- Log in to post comments
‘ग्रंथ माझे गुरु, ग्रंथ मायबाप, निवविती ताप, हृदयाचा’ ... एका ओळीत वाचनसंस्कृतीचं माहात्म्य वर्णन करणारं हे वचन ग्रंथांचं महत्त्व सिद्ध करतं, तेव्हा ग्रंथप्रेमींना कृतकृत्य वाटत असेल. पुस्तकांच्या किंमतीचा विचारही न करता ती मिळवण्यासाठी वणवण करणारे पुस्तकभक्त पाहिले, की ‘वाचनापायी वाट्टेल ते’ करायची तयारी असलेल्या पुस्तकवेड्यांच्या वाचनभुकेला दाद द्यावीशी वाटते. एखाद्याकडे अमुक एक पुस्तक आहे, असं कळलं, की झपाटल्यासारखं होणारे पुस्तकप्रेमी पुस्तकविश्ववर दिसतात, तेव्हा वाचनसंस्कृतीच्या या पुजा-यांच्या पंक्तीत आपण खूप शेवटच्या पानावर आहोत, याची जाणीव होते. पण इथे वाचनभक्तीला आलेला महापूर पाहून ऊर भरून होते.. मग रिंगणात उतरावंसंही वाटू लागलं, आणि कदाचित, कळत नकळत खेचला गेलो. तरीही, पुस्तकांचा उभ्याउभ्या फडशा पाडावा, अशी मानसिकता कधी होईलसे मला वाटत नाही. पण कधी एखादे चांगले पुस्तक वाचावे, ते इतरांशी शेअर करावे, ही इथली कल्पना आणखी कशी विस्तारता येईल, यावर विचार व्हावासे वाटते. गावोगावी, वेगवेगळ्या शहरांत पसरलेल्या पुस्तकप्रेमींसाठी काही करता येईल का... संगणकाच्या पडद्यावर पुस्तक वाचण्यापेक्षा, हाताला होणारा पुस्तकांचा स्पर्श अधिक सुखावणारा असतो. तो अनुभव घेता यावा, असं काहीतरी इथे उभं राहावं, अशी अपेक्षा आहे. हाईड पार्कच्या धर्तीवर मुंबईत सुरु झालेल्या ‘अत्रे कट्ट्या’नं आता चांगलं मूळ धरलंय... नवनव्या विशयांवर चर्चा, भाषणं, वैचारिक देवाणघेवाण आणि कधी, पुस्तकं, संदर्भग्रंथांची देवाणघेवाणही होते. पुस्तकवेड्यांचा असा एखादा ‘कट्टा’ ठिकठिकाणी उभा राहिला तर?...
कल्पना कशी वाटते? कसा करता येईल हा कट्टा? काय असावं त्याचं स्वरूप? कोण चालवेल तो सातत्यानं? आपलं आणि कट्ट्याचं नातं काय असाव?...
चर्चा शक्य आहे. कदाचित आणखी एखादा चांगला उपक्रम उभा राहील.
... तुम्हाला काय वाटतं?
अभिप्राय
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 26 Jul 2010 - 13:42
अगदी अस्संच वाटतं.. सध्या डोक्याला बरेच व्याप असल्यानं पटकन नवी कल्पना सुचणे कठीण आहे पण चर्चा वाचायला आवडेलच.. शुभेच्छा!
वेदश्री
वेदश्री · Mon, 26 Jul 2010 - 16:54
>पुस्तकवेड्यांचा असा एखादा ‘कट्टा’ ठिकठिकाणी उभा राहिला तर?...
सुभानल्लाह!
>कल्पना कशी वाटते?
अप्रतिम!
>कसा करता येईल हा कट्टा?
हा काय प्रश्न झाला? कट्टा कसा करतात हे काय गुपित आहे का?
>काय असावं त्याचं स्वरूप?
माझ्या मते तरी अनौपचारिक असल्यास उत्तम पण औपचारिक असला तरी वाचनाला उत्तेजन देण्यास वाहिलेला असल्यास माझी उपस्थिती नक्की!
>कोण चालवेल तो सातत्यानं?
नमनालाच हा प्रश्न कशाला? सुरुवात तर होउ द्या.. पुढचे आपोआप ठरत जाईल असे वाटते!
>आपलं आणि कट्ट्याचं नातं काय असाव?...
आपले वाचन हे जर आत्मा आहे म्हटले तर असे कट्टे म्हणजे त्यांना शरीराचे अंगरखे घालून मूर्त रूप दिल्यासारखे होईल असे वाटते! शरीर नश्वर आहे असे कितीही जरी कोणी कंठशोष केला तरी त्याचा मोह कोणाला सुटला आहे का?
>चर्चा शक्य आहे. कदाचित आणखी एखादा चांगला उपक्रम उभा राहील. ... तुम्हाला काय वाटतं?
कल्पना सुंदर असल्याने ती सार्वमताने लवकर पास व्हावी असे वाटते. तिची अंमलबजावणी कशी व्हावी यावर चर्चा झाली तर वाचायला (आणि मला कुठे काही सुचवण्याची बुद्धी मिळाल्यास तितके सुचवायला) आवडेल.
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 16 Sep 2010 - 16:29
कधी होणार हा कट्टा? की झाला?
वेदश्री
वेदश्री · गुरुवार, 16 Sep 2010 - 16:36 · उत्तर
माझ्या माहितीनूसार तरी अजून झालेला नाहीये हा कट्टा पण ठरला तर मला नक्कीच आवडेल हजेरी लावायला. तूही येशील ना?
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 16 Sep 2010 - 16:38 · उत्तर
कधी आणि कुठे आहे त्यावर अवलंबून, पण यायचा प्रयत्न नक्कीच करेन बायो :)
वेदश्री
वेदश्री · गुरुवार, 16 Sep 2010 - 16:53 · उत्तर
पूण्यात ठेवायचा का कूठे? कोणाच्या घरी ठेवला तर ब्येश्ट.. म्हणजे लगे हाथों पूस्तकेही लाटता येतील ना? ;-) माझ्या घरीही ठेवायला माझी हरकत नाही (पूस्तके लपवून ठेवेन मी! :) ). फिरता कट्टा ठेवला तर?
कधी आणि कूठे हे मूद्दे तितकेसे महत्त्वाचे नाहीत.. रूपरेषा काय ठेवायची ते ठरवायला हवे आधी.
आनंदयात्री
आनंदयात्री · Fri, 17 Sep 2010 - 06:28 · उत्तर
मी सगळ्यांशी संपर्क करुन ठरवतो.