मित्रांनो,
सु.शी.चे पुस्तक!
चन्द्रा!
एक मोटेल!
सुत्रबद्ध खून!
हीरे कारखानदार्,तीन बन्धु!
एक बन्धु,झोपेत चालणारा!
खून बघणारा एक वार्तहर!
आर्की टायट्स!
सर्व खून blackmail मुळॅ!
नाव व प्रकाशक समजतील का,प्लीज?
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.
आपला प्रिय मित्र कट्टर सुशिप्रेमी सागर सध्या आंतरजालापासून दुर असून सुट्टीचा आनंद घेत आहे. तेव्हा तो इथे परत आल्यानंतरच तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल असे वाटते.
व्वा ....धमाल , सर्व प्रतिक्रिया वाचुन शाळा क्वालेज जमान्यातिल आभ्यासाच्या पुस्तकात सुशि टाकुन सम्पवला याची आठ्वण झाली.
मित्रा सागर रोज रात्रि १ सुशि वाचल्याशिवाय झोप नाहि लागायची.
असे त्या कादंबरीचे नाव,
ह्यातली नावेही सु शि परंपरेला जागून वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
आर्की टायटन, अपूर्व बुद्धीवंत, गर्जन सबलोक, हंड्या हवालदार, उत्तम दानवे, चंद्रसेना आणि संज्योत, जयराज, यशराज, पृथ्वीराज हे तीन भाउ :)
सुशिंचा डाय हार्ड पंखा खरेच होतो एके काळी आणि आजही आहे
कॉलेजच्या जीवनात जेवढे सुशि वाचले तेवढे आता होत नाही. पण सुशिंची कित्येक पुस्तके वाचूनही वाचायची राहिली आहेत अशी पण काही आहेत :(
हळूहळू गोळा करतो आहेच. सध्या तरी माझ्याकडे सुशिंची ३२ पुस्तके आहेत. :)
मी पण शाळा, कालेजात असताना सुशिंची जवळ जवळ सर्वच पुस्तके वाचलेली आहेत. जवळपास २०० रहस्यकथा, ५० एक सामाजिक कथा अगदी सर्वांची पारायणेही झाली आहेत. अर्थात लायब्रीतून आणूनच. लायब्रीत तर सुशिंशाठी २/३ मोठे कप्पे केलेले होते. जवळपास प्रत्येक लायब्रीतून तर आजही असतील. अर्थात विकत मात्र आतापर्यंत दोनच पुस्तके घेतली आहेत (दुनियादारी आणि सुत्रबद्ध). कदाचित पानांच्या संख्येच्या आणि आकाराच्या मानाने जास्त किंमत हेही कारण असावे. .
तेव्हा सागरचे कलेक्शन बघून हेवा वाटतोच.
सुशिंची मी पण खूप पुस्तके वाचली आहेत. माझ्या संग्रहात जास्त असली तरी सुशिंचे वाचन तुझे कदाचित माझ्याप्क्षा जास्तच असावे. मी पण त्यावेळी पुण्याच्या नगर वाचन मंदीरात रोज हजेरी लावायचो. दिवसाला १ पुस्तक म्हणजे प्रचंडच वेग होता माझा त्यावेळी :)
सुशिंचे मी न वाचलेले पुस्तक त्या ग्रंथालयाच्या मॅडम माझ्यासाठी आवर्जून काढून ठेवायच्या.
पण वो तो गया गुजरा जमाना. आता कधीतरी वाचन होते.
मी सुशि तुझ्यापेक्षाही कदाचित जास्त वाचलेलेही असतील पण ते पुर्विच्या काळी. आता मात्र सुशि साहित्याच्या बाबतीत स्मृती/विस्मृतींच्या हिंदोळ्यांवर झुलतो आहे. पण तू मात्र अजूनही सुशिंच्या साहित्यामध्ये डुंबतो आहेस.
एकतर सुशिंचे साहित्य इतके विपुल आहे की ते सर्वच विकत घेणे शक्यच नाही. शिवाय लायब्ररी पण आता बंद केल्यामुळे (पुस्तके विकत घेत असल्यामुळे) सुशि वाचणे माझ्यासाठी तरी दुरापास्तच होत चाललेय.
तेव्हा ख्रा भाग्यवान तुच. :)
वल्ली / सागर,
मी सुशिंचे एकही पुस्तक वाचलेले नाही. वाचावे असे कधी मनातही आले नाही. आमच्या वाचक-ग्रुपमधेदेखील कधीच कोणी त्यांच्याविषयी बोललेले नाही. त्यामुळे इथे तुमच्यासारखे 'डाय हार्ड पंखे' बघून वाटते की `सुशि' वाचनाचा एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?
माझ्यासारख्या `सुशिं'शी तोंडओळखदेखील नसलेल्या वाचकाला त्यांचे एखादे पुस्तक सुचवाल का?
विनोदी कथा:
जाता येता, बरसात चांदण्यांची, निमित्तमात्र, लटकंती
विस्मयकथा :
गुणगुण, अनुभव, वेशीपलिकडे, अंतिम,
भयकथा:
प्राक्तन, समथिंग, माध्यम, जाणीव, सनसनाटी
इतरः
- दुनियादारी (ही कॉलेज जीवनावर आहे. तरी आजही मला खूप आवडते)
- असीम
- हमखास ( अगदी छोटीशीच पण चिंतन करायला भाग पाडते ही कथा)
- मुक्ती
- सॉरी सर
शोकांतिका:
- कोसळ
- कोवळीक
- जाई ( गंध चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमृता सुभाष बसमध्ये का कोठे वाचत असते ते हेच पुस्तक :) )
- दास्तान
- प्रतिकार (पुण्यात एका प्रतिथयश कॉलेजच्या तरुणीवर एक रिक्षाचालक, कॉलेजचे विद्यार्थी यांनी बलात्कार केला होता. ती केस खूप गाजली होती. अशी दुष्कर्मी माणसे समाजाच्या निष्क्रीयतेमुळे कशी हवे ते करायला धजावतात हे उत्तम दाखवले आहे. खरे तर लोकांना जागे करण्यासाठीच सुशिंनी ही कादंबरी लिहिलेली होती.)
ही यादी तर अगदीच लहान आहे चित्रा. सुशिंनी सर्व प्रकारच्या साहित्यात इतके विपुल लिहून ठेवले आहे ना की यादी करायली घेतली तर मारूतीच्या शेपटासारखी वाढतच जाईल.
मित्रानो,
यवतमाळ सारख्या शहरात देखिल भरपुर सु.शि.पंखे आहेत.
काही तर ए.सी.म्हणावे असे!
पामर पण असाच!
सु.शिं.ना म्हणावी तितकी मान्यता मिळाली नाही,ही एक आयुश्यभराची खन्त!
असो.मला मात्र आयुश्याच्या प्रत्येक पावलावर सु.शिं ची मदतच झाली आहे.
आपल्या सारखे लोक भेटले व आनन्द झाला.
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.
अभिप्राय
वल्ली
वल्ली · गुरुवार, 3 Mar 2011 - 17:34
आपला प्रिय मित्र कट्टर सुशिप्रेमी सागर सध्या आंतरजालापासून दुर असून सुट्टीचा आनंद घेत आहे. तेव्हा तो इथे परत आल्यानंतरच तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल असे वाटते.
DILIP MADHUKAR NIKAM
DILIP MADHUKAR NIKAM · Tue, 15 Mar 2011 - 17:44 · उत्तर
व्वा ....धमाल , सर्व प्रतिक्रिया वाचुन शाळा क्वालेज जमान्यातिल आभ्यासाच्या पुस्तकात सुशि टाकुन सम्पवला याची आठ्वण झाली.
मित्रा सागर रोज रात्रि १ सुशि वाचल्याशिवाय झोप नाहि लागायची.
सागर
सागर · Tue, 15 Mar 2011 - 17:55 · उत्तर
दिलिप मित्रा,
अगदी असेच होते माझेही. रोज सुशिंचे १ पुस्तक लागायचेच
तो काळ काही औरच होता :)
आतादेखील वाचतो पण त्या सोनेरी काळाच्या आता फक्त आठवणीच हृदयांत आहेत
सागर
सागर · गुरुवार, 10 Mar 2011 - 20:34
हे पुस्तक वाचले नक्की आहे. आणि संग्रहातही आहे.
ऑफिसात काही पुस्तके आहेत. उद्या त्यात बघून सांगतो
भयकथा असेन तर सांगता येईल लगेच. बहुतेक मरणोत्तर असू शकेन. पण आधी खात्री करुन घेतो
ऑफिसात नसेन तर मग ते पुस्तक पुण्याच्या घरी असण्याची शक्यता आहे.
बघू उद्याच सांगतो
वाचक
वाचक · गुरुवार, 10 Mar 2011 - 21:52
असे त्या कादंबरीचे नाव,
ह्यातली नावेही सु शि परंपरेला जागून वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
आर्की टायटन, अपूर्व बुद्धीवंत, गर्जन सबलोक, हंड्या हवालदार, उत्तम दानवे, चंद्रसेना आणि संज्योत, जयराज, यशराज, पृथ्वीराज हे तीन भाउ :)
सागर
सागर · Fri, 11 Mar 2011 - 04:32 · उत्तर
आत्तच ते पुस्तक सापडले
वाचक भाऊ तुम्ही पण सुशि फॅन दिसताय :)
वाचक
वाचक · Fri, 11 Mar 2011 - 22:21 · उत्तर
लहानपणापासूनच.
सागर
सागर · Sat, 12 Mar 2011 - 06:22 · उत्तर
मी पण अगदी असेच लहानपणापासून सुशि वाचतोय :)
वाचकभाऊ तुम्ही, मी आणि वल्ली इथे पुवि वर माहिती असलेले सुशि पंखे आहोत. :)
वल्ली
वल्ली · Sat, 12 Mar 2011 - 06:41 · उत्तर
पण अगदी डाय हार्ड पंखा म्हणजे सागरच. :)
सागर
सागर · Sat, 12 Mar 2011 - 07:53 · उत्तर
सुशिंचा डाय हार्ड पंखा खरेच होतो एके काळी आणि आजही आहे
कॉलेजच्या जीवनात जेवढे सुशि वाचले तेवढे आता होत नाही. पण सुशिंची कित्येक पुस्तके वाचूनही वाचायची राहिली आहेत अशी पण काही आहेत :(
हळूहळू गोळा करतो आहेच. सध्या तरी माझ्याकडे सुशिंची ३२ पुस्तके आहेत. :)
वल्ली
वल्ली · Sat, 12 Mar 2011 - 08:07 · उत्तर
मी पण शाळा, कालेजात असताना सुशिंची जवळ जवळ सर्वच पुस्तके वाचलेली आहेत. जवळपास २०० रहस्यकथा, ५० एक सामाजिक कथा अगदी सर्वांची पारायणेही झाली आहेत. अर्थात लायब्रीतून आणूनच. लायब्रीत तर सुशिंशाठी २/३ मोठे कप्पे केलेले होते. जवळपास प्रत्येक लायब्रीतून तर आजही असतील. अर्थात विकत मात्र आतापर्यंत दोनच पुस्तके घेतली आहेत (दुनियादारी आणि सुत्रबद्ध). कदाचित पानांच्या संख्येच्या आणि आकाराच्या मानाने जास्त किंमत हेही कारण असावे. .
तेव्हा सागरचे कलेक्शन बघून हेवा वाटतोच.
सागर
सागर · Sat, 12 Mar 2011 - 09:24 · उत्तर
सुशिंची मी पण खूप पुस्तके वाचली आहेत. माझ्या संग्रहात जास्त असली तरी सुशिंचे वाचन तुझे कदाचित माझ्याप्क्षा जास्तच असावे. मी पण त्यावेळी पुण्याच्या नगर वाचन मंदीरात रोज हजेरी लावायचो. दिवसाला १ पुस्तक म्हणजे प्रचंडच वेग होता माझा त्यावेळी :)
सुशिंचे मी न वाचलेले पुस्तक त्या ग्रंथालयाच्या मॅडम माझ्यासाठी आवर्जून काढून ठेवायच्या.
पण वो तो गया गुजरा जमाना. आता कधीतरी वाचन होते.
वल्ली
वल्ली · Sun, 13 Mar 2011 - 00:51 · उत्तर
मी सुशि तुझ्यापेक्षाही कदाचित जास्त वाचलेलेही असतील पण ते पुर्विच्या काळी. आता मात्र सुशि साहित्याच्या बाबतीत स्मृती/विस्मृतींच्या हिंदोळ्यांवर झुलतो आहे. पण तू मात्र अजूनही सुशिंच्या साहित्यामध्ये डुंबतो आहेस.
एकतर सुशिंचे साहित्य इतके विपुल आहे की ते सर्वच विकत घेणे शक्यच नाही. शिवाय लायब्ररी पण आता बंद केल्यामुळे (पुस्तके विकत घेत असल्यामुळे) सुशि वाचणे माझ्यासाठी तरी दुरापास्तच होत चाललेय.
तेव्हा ख्रा भाग्यवान तुच. :)
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · Fri, 11 Mar 2011 - 03:22
मित्रांनो,
धन्यवाद!
आत्ताच पुस्तक मागवतो.
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Sat, 12 Mar 2011 - 14:48
वल्ली / सागर,
मी सुशिंचे एकही पुस्तक वाचलेले नाही. वाचावे असे कधी मनातही आले नाही. आमच्या वाचक-ग्रुपमधेदेखील कधीच कोणी त्यांच्याविषयी बोललेले नाही. त्यामुळे इथे तुमच्यासारखे 'डाय हार्ड पंखे' बघून वाटते की `सुशि' वाचनाचा एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?
माझ्यासारख्या `सुशिं'शी तोंडओळखदेखील नसलेल्या वाचकाला त्यांचे एखादे पुस्तक सुचवाल का?
सागर
सागर · Sat, 12 Mar 2011 - 15:16 · उत्तर
चित्रा,
सुशिंच्या पुस्तकदालनात सर्व रस तुला सापडतील.
त्यातून तुला हवे ते निवड
रहस्यकथा :
बॅरिस्टर अमर विश्वास कथा : थर्राट, चॅलेंज, ऑर्डर ऑर्डर, सायलेन्स प्लीज, वन्डर ट्वेल्व्ह
फिरोज इराणी कथा : पांचाली, गाफील, पांचाली, ट्रेलर गर्ल
मंदार पटवर्धन कथा: अफलातून, ब्लॅक किंग, गोल्ड हेवन, तो, सफाई
दारा बुलंद कथा : सन्नाटा, आक्रोश, इज्जत, खजिना, पोलादी
विनोदी कथा:
जाता येता, बरसात चांदण्यांची, निमित्तमात्र, लटकंती
विस्मयकथा :
गुणगुण, अनुभव, वेशीपलिकडे, अंतिम,
भयकथा:
प्राक्तन, समथिंग, माध्यम, जाणीव, सनसनाटी
इतरः
- दुनियादारी (ही कॉलेज जीवनावर आहे. तरी आजही मला खूप आवडते)
- असीम
- हमखास ( अगदी छोटीशीच पण चिंतन करायला भाग पाडते ही कथा)
- मुक्ती
- सॉरी सर
शोकांतिका:
- कोसळ
- कोवळीक
- जाई ( गंध चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमृता सुभाष बसमध्ये का कोठे वाचत असते ते हेच पुस्तक :) )
- दास्तान
- प्रतिकार (पुण्यात एका प्रतिथयश कॉलेजच्या तरुणीवर एक रिक्षाचालक, कॉलेजचे विद्यार्थी यांनी बलात्कार केला होता. ती केस खूप गाजली होती. अशी दुष्कर्मी माणसे समाजाच्या निष्क्रीयतेमुळे कशी हवे ते करायला धजावतात हे उत्तम दाखवले आहे. खरे तर लोकांना जागे करण्यासाठीच सुशिंनी ही कादंबरी लिहिलेली होती.)
तूर्तास एवढे पुरे :)
वल्ली
वल्ली · Sun, 13 Mar 2011 - 01:00 · उत्तर
कथासंग्रहः
कथापौर्णिमा (मस्ट रीड असाच), मूडस, शेड्स (हा बहुधा गूढकथा संग्रह-कॉलिंग सागर)
थरारकादंबरी
प्रयास, स्पेल बाउंड
दारू व तिचे दुष्परीणामावर वाहिलेली म्हटली तर शोकांतिका म्हटली तर विनोदी, म्हटली तर सामाजिक-
झूम
ऐतिहासिक-
रूपमती.
अजून काही सविस्तर देइनच पुढे.
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Sat, 12 Mar 2011 - 16:25
सागर,
बाप रे बाप! केवढी ही यादी..... अ.ब.ब!!!!!!!!!!
वल्ली
वल्ली · Sun, 13 Mar 2011 - 00:55 · उत्तर
ही यादी तर अगदीच लहान आहे चित्रा. सुशिंनी सर्व प्रकारच्या साहित्यात इतके विपुल लिहून ठेवले आहे ना की यादी करायली घेतली तर मारूतीच्या शेपटासारखी वाढतच जाईल.
सागर
सागर · Sun, 13 Mar 2011 - 07:16 · उत्तर
वल्लीचे बरोबर आहे.
आणि सगळी यादी केली असे वाटले तरीही काही पुस्तके राहिनच एवढे विपुल साहित्य आहे सुशिंचे :)
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · Sun, 13 Mar 2011 - 04:15