कादंबर्‍यांचा अभाव: आपणास काय वाटते?

वल्ली

मजकूर

उपरोक्त संकेतस्थळावरील पुस्तकांची यादी पाहत असता असे लक्षात आले की यादीत कादंबर्‍यांची संख्या बरीच कमी आहे.तर आरोग्य, पाककला, आत्मचरीत्रपर, राजकीय, उद्योगविषयक, तात्विक, धार्मिक, ऐतिहासिक पुस्तकांची संख्या बरीच जास्त आहे.
याचे नेमके कारण काय असावे? एकतर वाचकांची जीवनशैली बदललेली असल्याने त्याचे परीवर्तन पर्यायाने वाचंकाच्या बदलेल्या वाचनाच्या आवडीत झाले आहे काय? किंवा सध्याच्या काळातील असलेला समर्थ कादंबरीकारांचा अभाव?
गोनीदा, श्री. ना. पेंडसे, खांडेकर, रणजीत देसाई, ह. ना. आपटे, सुहास शिरवळरकर, बाबा कदम ई. सारखे दिग्गज कादंबरीकार सध्या महाराष्ट्रात नाहीत काय? का वाचकांची आवड बदललेली असल्याने सध्याचे लेखक(काही अपवाद सोडून) कादंबर्‍यांच्या वाटेला जायचे धाडस करत नाहीत काय?

आपणास काय वाटते?

अभिप्राय

वेदश्री

वेदश्री · Sun, 27 Jun 2010 - 06:51

माझे वाचन तितकेसे नाही पण मलातरी असा काही अभाव वगैरे असल्याचे जाणवले नाही. जयंत नारळीकरांच्या कादंबर्‍या या तुम्ही सांगितलेल्या लेखकांच्या मानाने नव्याच आहेत की! अगदीच डोळ्यासमोरचे उदाहरण द्यायचे म्हटले तर कालपरवा पुस्तकलेखनक्षेत्रात घुसलेल्या श्रावण मोडकांनी देखील तिढा नावाची कादंबरीच लिहिली आहे. आजकाल अनुवादित कादंबर्‍यांचाही बर्‍यापैकी सुळसुळाट आहे.. अर्थात तुम्ही हा प्रकार कादंबर्‍यांच्या प्रकारात मोडतो असे धरत नसल्यास गोष्ट वेगळी. हां आता ही लेखकमंडळी दिग्गज आहेत की नाहीत हे ज्यानेत्याने ठरवायचे पण कादंबर्‍यांचा अभाव अशीतरी परिस्थिती खचितच जाणवली नाही मला.

वाचकांच्या आवडीचे म्हणाल तर व्यक्ती तितक्या प्रकृती. :) कुठल्याही संकेतस्थळांवरची यादी ही वाचकांच्या पसंतीचा मापदंड ठरू शकते असे मला वाटत नाही.. तसा प्रयत्न जरी करता येत असला तरी.

वल्ली

वल्ली · Sun, 27 Jun 2010 - 07:09 · उत्तर

माझे वाचन तितकेसे नाही पण मलातरी असा काही अभाव वगैरे असल्याचे जाणवले नाही
कुठल्याही पुस्तकप्रदर्शनात पाहा. हा अभाव पटकन ध्यानात येइल

जयंत नारळीकरांच्या कादंबर्‍या या तुम्ही सांगितलेल्या लेखकांच्या मानाने नव्याच आहेत की! अगदीच डोळ्यासमोरचे उदाहरण द्यायचे म्हटले तर कालपरवा पुस्तकलेखनक्षेत्रात घुसलेल्या श्रावण मोडकांनी देखील तिढा नावाची कादंबरीच लिहिली आहे
अगदी मान्य. मी वर म्हटलेच आहे की काही अपवाद सोडून

आजकाल अनुवादित कादंबर्‍यांचाही बर्‍यापैकी सुळसुळाट आहे
अर्थातच..आणि कित्येक दर्जेदारही आहेत यात सिडने शेल्ड्न, ग्रिशम, कूक्, आर्चर, हेली यांचबरोबर आपले भैरप्पा, अनंतमूर्ती, कारंथ, महाश्वेतादेवी, चटोपाध्यायही आले पण त्यांचे मूळ मराठी नसल्याने त्यांचा विचार केला नाही .

कुठल्याही संकेतस्थळांवरची यादी ही वाचकांच्या पसंतीचा मापदंड ठरू शकते असे मला वाटत नाही.. तसा प्रयत्न जरी करता येत असला तरी.
कुठलेही पुस्तक विषयीचे संकेतस्थळ, पुस्तक प्रदर्शन, दुरचित्रवाहिनी, वर्तमानपत्र, तसेच पुस्तक परीक्षण पाहा यात वाचकांची बदललेली आवडच प्रतिबिंबीत झालेली दिसेल.

आनंदयात्री

आनंदयात्री · Sun, 27 Jun 2010 - 09:02

नमस्कार वल्ली.
आपला प्रश्न या संकेतस्थळावर असलेल्या यादीबद्दल असेल तर आपण त्यात सुधारणा नक्कीच करु शकतो. आपणास काय आणि कशी सुधारणा हवी आहे ते कळल्यास त्याचा पुढे विचार करता येईल.

बाकी खर्‍या पुस्तकविश्वात नवनविन विषयांवरच्या कादंबर्‍या येतच आहेत, जुन्याचे मूल्यमापन करतांना मोठ्ठा कॅनव्हास आपल्यासमोर असतो - साधारण ५० वर्षांचा कालखंड. त्यामूळे जुने-नवे ही तुलना नेहमीच एकांगी होत असावी असे वाटते. आपल्याकडे काही सांख्यिकी असेल (अंदाजपंचे सुद्धा चालेल) तर तसा आढावा घ्यायला मौज वाटेल. जसे तुम्ही उदाहररण देउन सांगु शकता का की ८० च्या दशकात उत्तम पुस्तके आली आणी ९० मधे अजिबात नाही !

ऋषिकेश

ऋषिकेश · Sun, 27 Jun 2010 - 14:16

माझं वाचन इतकं कमी आहे की जुन्याच पुस्तकांचा बॅकलॉग संपलेला नाहि :) जर कोणी नवे लेखक असतील व लेखन चांगले असेल तर तर कोणी तरी शिफारस करेलच.

बाकी, एक खरं की तुम्ही म्हणता तसे पटकन, प्रसिद्ध आणि हल्लीच्या काळातील कादंबरीकाराचे नाव मात्र अपवाद म्हणूनच आठवते. (पण तो माझा दोष असु शकेल)

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Mon, 28 Jun 2010 - 10:18

माझे मुळात वाचन कमी... त्यात कादंबरी हा प्रकार फारसा वाचलेला नाही त्यामुळे आभाव आहे का नाही या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे.

काल नेमाड्यांची टिव्ही वर मुलाखात पाहिली... त्यांनी मराठीत चांगले कादंबरी कार नाहिएत असे मत व्यक्त केले आहे.

टण्या

टण्या · Tue, 6 Jul 2010 - 14:48

काल नेमाड्यांची टिव्ही वर मुलाखात पाहिली... त्यांनी मराठीत चांगले कादंबरी कार नाहिएत असे मत व्यक्त केले आहे.
>>>>>>>>>
नेमाड्यांची समिक्षा आणि त्यांची मते ह्या दोन्ही गोष्टी थोड्या फुंकुनच वाचाव्या लागतात.. :)

पण वर म्हटल्याप्रमाणे कादंबरी हा प्रकार थोडा कमी झाल्यासारखा वाटतोय खरा.. पेंडसे, नेमाडे, दळवी, गोनीदा, रेगे, कांबळे इत्यादी अनेकांनी समर्थपणे हाताळलेला हा साहित्यप्रकार.. मला माहिती असलेले गेल्या १०-१५ वर्षातील कादंबरीकार म्हणजे मिलिंद बोकील, प्रकाश संत, मेघना पेठे.. अजून फारशी नावे ऐकलीच नाहीत.. अर्थात जी लोकं अजुनही ग्रंथालयातून पुस्तके आणून वाचत आहेत ते अधिक चांगल्याप्रकारे सांगू शकतील की सध्याची परिस्थिती काय आहे. तसेच ते इथे नवीन नोंद घेण्यायोग्य कादंबरीकारांची नावेसुद्धा देउ शकतील.. (जे स्वतः पुस्तके विकत घेउनच वाचतात, ग्रंथालयात विविध कारणांनी जाउ शकत नाहीत ते साहजिकच केवळ माहितीतल्याच लेखकांची पुस्तके घेत राहतात व नवीन उभरते लेखक/कलाकृती निसटून जातात)..

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · गुरुवार, 8 Jul 2010 - 16:06

ताज्या म्हणता येतील अशा काही कादंबर्‍या:
अंत ना आरंभही - अंबिका सरकार
त्या वर्षी - शांता गोखले
कोबाल्ट ब्लू - सचिन कुंडलकर
श्रीमंत गोपिकाबाईची बखर - आनंद विनायक जातेगावकर
एकेका साहित्यप्रकाराचे दिवस असतात. लघुनिबंधांचे होते, नवकथेचे होते, कादंबर्‍यांचे होते, दलिक आत्मकथनांचे होते. त्याचा बहर ओसरला याचा अर्थ तो साहित्यप्रकार संपला असा नाही, उलट भाषेत तो प्रकार रुजला, आपलासा झाला, स्थिरावला - असा होतो.
मराठीत दर्जेदार-माहितीपूर्ण आणि सकस-अस्सल पारिभाषिक वैशिष्ट्यं असलेली समकालीन विश्वाची दखल घेणारी पुस्तकं मिळत नाहीत; म्हणून नाईलाजानं इंग्रजीची कास धरावी लागते, अशी ओरड नेहमीच होत असते. ती काहीशी रास्त आणि काही प्रमाणात कायमच अपरिहार्य आहे. पण सध्या अनुभवकथनं (प्रकाशवाटा, छंदांविषयी), गोळीबंद माहितीपूर्ण निबंध (डीएनएचे गोल गोल जिने, माणूस आणि झाड), समकालीन चळवळींचे रिपोर्ताज (कर के देखो, खरेखुरे आयडॉल्स) मोठ्या प्रमाणावर येताना दिसतात. ही एक चांगली भरच आहे.
कादंबरी संपली असं म्हणून खंतावायला मी काही तयार नाही बॉ.

वल्ली

वल्ली · Fri, 9 Jul 2010 - 06:21 · उत्तर

>>कादंबरी संपली असं म्हणून खंतावायला मी काही तयार नाही बॉ.
सहमत आहे. पण दर्जेदार कादंबर्‍या नक्कीच कमी झाल्यात किंवा कादंबरीवाचन कमी झाल्यामुळे कादंबर्‍या कमी झाल्यात असेही म्हणता येईल.

चर्चा प्रकार