- Log in to post comments
मजकूर
चिंतातुर जंतुंच्या धाग्यावरून प्रेरणा घेऊन एक नवा धागा काढतो.
खालील तीन शब्द मनात अनेक दिवस घोळत आहेत. हे तीन शब्द कवितेतले आहेत हे नक्की. बहुदा ही कविता दिपु चित्र्यांची असावी असेच वाटते; परंतु खात्री नाही.
येथील सदस्यांपैकी कुणाला ही कविता माहिती असल्यास/आठवल्यास येथे द्यावी. उपकृत राहीन.
ते शब्द आहेत : "बेहद्द नाममात्र घोडा !" ( खल्लास प्रतिमा आहे की नाही !?)
धन्यवाद.
चर्चा प्रकार
अभिप्राय
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 3 Nov 2010 - 04:18
ही कविता दि.पु.चित्रे यांची नसून हेमंत जोगळेकर यांची आहे. बहुधा 'होड्या' या काव्यसंग्रहात असावी. पाहतो व सापडल्यास इथेच देतो.
इन्द्रा
अडगळ
अडगळ · गुरुवार, 4 Nov 2010 - 17:08
त्याचा उगम आणि विकास गूढ , कॅन्सरसारखा.
अरुण कोलटकर असं आठवतंय.(अरुण कोलट्करांच्या कविता , प्रास प्रकाशन)
सागर
सागर · गुरुवार, 4 Nov 2010 - 18:35 · उत्तर
ही कविता हेमंत जोगळेकरांचीच आहे
इथे पहा : मटा सारख्या वृत्तपत्रात चुकीची बातमी नाही येणार :)
इंद्रराज यांनी दिलेली माहिती बरोबर आहे.
तसेच हेमंत जोगळेकरांच्या कार्याचा थोडक्यात आढावा इथे वाचावयास मिळेल
अडगळ
अडगळ · गुरुवार, 4 Nov 2010 - 18:56 · उत्तर
त्यांची 'पण' असेल , पण मूळची कोलटकरांची .
(डोक्या , दगा देत नाही आहेस ना रे बाबा ? )
सागर
सागर · गुरुवार, 4 Nov 2010 - 19:02 · उत्तर
माझा पण बेहद्द नाममात्र घोडा" हा विडंबन काव्यसंग्रह आहे
याचे कवी आहेत मधु जाधव
इथे ही माहिती मिळेल.
अडगळ
अडगळ · गुरुवार, 4 Nov 2010 - 19:16 · उत्तर
मघाच्या लिन्क मध्ये हे होतं
जोगळेकर हेमंत गोविंद : मुंबई आयआयटीमधून रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथून वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त. 'होड्या' (१९८५), 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' (विडंबन कविता), 'मनातले घर' (१९९५), 'उघडे पुस्तक' (२००७), हे कवितासंग्रह प्रकाशित.
सागर
सागर · गुरुवार, 4 Nov 2010 - 19:47 · उत्तर
अडगळराव तुमच्या वाचनात आलेली ही कविता असेल तर तुमचेच बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे. मी ही कविता वाचलेली नाही.
हा "बेहद्द नाममात्र घोडा" चांगलाच चौखुर उधळीत आपल्याला गोंधळवतो आहे.
मटा च्या बातमीत हा "बेहद्द नाममात्र घोडा" हेमंत जोगळेकरांचा आहे तर
ग्रंथालय.ओआरजी मधे हा "बेहद्द नाममात्र घोडा" मधु जाधव यांचा आहे.
या धाग्यावर लक्ष ठेवून आहेच. मलाही उत्सुकता लागून राहिली आहे की हा "बेहद्द नाममात्र घोडा" नक्की कुणाचा ;)
सागर
सागर · गुरुवार, 4 Nov 2010 - 18:34
मुक्तसुनीत,
कविता तुम्ही म्हटल्याप्रमाणे नावावरुनच एकदम खल्लास वाटते आहे.
तुम्हाला वा कोणाला ही कविता मिळाल्यास इथेच द्यावी ही विनंती.
मलाही पूर्ण कविता वाचायला आवडेल. :)
अडगळ
अडगळ · गुरुवार, 4 Nov 2010 - 19:22
आता या कवितेचा पण उद्गम आणि विकास गुढ वाटू लागला आहे .. घोड्यासारखा.
कोणाकडे आहे का "अरुण कोलट्करच्या कविता" हाताशी?
मुक्तसुनीत
मुक्तसुनीत · गुरुवार, 4 Nov 2010 - 19:24
एक गोष्ट निश्चित झाल्यासारखी वाटते : हेमंत जोगळेकरांचा शीर्षक संग्रह विडंबनाचा वाटतो आहे. मूळ कविता अन्य कुणाची - आणि अडगळरावांचा अंदाज बरोबर असल्यास कोलटकरांची - असण्याची शक्यता.
मी जमतील ते संदर्भ जुळवण्याचा आणखी प्रयत्न करतो. धन्यवाद.
अडगळ
अडगळ · गुरुवार, 4 Nov 2010 - 19:33
इतिहासाची नाणी हा घोडा टापांनी उधळतो अशीच काहीशी प्रतिमा पण आहे.
अवांतर :
बाकी हा घोडा जेजुरी ते काळा घोडा पर्यंत परत परत येतो.
'कॅन्सर' पण (आठवा : कॅमेर्यावरची कविता , भिजकी वही).
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Sat, 6 Nov 2010 - 11:55
गडबडीत काही दिवस हा धागा वाचला गेला नाही. ही कोलटकरांची 'घोडा' नावाची कविता आहे आणि ती 'अरुण कोलटकरच्या कविता'मध्ये समाविष्ट आहे. कविता दीर्घ आहे म्हणून संपूर्ण टंकत नाही, पण सुरुवात अशी आहे:
बेहद्द नाममात्र घोडा.
त्याचा उगम आणि विकास गूढ
कॅन्सरसारखा. त्याच्या
हाडामांसाने मातीशी द्रोह पत्करलेला.
त्याच्या खोडदौडीच्या वळणदार वणव्याला
वेग एकाद्या हल्ल्याच्या अफवेचा.
त्याच्या ओवीबध्द टापांचे
खणखणीत बोल
भाकरतुकड्याइतके ढळढळीत.
मुक्तसुनीत
मुक्तसुनीत · Mon, 8 Nov 2010 - 15:51
या धाग्यात आवर्जून प्रतिसाद देणार्या सर्व मित्रांचा आभारी आहे.
मुक्तसुनीत
मुक्तसुनीत · गुरुवार, 11 Nov 2010 - 05:27
बेहद्द नाममात्र घोडा.
त्याचा उगम आणि विकास गूढ
कॅन्सरसारखा. त्याच्या
हाडामांसाने मातीशी द्रोह पत्करलेला.
त्याच्या खोडदौडीच्या वळणदार वणव्याला
वेग एकाद्या हल्ल्याच्या अफवेचा.
त्याच्या ओवीबध्द टापांचे
खणखणीत बोल
भाकरतुकड्याइतके ढळढळीत.
पण पाषाणयुगांचे जख्खड राजेरजवाडे
(त्यांच्या म्यानातच अमरत्व गंजलेले)
नकली नाण्यांच्या दहशतवादी सुळसुळाटाने
डोंगर हादरले अर्थव्यवस्थेसारखे
पाहून त्याच्या यमक्या टापांचे कथनकौशल्य
परंपरागत निद्रेतून उठले
सिंहासन सोडून परांगदा झाले.
स्फोटक सिगारेटप्रमाणे निरागस दिसणारी
नाणी मात्र तशीच पडून राहिली
घोड्याच्या टापांनी उधळलेली.
सागर
सागर · गुरुवार, 11 Nov 2010 - 07:15 · उत्तर
खूप चांगली कविता इथे दिली याबद्दल आभारी आहे.
काय मस्त कविता आहे वा... सुंदरच.
मूळ कोणाची आहे पण ही? कोल्हटकरांचीच का?
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · गुरुवार, 11 Nov 2010 - 07:21 · उत्तर
ही कवी अरुण कोलटकरांची कविता आहे (कोल्हटकर नव्हे). मूळ कविता याहून खूप दीर्घ आहे. हा केवळ अंश आहे.
सागर
सागर · गुरुवार, 11 Nov 2010 - 09:34 · उत्तर
अरुण कोलटकर... नाव पक्के डोक्यात बसले आता :)
शक्य असेल तर सगळी कविता द्या ना.... वाचायला आवडेल. खूपच मोठी असेल तर मग मिळवून वाचेल :)
कविता महाजन
कविता महाजन · Fri, 10 Dec 2010 - 20:33
तो उठतो खिंकाळत वेळी अवेळी
आणि त्याच्या पाषाणशिल्पाइतक्या
अलिप्त काळ्याथंड प्रशस्त नाकपुड्यांतून
निघालेली फुंकर माझ्या दैनंदिन
उकळल्या कढईतून कोरते
शीतल आरामदेह स्विमिंग पूल.
मग तो लगेच गुल होतो गोळा करायला
बिकिनीधारी बायका लोळत ठेवायला
आजूबाजूस चित्राचा एकूण तोल सांभाळायला
न पोहणार्या.
त्याच्या खमक्या टापा टपटपत जातात चौखुर
बिनदिक्कत तुझ्या घरापर्यंत
आणि तुझ्या खोलीच्या खिडकीच्या खाली
तो येऊन उभा राहतो
दोन पायांवर तयार असल्यासारखा
दोन पाय उंचावून तुझ्या खिडकीपर्यंत
सतराव्या मजल्यावरच्या.
( तुझ्या खिडकीला गज असतात ते सोडा.)
तो जमवतो टेंभे तुकतुकीत
मिरवण्यासाठी माझ्या साहेबांसमोर
ज्यांच्या प्रकाशात तो फलकारतो
आपली शेपूट प्रश्नार्थक वारंवार
विचारतो साहेबांना,"आहेत का
माझ्या शेपटीत आहेत तितके तरी केस
तुमच्या आख्ख्या टकलावर मिळून?"
कधी मधी तो अपनेही घरमें
कुत्र्यासारखा शेर होऊन
एकाच उडीत मला भुईसपाट करीत रक्तबंबाळ
निघून जातो नदीवर
तोंड धुण्यासाठी
पुन्हा येण्यापूर्वी
माझा ( पण ) बेहद्द नाममात्र घोडा!
कविता महाजन
कविता महाजन · Fri, 10 Dec 2010 - 20:45
जोगळेकरांचा हा संग्रह १९८४ साली विश्वमोहिनी प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. त्याला वसंत सरवटे यांची चित्रं आणि बाळ गाडगीळांची प्रस्तावना आहे. या कवितेआधी जोगळेकरांनी लिहिलेली नोंद गमतीशीर आहे. सरवटेंचे पोकळ घोड्याच्या पोटातून बाहेर पडणार्या कवीचे चित्र असलेले मुखपृष्ठही अफलातून आहे. ( जोगळेकरांनी १९८५ सालच्या दिवाळीत भेट म्हणून पाठवलेला हा संग्रह या कवितेच्या निमित्ताने आज बर्याच काळानंतर चाळून पाहिला. :-). मजा आली. )
पु. शि. रेगे यांच्या
'अहो आमचं घर पहा
ही वार्याची खोली...' चं विडंबन नमुन्यादाखल देते.
अहो, आमचं ऑफिस पहा :
ही साहेबांची खोली;
दाराच्या फटीतून
जे रंगीबेरंगी दिसताहेत धागे
ती आहे सेक्रेटरी.
आमचे खरे साहेब
आहेत मागे
तिच्या.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Sat, 11 Dec 2010 - 07:04 · उत्तर
पु.शि.रेगे यांची कविता "विडंबना" चा विषय व्हावा हे पाहून जितके वाईट वाटले त्यापेक्षा विश्वमोहिनी सारख्या दर्जेदार प्रकाशनाने त्या विडंबनाला प्रसिद्धीसाठी स्वीकारावे याचे मनस्वी वाईट वाटले. आता उद्या बालकवि, कुसुमाग्रज, अनिल यांचेही विडंबन कुठल्या तरी आधुनिक विचाराच्या कट्ट्यावर येईल त्यावेळीही अंतरकर ते प्रसिद्ध करतीलच, त्यासाठी मनाची तयारी करून ठेवली पाहिजे.
असो.
इन्द्रा
कविता महाजन
कविता महाजन · Sat, 11 Dec 2010 - 08:18
इंद्रा : असे असेल तर मग कुणाच्याच आणि कोणत्याच कवितेचे ( किंवा कशाचेही ) विडंबन होऊ नये. विडंबनाकडे खुलेपणाने पाहिले पाहिजे. जोगळेकरांनी केलेली विडंबने ही केवळ टवाळी म्हणून नाहीत. त्यात त्या-त्या कवीची शैली त्यांनी ज्या कसबाने आत्मसात केली आहे, ते कमालीचे आहे. "माझा ( पण ) एक बेहद्द नाममात्र घोडा" चे मनोगत, प्रस्तावना, कवितेआधी जोगळेकरांनी लिहिलेल्या नोंदी जरूर वाचा.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Sat, 11 Dec 2010 - 09:24 · उत्तर
कविताताई....मी प्रतिसादात "विडंबन होऊच नये" असे म्हटलेले नाही, हे स्पष्टच आहे. माझा आक्षेप आहे तो "विडंबन" पुस्तकरूपाने बाजारात "साहित्य" म्हणून आणण्याच्या (आणि तीवर गल्ला भरण्याच्या) प्रकाशकांच्या धंदेवाईकपणावर. कोणत्याही परिस्थितीत विडंबनाचे आयुष्य हे म.टा. सारख्या वृत्तपत्राच्या 'रविवार' च्या आवृत्तीपेक्षा जास्त असू नये.
समजा तुमच्या शाळा/हायस्कूलमध्ये जाणार्या कन्येने एखादे दिवशी माधव जूलियन यांच्या 'दूरस्थ मातेस...' या भावकवितेचे आणखीन कुणी 'जोगळेकरा"ने केलेले खालील विडंबन
"दूरस्थ न्हाव्यास..."
"...प्रातःकालिं अतां तुझे नच घडे सुस्निग्ध ते दर्शन
की ज्याच्या वस्तर्याने मग तो जावा सुखाने दिन
लाभेना तुज हातची ती तैलचंपी, जरी असे तित जल एक मण
की जेणे मुठमुठ झापड चढुनी यावे मला मीपण...."
~ तुम्हाला पुस्तकरूपात आलेले दाखवून मूळ कविता कुणाची आहे असे विचारले, तर तुम्हाला मनोमनी ती दाखविण्याचा आनंद होईल का? माझा हा प्रश्न किंवा कवितेमागील माझी भावना बालिश तसेच विडंबन साहित्यप्रकारावर अन्याय करणारी वाटण्याचा संभव आहे. पण तुम्हाला मी (तसेच हजारोंच्या संख्येत असलेले तुमचे वाचक) ओळखतो ते सर्वप्रथम एक कवयित्री म्हणून....त्या अनुषंगाने तुम्ही माझ्या या भूमिकेकडे पाहावे ही विनंती. "अनुष्टुभ"च्या तुम्ही कवयित्री होता पण मला नाही वाटत कधी म.सु.पाटील यानी कधी 'विडंबन' प्रकाराला तिथे स्थान दिले असेल...तिच गोष्ट 'सत्यकथे'ची.
भले अत्र्यांनी हा प्रकार लोकप्रिय करून पुस्तकरूपात आजही परचुर्यांनी अस्तित्वात ठेवला असेल, पण म्हणून तो एक दर्जेदार साहित्यप्रकार म्हणून सातत्याने प्रकाशकांनी खपाऊ नावाखाली त्या कवितांना पुस्तकाचे रूप देवू नये, इतपतच.
अत्र्यांनी तर काय... त्यांच्यापुढे होते भीडस्त स्वभावाचे 'रविकिरण मंडळ', ते या मुलुखमैदान तोफेसमोर काय उत्तर देणार, म्हणून पाडली ती झेंडूची फुले !
इन्द्रा
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Sat, 11 Dec 2010 - 09:38
जुन्या किंवा समकालीन लेखनशैली किंवा जीवनदृष्टीच झुगारून देणं हे साहित्यविश्वात नेहमीच होत राहिलेलं आहे. त्यासाठी विडंबनं करणं हे एक प्रभावी आणि वाजवी हत्यार आहे. त्याला नाकारणं म्हणजे एक प्रकारे (विंदांच्या भाषेत सांगायचं तर) श्लीलाच्या नरकात फेकलं जाणं आहे. (अधिक माहितीसाठी हा धागा पाहा).
बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते · Sat, 11 Dec 2010 - 09:52 · उत्तर
वेळेवर धावून आलात हो जंतु!!! :)
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Sat, 11 Dec 2010 - 10:54 · उत्तर
अगदी अगदी!
चिंजंना संपूर्ण अनुमोदन.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Sat, 11 Dec 2010 - 11:40
१. श्री.चिंतातर जंतू आणि त्यांच्या प्रतिसादाला होकारार्थी 'रॅपो' देणार्या श्री.बि.का. आणि मेघना यांना मी नम्रपणे सुचवू इच्छितो की, मी 'विडंबन' अजिबात नकोच असे म्हटलेले नाही. माझा (जरी क्षीण असला तरी....) विरोध आहे तो ती पुस्तकरूपाने बाजारात आणण्यावर आणि मूळ कवितेचे सौदर्य नवख्या वाचकाला न सांगता ती भ्रष्ट विनोदाची पिचकारी त्याच्याकडे देऊन 'कविते'चा आनंद घे म्हणून सांगण्याचा प्रवृत्तीला आहे. कविता महाजन यानी जोगळेकरांच्या "त्या" संग्रहाचा उल्लेख करताना तीत 'मूळ' कविता पुस्तकात आहे का नाही याचा उल्लेख केलेला नाही....बहुधा नसेलच. आचार्य अत्रे यांनीही "तळीचे खोबरे खाण्यासाठी..." वाचकाला केलेल्या चेतावनीत हे स्पष्टच केले होते की, त्याला मूळ कविता व तिची महिती माहित नसेल तर विडंबन-काव्याचा आनंद घेताच येणार नाही. [इथे हेही खरे की परचुर्यांनी 'झेंडूच्या फुला'त मूळ कविता दिलेल्या नव्हत्या, पण त्या पिढीतील जवळपास सर्वच वाचकांना त्या कविता आणि त्यांचे साहित्यातील स्थान माहित असल्याने, अत्र्यांच्या विडंबनाबाबत संभ्रम निर्माण झाला नाही. पण आज तशी स्थिती आहे का? मग अशा नूतन पुस्तकांचे महत्व केवळ एकदोन तासाची 'करमणूक' म्हणून? [आता आनंदरावांना मी कधीच सांगू शकत नाही की तशी पुस्तके प्रकाशित करू नकोस....तो माझा अधिकार नाही. पण मी त्या स्टॉलच्या तंबूत जाणार नाही, इतकेच.]
२. विंदांनी जे काही श्लील-अश्लिलतेच्याबाबतीत मत मांडलेले आहे, ते मी यापूर्वीच वाचलेले आहे, अन्यत्र चर्चाही केलेली होती.... पण विंदा म्हणतात म्हणून ते ब्रह्मवाक्य झाले असे मी मानत नाही. मूळात अश्लील वाङ्मय चोरून वाचणार्या प्रमदेचे ते वर्णन आणि तिने केलेले कृत्य ही एक 'विरूपिका' आहे, विडंबन नव्हे...त्या कवितेला 'स्वतंत्र' असे अस्तित्व आहे. पण अश्लिलतेने लडबडलेल्या तत्सम कविता कविता म्हणून (आणि त्यातही ती 'ज्ञानपीठ' पुरस्काराने सन्मानित केलेल्या कविने लिहिली आहे म्हणून...) डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा श्ल्लील नामक नरकात माझ्या नावाने एखादी रूम असेल तर मी तिथेच जाणे पसंत करीन.
"....ओसाड राजवाडे करतात रवंथ
सरंजामी सत्तेचे, लावतात दारे
आणि पदस्थल होतात गरम
माणसांच्या उबेने....त्रेसष्ट पावसाळे
मातीशी झुंजणार्या विश्राम शेलाराला
नाही रे मिळाली नाचण्याची आंबील
पाय आखडल्यावर, मेला भुकेनेच..."
~ आम्हाला भावतात ते हे विंदा...मातीशी झुंजणार्या शेलाराची व्यथा मांडणारे....ना की गणपतीने एका प्रमदेचे मोदक स्तन पकडून केलेले 'थोर' कार्य सांगणारे !
इन्द्रा
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Sun, 12 Dec 2010 - 05:08 · उत्तर
आपल्याला जे भावत नाही, ते आपण वाचू नये. टीका करावी त्यावर. पण पुस्तक प्रसिद्धच होऊ नये, हे जरा अन्यायकारक नाही वाटत? शेवटी अभिव्यक्ती ज्याच्यासाठी अत्यावश्यक बाब आहे, तो विरुपिकेचा घाट निवडेल, मुक्त सुनीताचा किंवा विडंबनाचा.
अगदी ओरिजनल कविताही सुमार असू शकते आणि विडंबने थोर असू शकतात. एखाद्या घाटामध्येच बरे-वाईट कसे ठरवता येईल?
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Sun, 12 Dec 2010 - 06:36 · उत्तर
".....पण पुस्तक प्रसिद्धच होऊ नये..."
~ मेघना....मी असे कुठे म्हटले आहे का? परत एकदा वरील प्रतिसाद तुम्ही वाचलात तर स्पष्ट म्हटलेले आढळून येईल की, 'मी आनंदरावांना सांगू शकत नाही की विडंबनाचे पुस्तक प्रकाशित करु नका.....फक्त मी त्या स्टॉलकडे जाणार नाही..." इतकेच ~ ही कबुलीच दर्शविते ना की, कुणालाही अगदी ज्ञानेश्वर-तुकारामापासून ते ढाले-ढसाळापर्यंतच्या साहित्यावर विडंबने लिहायची आणि नंतर ती पुस्तक रुपाने प्रकाशित करण्याची घटनेनेच दिलेली मुभा आहे....पण त्याच घटनेने ते पुस्तक मी घ्यावे की न घ्यावे हे ठरविण्याचीही तरतूद केलेली असल्याने माझ्यापुरता तो निर्णय आहे.
"....एखाद्या घाटामध्येच बरे-वाईट कसे ठरवता येईल?...."
सरसकट ठरविता येणार नाही हे मान्य...! पण इथे व्यक्तिस्वातंत्र्य असल्याने मला ज्यावेळी मर्ढेकरांची "पिंपात मेले ओल्या उंदिर..." भावते त्यावेळी ती दुसर्याला टाकावू वाटेल हे होणारच. तीच गोष्ट एखाद्याला विडंबन हा घाट साहित्यात असणे गरजेचे आहे आणि तो पुस्तकरूपातही आला पाहिजे हे जसे ठामपणे वाटते, त्याचवेळी मला ते अनावश्यक वाटले तर माझे ते मत मांडण्याचा तर मला अधिकार आहे, हे तुम्ही मान्य कराल ना?
"...अभिव्यक्ती ज्याच्यासाठी अत्यावश्यक बाब आहे, तो विरुपिकेचा घाट निवडेल..."
~ अभिव्यक्तीचाच मुद्दा मांडायचा असेल आणि जर त्यासाठी विरूपिकाच हवी असेल तर तो त्या कविचा अधिकारच आहे. प्रश्न आहे तो ती अभिव्यक्ती सादरीकरणाचा आणि भाषेतील दर्जाचा. भागवतांनी 'ती' विरुपिका विंदांनी लिहिली म्हणून सत्यकथेसाठी स्वीकारली....एखाद्या पाडळी (बुद्रुक) च्या सोम्यागोम्याने ती खटाववाडीकडे पोस्ट केली असती तर वाटते तुम्हाला "...चला आहे, छान अभिव्यक्ती...द्या पटवर्धनांकडे प्रसिध्दीला..." सील्ड अॅण्ड साईन्ड बाय श्री.पु. ! झाले असते असे?
इन्द्रा
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Sun, 12 Dec 2010 - 07:29 · उत्तर
भागवतांनी 'ती' विरुपिका विंदांनी लिहिली म्हणून सत्यकथेसाठी स्वीकारली....एखाद्या पाडळी (बुद्रुक) च्या सोम्यागोम्याने ती खटाववाडीकडे पोस्ट केली असती तर वाटते तुम्हाला "...चला आहे, छान अभिव्यक्ती...द्या पटवर्धनांकडे प्रसिध्दीला..." सील्ड अॅण्ड साईन्ड बाय श्री.पु. ! झाले असते असे?
म्हणजे तुला असे म्हणायचे आहे, की श्रीपु माणसे पाहून कविता छापायची की नाही हे ठरवत होते - साहित्याचा दर्जा पाहून नव्हे? (तसे असते तर जीएंच्या काही कथा त्यांनी छापल्या, आणि काही परत धाडल्या असे घडलेच नसते.) श्रीपुंच्या संपादक म्हणून असलेल्या दर्जाबद्दलच ते प्रश्नचिन्ह ठरेल. तुला तसेच प्रतिपादन करायचे आहे का? (एकदा नीट समजून वाद घालू या, नुसत्याच गैरसमजावरून नको! नै का?!)
बाकी पुस्तक प्रसिद्धच व्हायला नको, असे तू म्हणत नाहीयेस, खरेच. मी नीट वाचायला हवे होते. :P
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Sun, 12 Dec 2010 - 08:52 · उत्तर
".....बाकी पुस्तक प्रसिद्धच व्हायला नको, असे तू म्हणत नाहीयेस, खरेच. मी नीट वाचायला हवे होते...."
~ हे राम ! देव पावला ! अन्यथा मी आताआत्ताच गंभीर विचार करीत होतो की श्री.उज्ज्वल निकम यांच्याकडून "आमच्या अशीलाचे प्रतिसाद का नीट वाचत नाही, याचे उत्तर द्यावे..." अशी धर्तीची तुला नोटीस पाठवून द्यावी का?
दुसरा मुद्दा....श्री.पु...आणि जी.ए. ~ वेल, वेट !
इन्द्रा
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Sat, 11 Dec 2010 - 12:45
असं मीही म्हणत नाही. माझा मुद्दा श्लीलाच्या नरकाविषयी होता. जेवणात जसं फक्त तिखटजाळ खाल्लं तर अल्सर होईल; तसंच फक्त गोड खाल्लं तरीही तोंडाला मिठी बसेल, किंवा मांद्य/स्थूलता येईल. याच न्यायानं फक्त अभद्रच वाचलं तरीही नुकसान होईल अन फक्त भद्रच वाचलं तरीही नुकसान होईल असा तो मुद्दा आहे.
जे प्रस्थापित आहे पण पटत नाही त्याविरुध्द बंड करण्यासाठीचं किंवा त्याला विरोध दर्शवण्यासाठीचं विडंबन हे एक शस्त्र आहे. ते कोण कसं आणि कशाविरुध्द वापरेल त्यावरून ते विशिष्ट विडंबन चांगलं/वाईट का/कसं यावर चर्चा होऊ शकते. ती शक्य व्हावी यासाठी विडंबन या वाङ्मयप्रकाराचं हे सामर्थ्य तत्त्वतः तरी मान्य करावं एवढीच इच्छा. नाहीतर प्रस्थापितांना विरोध करण्यालाच तुमचा विरोध आहे की काय असं वाटू लागेल.
यशोधरा
यशोधरा · Sat, 11 Dec 2010 - 16:13 · उत्तर
चिंजं, अतिशय सुरेख प्रतिसाद.
अडगळ
अडगळ · Mon, 13 Dec 2010 - 04:52
का बे करता विडंबनं ?
आयत्या बिळावर बसायची मजा आणि सोय हे तर आहेच. माझ्या लेखी विडंबन म्हणजे विडंबकाने कवीला डोळा मारल्यासारखं आहे. दोन्ही डोळे चांगले शाबूत असतानाही कधीतरी तिरका डोळा मारावा वाटतोच की माणसाला. आता 'निरीक्षणा'इतकं मूल्य हे 'डोळा मारण्या'ला नाही हे बिल्कुल मान्य. पण डोळा मारल्याने काही नेमके हेतु साध्य होतात. तेवढंच यश आम्हाला रग्गड.
शब्दक्रीडा हा निर्विवाद आनंद आहे. यात कवीचे श्रेय घ्यायचा तर प्रश्नच नाही. यात कदाचित गहन तत्त्वविचार / व्यामिश्र अनुभूती हे काही नसावे पण कसब जरूर असते. तमाशातला किसनदेव हे कृष्णाचे विडंबन नव्हे काय ? पण यात जय्/भारत्/महाभारत कोणाच्याही कर्त्याला ऊणेपणा येत नाही. यातील खेळकरपणामुळे उलट कवी -वाचक यांच्यातील अनावश्यक , अवास्तव गांभीर्य कमी व्हायला मदतच होत असावी.