी मंदीर, सेक्टर नंबर २४,
प्राधिकरण, निगडी.
१०० रुपये डिपॉझिट, १५रु. प्रती महीना फी.
हे वाचनालय चिंतामणी मंदीर ट्र्स्ट तर्फे चालवले जाते. तुम्ही सभासद नसला, तरी तिथे बसून वाचन करता येते.
एका वेळी एक पुस्तक आणि एक मासिक घरी नेता येते. काही मोठी / किंमती पुस्तकं घरी नेताना ( उदा. मृत्युंजय, युगंधर वगैरे ) ५०० रुपये अनामत रक्कम जमा करावी लागते. पुस्तक परत केल्यावर ५०० रुपये परत मिळतात.
इथे बरीच पुस्तके ही अनेक वाचकांनी वाचनालयाला भेट म्हणून दिलेली आढळतात. काही जुनी एन्ग्लिश पुस्तके देखील आहेत.
अभिजितमोहोळकर
अभिजितमोहोळकर · गुरुवार, 9 Dec 2010 - 08:38
तपशील मिळाला तर छान होईल.
स्वाती
स्वाती · गुरुवार, 9 Dec 2010 - 10:53
मला पण कृपया सिंहगड रोड वरील चांगले वाचनालय कोणी सुचवेल का?