१. धनंजय
२. किस्त्रिम
३. भाग्यसंकेत
४. प्रसाद
५. (......) विज्ञान विषयाला वाहिलेला एखादा अंक. नाव त्यावेळी शोधून पाहीन.
पण सध्याच्या दिवाळी अंकांच्या किंमती अवाच्या सव्वा असल्याने दिवाळीनंतर स्वस्तात मिळाले तरच घेणार आहे. उगाच फालतू पैसे घालवण्यात अर्थ नाही असे माझे मत आहे.
४०० - ५०० ही दिवाळी अंकाची किंमत असणे म्हणजे इंद्रराजांनी पुस्तकाच्या चर्चेत उदाहरण दिल्याप्रमाणे "दिवाळी अंक प्रेमी वाचकांची निरमा ने धुलाई करण्यासारखे आहे" तेव्हा निषेध म्हणून मी तरी एवढे पैसे खर्च करुन दिवाळी अंक विकत घेणार नाहिये...
महाशय मी बंगळुरात असतो त्यामुळे लायब्ररीची सुविधा मिळवणे अशक्य आहे. नाहीतर दरवर्षी मी किमान ५-६ अंक विकतच घेतो. यावेळच्या अंकांचे दर तुम्हाला परवडत असतील तर घ्याकी राव खुशाल. मला जे परवडते ते मी करतो. पैशापेक्षा अर्थपूर्ण किंमतीला मी जास्त महत्त्व देतो. दिवाळी अंक ही काही पुस्तकांसारखी जतन करायची गोष्ट नाहिये की त्यासाठी ४००-५०० रुपये मोजले जावेत. म्हणून माझा हा दृष्टीकोन आहे.
नुकतेच माझे माझ्या नेहमीच्या 'रसिक साहित्य'शी बोलणे झाले. त्यांनी ताबडतोब मला दिवाळी अंकाची किंमतीची यादी पाठवली आणि बहुतेक सगळे अंक ७० ते १२० च्या दराने आहेत अपवादात्मक १५० आहे.
त्यातही रसिक साहित्य दिवाळी अंकावर २५% सवलत देणार आहे :)
तेव्हा मी पुढील ५ अंक मागवले आहेत.
१. भाग्यसंकेत
२. ग्रहांकित
३. धनंजय
४. नवल आणि
५. माहेर
बाजारात अजून सगळे अंक आलेले नाहियेत ते २-३ दिवसांत येणार आहेत. पण आले की लगेच पाठवतो असे मला रसिक वाले म्हणाले आहेत. ते मिळतील याची खात्री आहेच.
असे वाजवी दर दिसले की मग खरेदीदेखील कराविशी वाटते :)
किस्त्रिम, नक्षत्रांचं देणं, चंद्रकांत आणि प्रसाद हे अंक दुसर्या खेपेत इतर अंकांबरोबर घेईन.
मग हेही पाहिले आहेस का सागर? निव्वळ पैसे गोळा करायच्या उद्देशाने मायबोलीने अंकांच्या किंमती अशा ठेवलेल्या नाहीत, त्या पैशाचा कसा विनियोग होईल हेही मी दिलेल्या लिंकमध्ये तुला समजेलच. मायबोली व तिथे चालत असलेल्या कार्यक्रमांविषयी उगाच कोणाचे वाईट ग्रह होऊ नतेय म्हणून मुद्दाम लिहिले आहे. मायबोली अनेक उत्तम कार्यक्रम चालवते, होता होईतो आपली सामजिक जबाबदारीही पार पाडते, थोडाफार खारीचा वाटा मीही उचलते, अनेक मायबोलीकर उचलतात, त्या सर्वावर अशा प्रकारे तू केलेल्या टिपण्णीने पाणी पडू नये आणि त्याचे महत्त्व कमी होऊ नये म्हणून ही पोस्ट लिहिली आहे.
आणि सागर, मायबोली अॅडमिनकडून हा खास निरोप -: "लॉगीन न करता पाहिलं तर भारतीय रुपयांतील किंमत ही परदेशातील किंमतींचं conversion आहे. पण भारतातील पत्ता असेल तर किंमतीत खूप सूट दिली जाते." मी दिलेल्या लिंकमधेही तसं लिहिलेलं आहे, जर तू वाचलस तर.
मायबोली बद्दल गैरसमज अजिबात नाहिये. मी स्वतः मायबोलीवरुन नियमितपणे पुस्तके खरेदी करतो. आणि मायबोली पैशाचा विनियोग अनेक चांगल्या प्रकारे करते हे ही माहिती आहे. एवढेच काय तर दिवाळी अंकाच्या किंमती पाहिल्यावरही मायबोलीवरुन मी काही पुस्तके मागवली होती.
पण एक ग्राहक म्हणून मी जेव्हा दिवाळी अंकांच्या प्रत्येकी ५०६ रुपये किंमत पाहिली तेव्हा पॅनिक होणे स्वाभाविकच होते. भारतीय ग्राहकांसाठी वेगळा विभाग मायबोलीला करता आला तर खूप चांगले होईल. किमान माझ्यासारखा गैरसमज अजून कोणाचा व्हायला नको. कोण जाणे अनेकांनी किमती पाहूनच दिवाळी अंक मायबोलीवरुन घेण्याचा बेत रद्द केला असेल?. होऊ शकते ते. पण तुझ्या तत्पर प्रतिसादाबद्दल खरेच धन्यवाद. डोके शांत झाले :)
आमच्या ऑफिसात नेमके खरेदी.मायबोली.कॉम एवढेच दिसते. मायबोली.कॉम सोशल नेटवर्क म्हणून ब्लॉक होते आहे. त्यामुळे तू दिलेली लिंक आता पहाता येत नाहिये. पण संध्याकाळी घरुन अवश्य पाहीन.
तुझ्या प्रतिसादानंतर आत्ताच खरेदी मायबोली उघडण्याचा प्रयत्न केला. पण सर्व साईट नीट दिसत नाहिये . बहुतेक काही काम चालू असावे. असो. मी पुन्हा एकदा पाहीन नंतर.
मायबोली अॅडमिन ला माझ्याकडून खास धन्यवाद दे या सविस्तर खुलाशाबद्दल. :)
>>मी स्वतः मायबोलीवरुन नियमितपणे पुस्तके खरेदी कर>>>>
>>पण एक ग्राहक म्हणून मी जेव्हा दिवाळी अंकांच्या प्रत्येकी ५०६ रुपये किंमत पाहिली तेव्हा पॅनिक होणे स्वाभाविकच होते. >>
ते ठीक, पण मग मायबोलीच्या उपक्रमाबद्दल असे लिहिण्याआधी, आधी खुलासा करुन घेणे आवश्यक नव्हते का? :) असो. तुला आता खुलासा मिळाला हे बघून बरे वाटले.
पण किंमती पाहून मला खरेच काहितरी चुकीचे असेल असे वाटले नाही. मला वाटले बहुतेक ही दिवाळी अंकाची किंमत असूही शकेल. त्यामुळे मायबोलीला कॉन्टॅक्ट केले नव्हते. आता केले आहे.
पुस्तकविश्वच्या संपादकांना विनंती आहे की माझा प्रतिसाद पुढीलप्रमाणे संपादित करावा. उगाच माझ्या प्रतिसादामुळे गैरसमज नको पसरायला.
मायबोली या संकेतस्थळावर प्रत्येक दिवाळी अंकाची ५०६ रुपये किंमत पाहून डोके फिरले होते
मायबोलीचा हा किंमत प्रताप इथे पाहता येईल
रु.५०६/- हा आकडा चिंतनीय खरंच आहे (आता होता असे म्हणू या). मी 'मायबोली' चा सदस्य नसल्याने या किंमतीबद्दलची त्यांची भूमिका समजू शकणार नव्हतोच. तरीही श्री.सागर यानी दिलेल्या लिंकवरून तिथे प्रवेश केल्यावर असे दिसले की सर्वच अंकांची किंमत सरसकत ५०६/- अशीच आहे. त्यामुळे एक तर्क असाही निघाला की बहुधा ते पान परदेशस्थ मराठी वाचकासाठी असणार. पण आता वरील संवादाचे आदानप्रदान वाचल्यावर लक्षात आले ~ काही स्तुत्य कारणासाठी तशी किंमत ठेवण्यात आली आहे. असो.
(थोडेसे जाताजाता : "पण श्रामो, इथे दिसायला नको एवढेच..." : या वाक्यामुळे मराठी व्याकरण आणि विरामचिन्हांचे लिखाणात किती महत्व आहे (जे कित्येकवेळा दुर्लक्षिले जाते...) हे वाचणार्यांना उमगून येईल..... फक्त तो स्वल्पविराम काढला तर?)
"श्रामोसारखा धडाडीचा सदस्य इथून गायब होणे परवडणार नाही......."
~ सहमत !
(अर्थात तेच का, अन्यही कुणी गायब होऊ नये या पुस्तकविश्वातून....मी फार प्रेमात पडलोय (काहीसे वेळाने सदस्यत्व घेतले असेही जाणवत आहे....पण ठीक आहे, दिवाळीनंतर कसर भरून काढतो.)
सागर, मायबोलीची विश्वासार्हता चुकीच्या समजुतीमुळे धोक्यात येऊ नये म्हणून तुला सुचवले होते इतकेच. त्यामुळे ज्यां सर्वांची मने दुखावली त्यांची माफी मागते. मागायलाच हवी. असो.
अक्षर, अंतर्नाद, भटकंती, धनुर्धारी, ग्रंथाली, हंस, कालनिर्णय, ललित, लोकप्रभा, लोकसत्ता, मौज, नवल, सामना, साधना, साप्ताहिक सकाळ हे वाचायचे आहेत. अजून कोणते चांगले असतील तर सांगा.
हीच नावं लिहायला आले होते. रुतुरंग चे अंक पण चांगले असतात! चित्रकलेत गती असेल तर चिन्ह पण चांगला आहे. पण माझा १ ला प्रेफरन्स अक्षर ला!!
तसा मला चंदेरीचा पण आवडतो. गौतम राजाध्यक्षांचे लेख व फोटो छान असतात. बघु या आता कोणते मिळतात वाचायला!!!
कथा मी अजून वाचलेल्या नाहीत.ज्यू लोकांच्या संहारावर आधारीत असा पहिलाच लेख फोटोंसकट आहे, लेखही नुसताच वर वर पाहिला. फोटो पाहूनच सुन्न व्हायला होते, अंक मिटून ठेवला आहे.
सालाबाद प्रमाणे लायब्ररी लावणार. त्यामुळे २-३ महिन्यात बरेचसे वाचून होतील.. सुरवातीला कोणता हातात लागतो हा नशीबाचा खेळ :)
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी ७ ला आमच्या शाळेची लायब्ररी खास अंकांसाठी उघडतात. तेव्हा ६:३० ला बाहेर जाऊन उभा रहातो .. गेल्यावेळी आधी जाऊनही सहावा नंबर होता :( आणि हाती "आवाज" लागला होता.
संपादक,
दिवाळी अंकाच्या परिक्षणासाठी वेगळा भाग उघडता येईल का? नहितर मग मी गेल्यावर्षी उपक्रमावर [ चर्चा ]सुरू केली होती तशी करावी ज्यात सगळे रेटिंग देऊ शकतील
यावर्षीही मी दिवाळी अंकांना मुकणार. आम्ही आमच्या (मी जिथे नोकरी करते त्या) कॉलेजमध्ये प्रत्येकी १००रू. भरून दिवाळी अंक लायब्ररी चालवतो.मी कधी मोजले नाहीत पण बरेचसे अंक येतात तेवढ्या पैशांत. दिवाळीच्या आधी छोटासा खादाडीचा कार्यक्रम करतो. आणि दिवाळीनंतर प्रत्येकजण हवे तेव्हा हवा तो अंक घेऊन जातो. प्रत्येकाच्या नावाचे कार्ड बनवून नेणाराचे कार्ड ते अंकाच्या कार्डात घालून ठेवतो. त्यामुळे एखादा अंक हवा असेल तर तो कुणाकडे असेल हेही कळते. आणि फक्त १००रू मध्ये बरेचसे अंक वाचायला मिळतात.
आता यावर्षी नाही पण पुढच्या वर्षीपासून नक्कीच वाचायला मिळतील दिवाळी अंक!!
'मुक्त शब्द' नावाचं नवीन मासिक चालू झालेलं आहे (आधीच्या शब्द मासिकाशी संबंध असल्यास माहिती नाही). गेल्या काही महिन्यांचे अंक पाहता त्यांचा दिवाळी अंक बरा असेल अशी अपेक्षा आहे.
दिवाळि अंक येथे ऑनलाइन वाचता येईल.
http://www.loksatta.com/lokprabha/
यात लता-आशा वरचा शिरीष कणेकरांचा लेख कुंपणावर बसून लिहिल्यासरखा वाट्तो. लता-आशावरचे लेख म्हणजे आता शिळ्या कढीला ऊत आणल्यासारखे वाटतात. त्यात हा लेख म्हणजे त्यांच्याच जुन्या प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील पॅरेग्राफ एकत्र करुन लिहिला आहे. त्यामूळे अत्यंत कंटाळ्वाणा झालाय.
हजार लेकरांची माय हा सिंधुताई सपकाळांवरचा लेख छान आहे,आवडला.
तसेच 'मॄत्युच्या छायेतील महापुरुष आणि खलपुरुष' हा विश्वास पाटील यांनी लिहिलेला लेखही माहितीपुर्ण आहे. भुषण कोरगावकर यांनी लिहिलेला 'सोडा सोडा राया तनु शिणली' शकुंतला नगरकर या कलावतीची मुलाखत आहे. चांगली आहे. तेच निकाह या लेखाबद्दलही म्हणता येईल.
विशेष उल्लेख करण्यासारखा लेख म्हणजे रामदास यांचा 'रत्नचरित्र-दैवी रत्नांची शापित वाटचाल' हा लेख.
खुपच ओघवत्या शैलीत कंटाळवाणा होऊ न देता माहीतीपुर्ण लेख लिहिला आहे. मिपावर वावर असणार्यांना माहीत असेलच. :)
अच्युत गोडबोल्यांचा मेंदूविकारांवरच्या उपचारात आधुनिक तंत्रज्ञानाचा असलेला मोठा वाटा विशद करणारा लेखही माहितीपुर्ण!!
थोडक्यात काय तर २ लेख उत्तम, २ लेख माहितीपुर्ण २ लेख छान, २ लेख बरे, १ लेख वाईट असा क्रम लावायला हरकत नाही.
एकूणात ठिकठाक!!!!
अभिप्राय
सागर
सागर · Fri, 22 Oct 2010 - 14:09
प्राथमिकतेनुसार
१. धनंजय
२. किस्त्रिम
३. भाग्यसंकेत
४. प्रसाद
५. (......) विज्ञान विषयाला वाहिलेला एखादा अंक. नाव त्यावेळी शोधून पाहीन.
पण सध्याच्या दिवाळी अंकांच्या किंमती अवाच्या सव्वा असल्याने दिवाळीनंतर स्वस्तात मिळाले तरच घेणार आहे. उगाच फालतू पैसे घालवण्यात अर्थ नाही असे माझे मत आहे.
४०० - ५०० ही दिवाळी अंकाची किंमत असणे म्हणजे इंद्रराजांनी पुस्तकाच्या चर्चेत उदाहरण दिल्याप्रमाणे "दिवाळी अंक प्रेमी वाचकांची निरमा ने धुलाई करण्यासारखे आहे" तेव्हा निषेध म्हणून मी तरी एवढे पैसे खर्च करुन दिवाळी अंक विकत घेणार नाहिये...
चळट्रीस
चळट्रीस · Fri, 22 Oct 2010 - 15:42 · उत्तर
दिवाळी नंतर स्वस्तात म्हणजे...? रद्दीत का ? मग लायब्ररी का लावत नाही ?
सागर
सागर · Sat, 23 Oct 2010 - 19:28 · उत्तर
महाशय मी बंगळुरात असतो त्यामुळे लायब्ररीची सुविधा मिळवणे अशक्य आहे. नाहीतर दरवर्षी मी किमान ५-६ अंक विकतच घेतो. यावेळच्या अंकांचे दर तुम्हाला परवडत असतील तर घ्याकी राव खुशाल. मला जे परवडते ते मी करतो. पैशापेक्षा अर्थपूर्ण किंमतीला मी जास्त महत्त्व देतो. दिवाळी अंक ही काही पुस्तकांसारखी जतन करायची गोष्ट नाहिये की त्यासाठी ४००-५०० रुपये मोजले जावेत. म्हणून माझा हा दृष्टीकोन आहे.
सागर
सागर · Wed, 27 Oct 2010 - 20:19 · उत्तर
मित्रांनो,
दिवाळी अंकाबद्दलच्या किंमतीबद्दलचा गैरसमज दूर झाला आहे.
मायबोली या संकेतस्थळावर प्रत्येक दिवाळी अंकाची ५०६ रुपये किंमत पाहून डोके फिरले होते :)
मायबोलीचा हा किंमत प्रताप इथे पाहता येईल
नुकतेच माझे माझ्या नेहमीच्या 'रसिक साहित्य'शी बोलणे झाले. त्यांनी ताबडतोब मला दिवाळी अंकाची किंमतीची यादी पाठवली आणि बहुतेक सगळे अंक ७० ते १२० च्या दराने आहेत अपवादात्मक १५० आहे.
त्यातही रसिक साहित्य दिवाळी अंकावर २५% सवलत देणार आहे :)
तेव्हा मी पुढील ५ अंक मागवले आहेत.
१. भाग्यसंकेत
२. ग्रहांकित
३. धनंजय
४. नवल आणि
५. माहेर
बाजारात अजून सगळे अंक आलेले नाहियेत ते २-३ दिवसांत येणार आहेत. पण आले की लगेच पाठवतो असे मला रसिक वाले म्हणाले आहेत. ते मिळतील याची खात्री आहेच.
असे वाजवी दर दिसले की मग खरेदीदेखील कराविशी वाटते :)
किस्त्रिम, नक्षत्रांचं देणं, चंद्रकांत आणि प्रसाद हे अंक दुसर्या खेपेत इतर अंकांबरोबर घेईन.
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 28 Oct 2010 - 09:18 · उत्तर
>>>>मायबोलीचा हा किंमत प्रताप इथे पाहता येईल
मग हेही पाहिले आहेस का सागर? निव्वळ पैसे गोळा करायच्या उद्देशाने मायबोलीने अंकांच्या किंमती अशा ठेवलेल्या नाहीत, त्या पैशाचा कसा विनियोग होईल हेही मी दिलेल्या लिंकमध्ये तुला समजेलच. मायबोली व तिथे चालत असलेल्या कार्यक्रमांविषयी उगाच कोणाचे वाईट ग्रह होऊ नतेय म्हणून मुद्दाम लिहिले आहे. मायबोली अनेक उत्तम कार्यक्रम चालवते, होता होईतो आपली सामजिक जबाबदारीही पार पाडते, थोडाफार खारीचा वाटा मीही उचलते, अनेक मायबोलीकर उचलतात, त्या सर्वावर अशा प्रकारे तू केलेल्या टिपण्णीने पाणी पडू नये आणि त्याचे महत्त्व कमी होऊ नये म्हणून ही पोस्ट लिहिली आहे.
आणि सागर, मायबोली अॅडमिनकडून हा खास निरोप -: "लॉगीन न करता पाहिलं तर भारतीय रुपयांतील किंमत ही परदेशातील किंमतींचं conversion आहे. पण भारतातील पत्ता असेल तर किंमतीत खूप सूट दिली जाते." मी दिलेल्या लिंकमधेही तसं लिहिलेलं आहे, जर तू वाचलस तर.
सागर
सागर · गुरुवार, 28 Oct 2010 - 11:51 · उत्तर
यशोधरा सविस्तर खुलाशाबद्दल धन्यवाद.
मायबोली बद्दल गैरसमज अजिबात नाहिये. मी स्वतः मायबोलीवरुन नियमितपणे पुस्तके खरेदी करतो. आणि मायबोली पैशाचा विनियोग अनेक चांगल्या प्रकारे करते हे ही माहिती आहे. एवढेच काय तर दिवाळी अंकाच्या किंमती पाहिल्यावरही मायबोलीवरुन मी काही पुस्तके मागवली होती.
पण एक ग्राहक म्हणून मी जेव्हा दिवाळी अंकांच्या प्रत्येकी ५०६ रुपये किंमत पाहिली तेव्हा पॅनिक होणे स्वाभाविकच होते. भारतीय ग्राहकांसाठी वेगळा विभाग मायबोलीला करता आला तर खूप चांगले होईल. किमान माझ्यासारखा गैरसमज अजून कोणाचा व्हायला नको. कोण जाणे अनेकांनी किमती पाहूनच दिवाळी अंक मायबोलीवरुन घेण्याचा बेत रद्द केला असेल?. होऊ शकते ते. पण तुझ्या तत्पर प्रतिसादाबद्दल खरेच धन्यवाद. डोके शांत झाले :)
आमच्या ऑफिसात नेमके खरेदी.मायबोली.कॉम एवढेच दिसते. मायबोली.कॉम सोशल नेटवर्क म्हणून ब्लॉक होते आहे. त्यामुळे तू दिलेली लिंक आता पहाता येत नाहिये. पण संध्याकाळी घरुन अवश्य पाहीन.
तुझ्या प्रतिसादानंतर आत्ताच खरेदी मायबोली उघडण्याचा प्रयत्न केला. पण सर्व साईट नीट दिसत नाहिये . बहुतेक काही काम चालू असावे. असो. मी पुन्हा एकदा पाहीन नंतर.
मायबोली अॅडमिन ला माझ्याकडून खास धन्यवाद दे या सविस्तर खुलाशाबद्दल. :)
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 28 Oct 2010 - 12:19 · उत्तर
>>मी स्वतः मायबोलीवरुन नियमितपणे पुस्तके खरेदी कर>>>>
>>पण एक ग्राहक म्हणून मी जेव्हा दिवाळी अंकांच्या प्रत्येकी ५०६ रुपये किंमत पाहिली तेव्हा पॅनिक होणे स्वाभाविकच होते. >>
ते ठीक, पण मग मायबोलीच्या उपक्रमाबद्दल असे लिहिण्याआधी, आधी खुलासा करुन घेणे आवश्यक नव्हते का? :) असो. तुला आता खुलासा मिळाला हे बघून बरे वाटले.
सागर
सागर · गुरुवार, 28 Oct 2010 - 12:39 · उत्तर
पण किंमती पाहून मला खरेच काहितरी चुकीचे असेल असे वाटले नाही. मला वाटले बहुतेक ही दिवाळी अंकाची किंमत असूही शकेल. त्यामुळे मायबोलीला कॉन्टॅक्ट केले नव्हते. आता केले आहे.
पुस्तकविश्वच्या संपादकांना विनंती आहे की माझा प्रतिसाद पुढीलप्रमाणे संपादित करावा. उगाच माझ्या प्रतिसादामुळे गैरसमज नको पसरायला.
मायबोली या संकेतस्थळावर प्रत्येक दिवाळी अंकाची ५०६ रुपये किंमत पाहून डोके फिरले होते
मायबोलीचा हा किंमत प्रताप इथे पाहता येईल
हा प्रतिसाद उडवून पुढील वाक्य टाकावे ही विनंती
मायबोलीवर मला किंमती जास्त दिसल्या होत्या.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · गुरुवार, 28 Oct 2010 - 13:50 · उत्तर
हाहाहाहा... अरे पण मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवला आहे बरं! ;)
सागर
सागर · गुरुवार, 28 Oct 2010 - 13:57 · उत्तर
पण श्रामो, इथे दिसायला नको एवढेच ;)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 28 Oct 2010 - 14:36 · उत्तर
रु.५०६/- हा आकडा चिंतनीय खरंच आहे (आता होता असे म्हणू या). मी 'मायबोली' चा सदस्य नसल्याने या किंमतीबद्दलची त्यांची भूमिका समजू शकणार नव्हतोच. तरीही श्री.सागर यानी दिलेल्या लिंकवरून तिथे प्रवेश केल्यावर असे दिसले की सर्वच अंकांची किंमत सरसकत ५०६/- अशीच आहे. त्यामुळे एक तर्क असाही निघाला की बहुधा ते पान परदेशस्थ मराठी वाचकासाठी असणार. पण आता वरील संवादाचे आदानप्रदान वाचल्यावर लक्षात आले ~ काही स्तुत्य कारणासाठी तशी किंमत ठेवण्यात आली आहे. असो.
(थोडेसे जाताजाता : "पण श्रामो, इथे दिसायला नको एवढेच..." : या वाक्यामुळे मराठी व्याकरण आणि विरामचिन्हांचे लिखाणात किती महत्व आहे (जे कित्येकवेळा दुर्लक्षिले जाते...) हे वाचणार्यांना उमगून येईल..... फक्त तो स्वल्पविराम काढला तर?)
इन्द्रा
सागर
सागर · गुरुवार, 28 Oct 2010 - 15:29 · उत्तर
"पण श्रामो, इथे दिसायला नको "
आणि
"पण श्रामो इथे दिसायला नको "
=)) हसून हसून पोट दुखले.
श्रामोसारखा धडाडीचा सदस्य इथून गायब होणे परवडणार नाही ;)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 28 Oct 2010 - 15:35 · उत्तर
"श्रामोसारखा धडाडीचा सदस्य इथून गायब होणे परवडणार नाही......."
~ सहमत !
(अर्थात तेच का, अन्यही कुणी गायब होऊ नये या पुस्तकविश्वातून....मी फार प्रेमात पडलोय (काहीसे वेळाने सदस्यत्व घेतले असेही जाणवत आहे....पण ठीक आहे, दिवाळीनंतर कसर भरून काढतो.)
इन्द्रा
सागर
सागर · गुरुवार, 28 Oct 2010 - 15:39 · उत्तर
इंद्रराज,
तुमच्या कसर भरुन काढण्याची वाट पहातो आहे.
ते आपलं तुमचा ग्रंथसंग्रह, वाचलेली पुस्तके, वाचायची पुस्तके वगैरे
दिवाळीत भरपूर आराम करा आणि कसर भरुन काढा ;)
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 28 Oct 2010 - 14:47 · उत्तर
सागर, मायबोलीची विश्वासार्हता चुकीच्या समजुतीमुळे धोक्यात येऊ नये म्हणून तुला सुचवले होते इतकेच. त्यामुळे ज्यां सर्वांची मने दुखावली त्यांची माफी मागते. मागायलाच हवी. असो.
सागर
सागर · गुरुवार, 28 Oct 2010 - 15:32 · उत्तर
छे गं यशोधरा.... माफी कसली मागतेस?
उलट तुझे धन्यवाद की तू प्रामाणिकपणे मायबोलीची विश्वासार्हता जपण्यासाठी प्रयत्न करते आहेस ते.
मायबोलीचा मी पण सदस्य आहे तेव्हा गैरसमज नव्हताच.
मुद्दा फक्त किंमतीपुरता मर्यादीत होता... तेव्हा फिकर नॉट :)
यशोधरा
यशोधरा · Fri, 22 Oct 2010 - 14:13
अक्षर, अंतर्नाद, भटकंती, धनुर्धारी, ग्रंथाली, हंस, कालनिर्णय, ललित, लोकप्रभा, लोकसत्ता, मौज, नवल, सामना, साधना, साप्ताहिक सकाळ हे वाचायचे आहेत. अजून कोणते चांगले असतील तर सांगा.
चळट्रीस
चळट्रीस · Fri, 22 Oct 2010 - 15:38 · उत्तर
हे सारेच अंक वाचनीय आहेत. मनोविकास प्रकाशनाच्या इत्यादी मासीकाचा दिवाळी अंकही गेली काही वर्श अत्यंत देखणा आणि वाचनीय निघतो. पहा एकदा ट्राय करून.
रोचीन
रोचीन · Sat, 23 Oct 2010 - 07:09 · उत्तर
हीच नावं लिहायला आले होते. रुतुरंग चे अंक पण चांगले असतात! चित्रकलेत गती असेल तर चिन्ह पण चांगला आहे. पण माझा १ ला प्रेफरन्स अक्षर ला!!
तसा मला चंदेरीचा पण आवडतो. गौतम राजाध्यक्षांचे लेख व फोटो छान असतात. बघु या आता कोणते मिळतात वाचायला!!!
यशोधरा
यशोधरा · Mon, 25 Oct 2010 - 08:14 · उत्तर
काल नवल घेतला, आणि मेहता जगतचा ग्रंथजगतही घरी आलेला आहे. चाळून पाहिलाय, बरा वाटला.
चळट्रीस
चळट्रीस · Mon, 25 Oct 2010 - 08:27 · उत्तर
मीही नवल, हंसचा चाहता आहे.
यंदाचा नवल कसा वाटला? वाचनीय कथा आहेत का? एखादी असेल तर सुचवा. म्हणजे घेऊन टाकतो मीही.
यशोधरा
यशोधरा · Mon, 25 Oct 2010 - 08:32 · उत्तर
कथा मी अजून वाचलेल्या नाहीत.ज्यू लोकांच्या संहारावर आधारीत असा पहिलाच लेख फोटोंसकट आहे, लेखही नुसताच वर वर पाहिला. फोटो पाहूनच सुन्न व्हायला होते, अंक मिटून ठेवला आहे.
चळट्रीस
चळट्रीस · Mon, 25 Oct 2010 - 08:40 · उत्तर
बरं.पण वाचल्यावर नक्की कळवा.मला गुढकथा वाचायला आवडतात;पण हल्ली फार कुणी दर्जेदार गुढकथा लिहीत नाही. गेली काही वर्श नवल, धनंजय निराशाच करत आहेत.
यशोधरा
यशोधरा · Mon, 25 Oct 2010 - 13:00 · उत्तर
>>पण वाचल्यावर नक्की कळवा. >>
हे तर नाय जमेल ना भाऊ! :P
मला आवडलेले तुम्हाला आवडेलच असे नाही आणि उलटही तसेच. त्यापेक्षा बझारमें जाईये, अंक बघिये आणि आवडला तर घेऊन टाका. :)
चळट्रीस
चळट्रीस · Mon, 25 Oct 2010 - 20:16 · उत्तर
घेऊन टाकला.
सागर
सागर · गुरुवार, 28 Oct 2010 - 11:53 · उत्तर
असहमत आहे काहिसा...
मागच्या वर्षी धनंजय मला आवडला होता. म्हणूनच मी माझ्या यादीत धनंजय चे नाव अॅड केले. नाहीतर मी धनंजय आधी जास्त नाही वाचायचो.
नवल पण घेणार आहे. वाचल्यावर प्रतिसाद देईन नक्की :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 22 Oct 2010 - 18:23
सालाबाद प्रमाणे लायब्ररी लावणार. त्यामुळे २-३ महिन्यात बरेचसे वाचून होतील.. सुरवातीला कोणता हातात लागतो हा नशीबाचा खेळ :)
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी ७ ला आमच्या शाळेची लायब्ररी खास अंकांसाठी उघडतात. तेव्हा ६:३० ला बाहेर जाऊन उभा रहातो .. गेल्यावेळी आधी जाऊनही सहावा नंबर होता :( आणि हाती "आवाज" लागला होता.
संपादक,
दिवाळी अंकाच्या परिक्षणासाठी वेगळा भाग उघडता येईल का? नहितर मग मी गेल्यावर्षी उपक्रमावर [ चर्चा ]सुरू केली होती तशी करावी ज्यात सगळे रेटिंग देऊ शकतील
सागर
सागर · Sat, 23 Oct 2010 - 19:32 · उत्तर
संपादक,
दिवाळी अंकाच्या परिक्षणासाठी वेगळा भाग उघडता येईल का?
असेच म्हणतो. पुस्तक कोडे , पुस्तक परिचय यासारखे 'दिवाळी अंक' हे दालन पुस्तकविश्व चे संकेतस्थळ अजून समृद्ध करण्यास हातभार लावेल यात शंका नाही :)
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Fri, 22 Oct 2010 - 19:03
यावर्षीही मी दिवाळी अंकांना मुकणार. आम्ही आमच्या (मी जिथे नोकरी करते त्या) कॉलेजमध्ये प्रत्येकी १००रू. भरून दिवाळी अंक लायब्ररी चालवतो.मी कधी मोजले नाहीत पण बरेचसे अंक येतात तेवढ्या पैशांत. दिवाळीच्या आधी छोटासा खादाडीचा कार्यक्रम करतो. आणि दिवाळीनंतर प्रत्येकजण हवे तेव्हा हवा तो अंक घेऊन जातो. प्रत्येकाच्या नावाचे कार्ड बनवून नेणाराचे कार्ड ते अंकाच्या कार्डात घालून ठेवतो. त्यामुळे एखादा अंक हवा असेल तर तो कुणाकडे असेल हेही कळते. आणि फक्त १००रू मध्ये बरेचसे अंक वाचायला मिळतात.
आता यावर्षी नाही पण पुढच्या वर्षीपासून नक्कीच वाचायला मिळतील दिवाळी अंक!!
दिगम्भा
दिगम्भा · Sat, 23 Oct 2010 - 08:35
दीपावली, अबकडई हे अजूनही निघतात का?
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Sat, 23 Oct 2010 - 19:53 · उत्तर
गेल्या वर्षीपर्यंत नक्की होते.
चळट्रीस
चळट्रीस · Sun, 24 Oct 2010 - 03:01 · उत्तर
दीपावली निघतो. अबकडई बंद होउन बरीच वर्श झाली.
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Mon, 25 Oct 2010 - 08:04
'मुक्त शब्द' नावाचं नवीन मासिक चालू झालेलं आहे (आधीच्या शब्द मासिकाशी संबंध असल्यास माहिती नाही). गेल्या काही महिन्यांचे अंक पाहता त्यांचा दिवाळी अंक बरा असेल अशी अपेक्षा आहे.
मुक्तसुनीत
मुक्तसुनीत · Mon, 25 Oct 2010 - 15:50 · उत्तर
"मुक्त शब्द" बद्दल थोडी अधिक माहिती मिळेल का ? (संपादक, प्रकाशक , एकंदर अंकाची प्रकृती. इ.)
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Mon, 25 Oct 2010 - 19:35 · उत्तर
> "मुक्त शब्द" बद्दल थोडी अधिक माहिती मिळेल का ? (संपादक, प्रकाशक , एकंदर अंकाची प्रकृती. इ.) <
संपादकः यशोधन (येशू) पाटील
(बोरीवलीत 'शब्द - द बुक गॅलरी' नावाचं यांचं पुस्तकांचं दुकान आणि प्रकाशनगृहही आहे.)
संपर्कः (०२२) २८३३ २६४०, ९८२०१ ४७२८४ muktashabd@gmail
दिवाळी अंकात यांचं लिखाण असणार आहे:
कृष्णात खोत (यांची रौंदाळा नावाची कादंबरी सध्या गाजते आहे), मनस्विनी लता रवींद्र, सदानंद देशमुख, प्रभाकर कोलते, जयदेव डोळे, आनंद विनायक जातेगांवकर, राजन गवस, रमेश इंगळे-उत्रादकर, वसंत आबाजी डहाके (मुलाखत) इ.इ.
यावरून साधारण अंदाज येऊ शकेल.
मुक्तसुनीत
मुक्तसुनीत · Mon, 25 Oct 2010 - 20:45 · उत्तर
याचा अर्थ, "मुक्त शब्द" आणि "शब्द दीपोत्सव" असे दोन अंक या येशू-परिवारातून (ह घ्या !) निघणार काय ?
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Mon, 25 Oct 2010 - 14:34
मी नक्की पाहणार -
अक्षर
शब्द
मौज
सागर
सागर · Mon, 25 Oct 2010 - 15:44
अरे माझ्या यादीत चंद्रकांत राहिला. दर्जेदार असतो हा ही अंक.
रोचीन
रोचीन · Sat, 30 Oct 2010 - 11:21
दिवाळि अंक येथे ऑनलाइन वाचता येईल.
http://www.loksatta.com/lokprabha/
यात लता-आशा वरचा शिरीष कणेकरांचा लेख कुंपणावर बसून लिहिल्यासरखा वाट्तो. लता-आशावरचे लेख म्हणजे आता शिळ्या कढीला ऊत आणल्यासारखे वाटतात. त्यात हा लेख म्हणजे त्यांच्याच जुन्या प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील पॅरेग्राफ एकत्र करुन लिहिला आहे. त्यामूळे अत्यंत कंटाळ्वाणा झालाय.
हजार लेकरांची माय हा सिंधुताई सपकाळांवरचा लेख छान आहे,आवडला.
तसेच 'मॄत्युच्या छायेतील महापुरुष आणि खलपुरुष' हा विश्वास पाटील यांनी लिहिलेला लेखही माहितीपुर्ण आहे. भुषण कोरगावकर यांनी लिहिलेला 'सोडा सोडा राया तनु शिणली' शकुंतला नगरकर या कलावतीची मुलाखत आहे. चांगली आहे. तेच निकाह या लेखाबद्दलही म्हणता येईल.
विशेष उल्लेख करण्यासारखा लेख म्हणजे रामदास यांचा 'रत्नचरित्र-दैवी रत्नांची शापित वाटचाल' हा लेख.
खुपच ओघवत्या शैलीत कंटाळवाणा होऊ न देता माहीतीपुर्ण लेख लिहिला आहे. मिपावर वावर असणार्यांना माहीत असेलच. :)
अच्युत गोडबोल्यांचा मेंदूविकारांवरच्या उपचारात आधुनिक तंत्रज्ञानाचा असलेला मोठा वाटा विशद करणारा लेखही माहितीपुर्ण!!
थोडक्यात काय तर २ लेख उत्तम, २ लेख माहितीपुर्ण २ लेख छान, २ लेख बरे, १ लेख वाईट असा क्रम लावायला हरकत नाही.
एकूणात ठिकठाक!!!!
यशोधरा
यशोधरा · Mon, 1 Nov 2010 - 07:02
अंतर्नादच्या दिवाळी अंकाचा वर मी उल्लेख केला आहे. काल अंक घेऊन आले आहे, आणि वाचायला सुरुवात केली आहे. वर वर अंक चाळलाय, चांगला वाटतो.